भक्ती

Submitted by अश्विनी के on 6 June, 2008 - 01:40

viththal rakhumai.jpg

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर |
चंद्र व्हा हो पांडुरंगा मन करा थोर ||

भक्ती, भक्तीचे नऊ प्रकार (नवविधा भक्ती), गुरु शिष्य परंपरेतून / कथांमधून जाणवणार्‍या भक्तीचे विविध पैलू, संतांच्या कथांमधून होणारे परमात्म्याचे गुणसंकिर्तन आणि अनुषंगाने होणारी भक्तीविषयीची चर्चा.

saint tukaram.jpg

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

|| हरि ओम ||
खरच अश्विनि ताई. जसा आपला मित्र, आपले संवंगडी आपल्याला एकटे असे सोडतच नाहित. तसाच हा " तो" हि आपल्याला सतत सोबत करत असतो. आपल्या मनातले न सान्गताच दोस्ताला कळते तसेच ह्याला आप्ल्या मनःस्थितिचि जाणीव असतेच.
तुम्हाला राग आलय , तुम्हि खुश आहात, तुम्ही अस्वाद घेत आहात सर्व सर्व त्याला कळते. आणि मग सुरु होते एक वेगळेच दालन. जिथे कसलिहि चिंता राहात नाहि कारण "त्याचे" चिंतन सुरु असते सदैव. उगाचच आपण चिंतेने वेळ दवडला हे कळुन येते.

एखादे संकट यायच्या आधीच "तो" ते आपल्या नकळत परतुन लावतो. "माझे बाळ आहे हे " अशा अर्थाने सर्वार्थाने "तो" काळजी घेतो. आणि आपला हात घट्ट पकडुन ठेवतो. कारण आपण पकडलेला हात कधिहि सुटु शकतो.. तो मात्र कधिहि आपला हात सोडत नाहि.

"हे ऋण त्या भगवंताने कधीही फेडून मोकळे न होता अभिमानाने स्वतःवर अलंकारासारखे मिरवले." --- हे कळालं नाही. असं का म्हणताय?

भूमिकाताई,
तुम्ही इथे बर्‍यापैकी शुद्ध मराठी लिहिताय.
मग असंच इतरत्र का लिहित नाही तुम्ही?

भगवंत कधीच कुणाचे काही घेत नाही. आपण काम्य भक्तीने किंवा निष्काम भक्तीने जे काही त्याला अर्पण करतो त्याच्या अनंत पटीने तो आपल्याला परत करत असतो, अगदी प्रेम सुध्दा !! त्याने अठरा विश्वे दरिद्री सुदाम्याच्या प्रेमाने ओथंबलेल्या पोह्यांच्या पुरचुंडीला स्वतःच्या प्रेमाने व वैभवाने तोलले. परंतु पेंद्याच्या सख्य भक्तीच्या ऋणात मात्र त्याने स्वतःला अडकवून घेतले. विचार करण्याजोगी गोष्ट आहे, स्वतः लौकीकार्थाने अपंग, अशक्त असूनही त्याने परमात्म्याच्या कार्यात त्याची साथ सोडली नाही आणि आपण धडधाकट व बुध्दीने स्वतःला ठाकठीक समजतो पण "त्या"च्याच दुसर्‍या लेकरांना जी प्रारब्धवशाने आयुष्यात खूप कमतरता अनुभवतायत त्यांची फार तर कीव करतो, दुसर्‍यांच्या भावनांची हत्या करायला आपल्याला काहीच वाटत नाही, दुसर्‍याची फजिती करण्यात आपल्याला खूप सुख वाटते. दोन रुपये देवा पुढे ठेवताना सुध्दा कितीतरी लोक तीनतीनदा ओवाळून ओवाळून ठेवतात. असे वागल्यावर जे पेंद्याने मिळवले त्यातले काही अंश तरी आपण मिळवू शकू का?

चिन्या,
"त्यामुळे या जगात सुखी रहाण्यासाठी ,या जगातील ऐहीक गोष्टींकडे असलेली dettachment जरुरी आहे.आणि त्या dettachment साठी भगवंताकडे आणि भगवत्नामाकडे attachment असणे "
हे अशक्य नाही वाटत? ऐहीक गोष्टी म्हण्जे जगण्याठी आवश्यक अशा गोष्टी. जसे,अन्न्,वस्त्र,निवारा...शिवाय मुल्,पैसा वगैरे वगैरे. या गोष्टी नसतील तर जगणं अशक्य. त्यापासुनचं detachment कशी करता येईल? हे जे वाक्यं तुम्ही लिहिलंय ते खुप ठिकाणि ऐकलंय पण कधीचं पटत नाही. क्रुपया explain करु शकाल का?
माझे एक मित्र म्हणतात की, दु:खही देवानेचं दीलेलं असतं त्यामुळे आनंदाने ते स्विकारावे...मी त्यांनाही हेचं विचारलं कसं शक्य आहे? तर ते म्हणाले कि,सुरुवातीला अवघड जाईल पण जमतं.
तुम्हिही हेचं म्हणताय का? (मला बहुधा तुमचं हे वाक्यचं नीट समजलं नाही.)

सर्वांनी इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद्.भुमिका ,अश्विनी कृपया लिहीत रहा.

ऐहीक गोष्टी म्हण्जे जगण्याठी आवश्यक अशा गोष्टी. जसे,अन्न्,वस्त्र,निवारा...शिवाय मुल्,पैसा वगैरे वगैरे. या गोष्टी नसतील तर जगणं अशक्य. त्यापासुनचं detachment कशी करता येईल?
काहीही लिहीण्याआधी मी सांगतो की मलाही या ऐहीक गोष्टींपासुन detach होण जमतच अस नाही.सुप्रिया,प्रश्न तसा obvious आहे.पण उत्तरही obvious आहे. मलाही त्यापासुन detach होण जमत अस नाही पण मी अशी लोक बघितली आहेत की जी detached आहेत. नक्कीच माया ही खुप अवघड आहे जिंकायला. पण ती जिंकल्याशिवाय सुख नाही. मुळात आधी तुम्हाला हे मान्य आहे का की ऐहिक गोष्टी केवळ क्षणिक सुख देतात्???काही दिवसांनंतर त्या गोष्टी जातात व आपल्याला दु:ख देउन जातात्.त्यामुळे eternal गोष्टींसाठी क्षणिक गोष्टींचा त्याग करावा लागतो. पाण्यात पोहायचे असल्यास जमिन सोडावीच लागते. जमिनीवर राहुन पाण्यात पोहता येत नाही.त्यामुळे तुम्हाला जर शाश्वत आनंद मिळवायचा असल्यास तुम्हाला क्षणिक ऐहीक गोष्टी सोडाव्या लागतील्.वरील गोष्टींशिवाय जगता येईल का??येउ शकत्.प्रश्न हा आहे की या वरील गोष्टी तुम्हाला आनंदच देतात का??नक्कीच नाही त्या जास्त दु:खच देतात्.
पण ह्या वर दिलेल्या गोष्टी सोडण्ञासाठी तुम्हाला संन्यास घ्यावा लागेल्.जे फार अवघड आहे. म्हणुन भक्तीमधे याला एक दुसरा उपाय दिला आहे.ऐहिक गोष्टींपासुन detach होण्यासाठी भगवद्भक्ती करा.म्हणजे आपोआपाच transcendental गोष्टींची गोडी लागुन ऐहिक गोष्टींबद्दल रस कमी होतो.दुसर म्हणजे आपल्याला काही गोष्टी कराव्याच लागतात्.आपल्याला त्याचे व्यसन असते.त्यामुळे त्या गोष्टीही भगवद्भक्तीने करा. म्हणजे खाण आवश्यक आहे मग भगवद्प्रसाद खा.स्वयंपाक करायला आवडतो,मग स्वतःसाठी नाही तर देवासाठी चविष्ठ पक्वान्न बनवा.विचाराधिन आहात तर देवाचाच विचार करा,काम करावच लागत मग मी देवासाठी करतोय या भावनेने करा.गाण ऐकायची इच्छा आहे मग भगवंताचे गीत,भजन ऐका. नाचायची इच्छा आहे मग किर्तनावर नाचा.चित्र काढायच आहे मग देवाच चित्र काढा.गाण गायच आहे तर किर्तन गा.अशा पध्दतीने God conscious गोष्टी करा.म्हणजे आपोआपच आपण भगवंताला attach होतो व मायेला जिंकतो.जिथे सच्ची भक्ती असते तिथे देव स्वत: अवतरतो आणि जिथे देव अवतरतो तिथे माया राहुच शकत नाही.मग तुम्ही म्हणाल की वरील गोष्टींमधे आणि साध्या गोष्टींमधे फरक काय आहे??म्हणजे चित्रपटातल गाण म्हणन आणि भजन म्हणन यात फरक काय्??याला उत्तर अस आहे की यात खुप फरक आहे.समजा तुम्ही हानिकारक किरणाचे उत्सर्जन होते त्या ठिकाणी काम करता.तुम्ही साधे कपडे घालुन काम केल तर तुमच्यावर ते किरण हानिकारक प्रभाव टाकतील पण जर तुम्ही विषीष्ठ कपडे घातले तर ते कपडे नकळत तुमचे संरक्षण करतील्.त्याचप्रमाणे God conscious गोष्टी करणे आणि त्याच प्रकारच्या ऐहीक गोष्टी करणे वेगवेगळे आहे.

तुम्हाला हे पटल का???अजुन प्रश्न विचारा मी उत्तर द्यायचा प्रयत्न करतो.

>>नक्कीच माया ही खुप अवघड आहे जिंकायला. पण ती जिंकल्याशिवाय सुख नाही.

चिन्या, इथे तुझ्यामते माया या शब्दाचा अर्थ काय? आणि""ती जिंकल्याशिवाय सुख नाही" हे समीकरण जरा स्पष्ट करशील?

भूमिका,
श्रवण भक्ती ही फक्त ईश्वराचे नाम घेण्यापुरती नसून त्यांत आत्मज्ञानाची सोयही असते. मागे याबाबत उल्लेखही आलाय की "कोणी एखादा" भक्त असाही असू शकतो की जो फक्त श्रवणभक्तीने मुक्त होईल. बाकी ज्यांना ते जमलं नाही त्यांच्यासाठी पुढची पायरी, किर्तन/मननाची. मग संतत स्मरण.. अशी चढती भाजणी आहे.

नुसते नाम घेण्यांपेक्षा ते नाम कुणाचे आहे, तो जो नामी आहे त्याचे आणि आपले नाते काय, या सर्व बाबी लक्षात घेऊन नाम घेतले तर त्यांत प्रचंड सामर्थ्य असते.

देवासाठी पक्वान्न बनवा? आणि ते खायला कोण विठोबा येणार नामदेवाकडे आला होता तसा..?? देवाचे चित्र काढा, देवाचे किर्तन गा.... मग मुळात बाकीची चित्रे आणि गाणी देवाने तयारच का केली ?? विचाराधीन आहात, मग देवाचाच विचार करावा... ऑपरेशन करणारा डॉक्टर, विमान चालवणारा पायलट, एखादा मोठा प्रॉब्लेम सोडवणारा इंजिनियर, देशाचा राश्ट्रपती, लोकल चालवणारा.... याना एकदा सान्गायला हवे.... काम करताना सगळे विचार सोडा आणि हरि हरि करत बसा म्हणून..... ( तुम्ही स्वत: एखाद्या विमानात बसलात की विमान उन्च उडाल्यावर पायलटला सान्गा... सगळे विचार व्यर्थ आहेत... फक्त हरि हरि कर रे बाबा...!!!! रस्त्यावरचे सुचना फलक, लोकलचे बोर्ड हे सगळे रन्गवणार्‍याना सान्गा .. तुमचे आयुश्य्य व्यर्थ आहे... चार देवाची चित्रे काढायची .. हे काय रन्गवत बसला..... आ$$$$ करायला लाऊन एकाग्र चित्ताने दात उपटणार्‍या डॉ. ला सान्गा... दाताची ऍनाटोमी विसर... फक्त हरी हरी कर..... ज्याने तुलाही ( व मलाही ) कायमची मुक्ती मिळेल !!!)

--------========-------------------

सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज |

इथे तुझ्यामते माया या शब्दाचा अर्थ काय? आणि""ती जिंकल्याशिवाय सुख नाही" हे समीकरण जरा स्पष्ट करशील
माया म्हणजे 'जे नाही ते'.ऐहिक गोष्टि ज्या आपल्याला देवापासुन दुर नेतात त्या म्हणजे माया आहे. माया जिंकल्याशिवाय सुख नाही म्हणजे मायेतुन अथ्वा ऐहिकतेतुन मिळणारे सुख क्षणिक असते.खरे,शाश्वत सुख मिळवण्यासाठी मायेला बाजुला सारावेच लागते.

बाकी ज्यांना ते जमलं नाही त्यांच्यासाठी पुढची पायरी, किर्तन/मननाची. मग संतत स्मरण.. अशी चढती भाजणी आहे.

नाही अस काही नाही.यापैकी कुठल्याही एका अथवा एकाहुन जास्त मार्गांनी मुक्ती मिळवता येते.त्यामुळे चढती भाजणी वगैरे नाही.श्रवण करुन परिक्षीत महाराजांनी मुक्ती मिळवली,नारदाने किर्तनाने,प्रह्लादाने स्मरणाने,इंद्रद्युम्नाने अर्चनम प्रमाणे,लक्ष्मी पादसेवनमने,ध्रुवाने वंदनम प्रमाणे,हनुमानाने दास्यम प्रमाणे,सुदामाने सख्यम प्रमाणे तर बलीने आत्मनिवेदनम्प्रमाणे मुक्ति मिळवली.तुम्हाला जो प्रकार सर्वात चांगला व सोपा वाटेल तो अनुसरावा.

नुसते नाम घेण्यांपेक्षा ते नाम कुणाचे आहे,
हे सर्वात महत्वाचे आहे.फक्त देवाचेच नाव घ्यावे.मंत्रही तयार करु नयेत तर जे मंत्र आहेत व अनेक संतांनी जे म्हणायला सांगितले आहे ते म्हणावे.

जागोमोहनप्यारे,स्वतःला फार शहाणा समजु नकोस्.कळल ना???इथे भुमिकाच नाही तर मीही आहे हे लक्षात ठेव.त्यामुळे 'त्या' इतर बाफ सारखी इथे टिंगल टवाळी करु देणार नाही मी.

बाकी मी वर दिलेल्या गोष्टी काहीही चुक नाहीत्.तुमचा दृष्टीकोणच चुकीचा असेल तर आम्ही काय करणार??या तुमच्यासारख्या 'विद्वानां'नी आधी रामायण्,महाभारताची बेसिक माहीती घ्यावी. हनुमान्,अर्जुन आमच्यासाठी आदर्श भक्त आहेत्.जर हरि हरी करत बसुन सगळे सोडणे आवश्यक असते तर ह्या लोकांनी युध्द लढुन जिंकवुन दिलेच नसते.तु जे सिग्नेचर दिले आहे ते सांगणारा कृष्णच तुमच कर्म करत रहा पण फळाची अपेक्षा ठेवु नका हेही सांगतो. त्याचा अर्थही आधी समजुन घे.डॉक्टरने काम करताना मनात असा भाव असावा की मी एका भगवंताच्या सेवकावर उपचार करत आहे,पायलटच्या मनात असा भाव असावा की या शेकडो लोकांना सुरक्षित पोहोचवण्याचे काम मला भगवंताने दिले आहे जे मी व्यवस्थित केले पाहीजे.तुझे काय प्रश्न्,विचार असतील ना ते व्यवस्थित विचार

धन्यवाद चिन्मय. चांगलं सांगितलं आहे तुम्ही.
(अवांतर : ही सगळी चर्चा वाहुन जाते का? )

चिनू, प्रथमत: "एखाद्याचा अनुल्लेख करणे" या उक्तीवर विचार कर.
असो, पुढे.

>>माया म्हणजे 'जे नाही ते'.
"जे नाही ते" म्हणजे काय? थोडं स्पष्ट कर अजून. आणि मग "जे आहे ते" काय आहे?

>>ऐहिक गोष्टि ज्या आपल्याला देवापासुन दुर नेतात त्या म्हणजे माया आहे.
मग ज्या ऐहि़क गोष्टी देवाकडे नेतात त्या माया नाहीत का? देवापासून दूर म्हणजे कुठे?

http://punerimisal.googlepages.com/boyfriend%21 ही लिंक बघा! डॉ. इरावती कर्व्यांचा लेख आहे.
.
'मधुरा भक्ती' बद्दल कुणाला काही माहिती असेल तर लिहा. वाचायला आवडेल.

मृणालिनी,

मधुरा भक्ति हा अतिशय सुंदर, पण त्याच वेळेस अतिशय वेगळा विषय आहे. याबद्दल अधिकारी व्यक्तिने बोलणेच श्रेयस्कर. याचे कारण म्हणजे बर्‍याचदां यांत फक्त लोकांना चघळायला नवीन विषय मिळतो आणि त्यापलिकडे काहीच होत नाही.

माझ्या मते ज्यांच्या मनात "विषयांची ओढ" थोड्याही प्रमाणात शिल्लक आहे, तिने/त्याने मधुराभक्तिबद्दल बोलू किंवा ऐकू नये.

मला नाही पटत तुमचे मत.... काम करताना माणसाने ते पूर्ण तन्मयतेने करावे.. इतके की कशाचेच भान राहू नये... मग यात परमेश्वराचे 'नाव' ही आले... एकदा नारदाला गर्व होतो... मी सतत नारायणाचे नाव घेतो.. तेंहा त्याची खोड मोडण्यासाठी विश्णू त्याला एका शेतकर्याकडे पाठवतो आणि सान्गतो की तो माझा खरा भक्त आहे.. नारद लपून छपून त्याचा पूर्ण दिनक्रम पहातो.. तो एका सर्वसामान्य माणसासरखेच काम करत असतो... रात्री फक्त झोपताना एकदाच देवाचे नाव घेत असतो..

नारद पुन्हा देवाला विचारतो की एकदाच नाव घेऊन तो श्रेष्ठ भक्त कसा? देव सान्गतो की तो दिवस भराची सर्व कामे पूर्ण करून मग माझे नाव घेतो.. तेच माझ्यासाठी खूप आहे.... व्रतान्च्या पुस्तकातील खुलभर दुधाची गोश्टही साधारणपणे हाच भाव वेगळ्या शब्दात सान्गते..

नाम स्मरणाबाबत माझे मित्रही मला सतत सान्गत असतात... पण माझे काही प्रश्न आहेत..... नामस्मरणात साधारणपणे राम, क्रुष्ण, दत्त, साइबाबा... अशा अनेक नावान्चा लोक उल्लेख करतात.... पण काळाचा विचार केला तर ही सर्व नामे फार अर्वाचीन आहेत.... रामाच्या पुर्वीही विश्व होते.. स्रुश्टी होती.... तेंहा देवाचे 'नाव' काय असायचे ? ही सर्व सन्स्क्रुत नामे आहेत.... मग अती प्राचीन काळात सन्स्क्र्त भाशेच्या आधेच्या काळात लोक कोणते 'नाव' घेत होते.. ? ते लोक परमेश्वराला कधी जवळचे नव्हते का?

याच सन्दर्भात माझा आणखी एक प्रश्न आहे... प्राणी पशू पक्षी हे देवाचे नाव/ नाम तोन्डाने घेत नसतात... पण याचा अर्थ ते देवापासून दूर असतात का? असेच असेल तर लहान मूल आणि त्याची माता यान्च्यामधल्याही नात्याला अर्थ उरत नाही.... कारण तेही आइचे नाव घेत नसते....

नामस्मरण करणारे बरेच लोक फार हिशेबी असतात असा माझा अनुभव आहे.... कुठले तरी एक फळ, नाम्स्मरणाचे एक टार्गेट यान्चा कुठे तरी एक बॅलन्स शीट ते मनात माण्डत असतात... ' मी एक तास जप केला' असे म्हणणार्‍या माणसाला माझा हाच प्रश्न आहे... 'मग उरलेले २३ तास तू देवापासून किन्वा देव तुझ्यापासून दूर होता का? आणि त्या २३ तासान्साठी असे अन्तर जर नव्हतेच दोघान्मध्ये तर स्वतंत्रपणे कुठलेतरी एक नाव एक तास घेऊन काय साधलेस? ' भक्ती एक भाव आहे... जो अव्यक्त असू शकतो असे मला म्हणायचे आहे.... बाकी व्यक्त असे सारे 'बहुतान्शी वेळेला' अवडम्बर असते... त्यात देवाशी नाते जोडण्यापेक्षा स्वत:चे समाधान करणे हाच बर्‍याच वेळेला उद्देश असतो.... माझा अनुभव तरी असा आहे...

जाणकारानी आणखी प्रकाश टाकावा......

======================----=====================

सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज |

चांगले विचार मांडले आहेत जगमोहन्.वरचा तुमचा प्रतिसाद पाहुन मला वाटले होते की तुम्हि विनाकारण इथे वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात. असेचं विचार मांडत रहा.
मला चिन्मयचं पटलं होतं पण ते फार अवघड आहे. चुक नाही. तुम्हि जे म्हणताय अगदी तसेचं लोक मीहि पाहिलेत. पण मला असं वाटतं की, काहि लोक तसे असल्याने सतत नामस्मरण करणे या क्रियेलाचं चुक ठरवणे योग्य नाही. तुम्हि नामस्मरण करा,त्याचं अवडंबर माजवु नका. बाकीचे काही का करो. तुमचं बघुन तेही शिकतील. (पण नारदासारखा गर्व होणंही फार साहजिक आहे,नाही का?).
खरं तर मी दोन्ही प्रकारचे लोक पाहिलेत्.एक ग्रुहस्थ नामस्मरण करत नाहीत पण सतत दासबोध वाचणे,प्रवचन देणे या गोश्टी करतात. ते मला अतिशय आवडतात.खुप म्रुदु,शांत स्वभाव आहे. त्यांना पाहुन असं वाटतं की,तांची भक्ती आतपर्यंत झिरपली आहे. त्यांचं मन शांत करुन गेली ती भक्ती. याउलट एक ग्रुहस्थ सतत पुजा अर्चा करतात,नामस्मरण करतात पण अतिशय असंतुष्ट आणि चिडचिडे आहेत.अवडंबर,दिखावाही खुप करतात. आता याचं कारण त्यांचा स्वभाव . नामस्मरणामुळे ते असे वागतात का? तर उत्तर नाही असेचं मिळेल. बघा पटतंय का.
बाकी " 'मग उरलेले २३ तास तू देवापासून किन्वा देव तुझ्यापासून दूर होता का? आणि त्या २३ तासान्साठी असे अन्तर जर नव्हतेच दोघान्मध्ये तर स्वतंत्रपणे कुठलेतरी एक नाव एक तास घेऊन काय साधलेस" --- हा प्रश्न बरोबर आहे. जाणकार उत्तर देतील.

सुप्रिया,
------
एक ग्रुहस्थ नामस्मरण करत नाहीत पण सतत दासबोध वाचणे,प्रवचन देणे या गोश्टी करतात. ते मला अतिशय आवडतात.खुप म्रुदु,शांत स्वभाव आहे. त्यांना पाहुन असं वाटतं की,तांची भक्ती आतपर्यंत झिरपली आहे. त्यांचं मन शांत करुन गेली ती भक्ती. ----

अगं त्यांनी नामस्मरण नाही केलं तरी ते भगवंताचे गुणसंकीर्तन करतात ही गोष्ट ही तेवढ्याच तोडीची आहे बरं! पुन्हा ते प्रवचन देतात म्हणजे उपस्थितांच्या मनात भगवत्भक्तीची ज्योत लावतायत याला विमल दान म्हणतात म्हणजे भक्तीचे दान. हे तर अतिशाय श्रेष्ठ आहे.
---

फारच शेलका प्रश्न विचारलांत जगमोहन Happy
वरील चर्चेच्या अनुषंगाने बोलायचं झालं तर कुठल्याही प्रकारची भक्ति करायची झाली तरी त्यामध्ये "२४ तास" (मी मुद्दाम हे विशेष अवतरण चिन्हांत लिहिलेय) भगवंताचं अनुसंधान (स्मरण) असलं पाहीजे.
प्रश्न असा पडतो की मग २४ तास म्हणजे त्यातल्या त्यांत जागे असतानाचे समजा साधारण १६ तास धरले तर तेव्हा सतत स्मरण ठीक आहे (ते सुद्धा अवघड आहे हो), पण झोपलेलो असताना किंवा जेव्हा स्वप्न पडत असतं तेव्हा अनुसंधान कसं असेल?
याचं उत्तर म्हणजे "होय, स्मरण राहू शकतं". कसं?
जेव्हा स्वप्न पडतं, तेव्हां तुम्हाला याची जाणीव असते की तुम्हाला काहीतरी दिसतंय, त्या दृश्यामधल्या सर्व परिस्थितीची तुम्हाला जाणीव होते, त्यातल्या भावनांची जाणीव होते. उदाहरणार्थ, मी एखादा वाईल्ड सफारीचा चित्रपट बघितला आणि झोपलो, तर कधीकधी एक वाघ माझ्या मागे लागलाय हे मला स्वप्न पडतं आणि मी जिवाच्या आकांताने पळत सुटतो, कुठे, स्वप्नांत. माझी छाती धडधडू लागते, कुठे, स्वप्नांत. म्हणजे वाघ हा माझ्याकडे गप्पा मारायला येत नसून तो मला खायला येतोय याची "जाणीव" कुठेतरी आपल्यांला आहे, थोडक्यांत ते आपल्यांला कळतं, त्याचं ज्ञान असतं, त्याचं स्मरण असतं.
तसंच, जर दिवसभर आपण (स्वतःचीच फसवाफसवी न करतां) हे अनुसंधान कायम ठेवलं, आणि थोडे दिवस असं करत राहीलं तर हा अनुभवही येतो की आपल्याला स्वप्नांतसुद्धा "स्मरण" राहतं.

दुसरी गोष्ट म्हणजे अनुसंधान हे सतत नाम घेणं नाही. उदा, समजा १ महिन्याने माझी बारावीची परीक्षा आहे. अशावेळी मी बाकीची कामं करत राहीन, आणि त्या कामासाठी जितका वेळ द्यायचा तितका देईनही पण कुठेतरी मागे या परिक्षेची सतत एक सूक्ष्म जाणीव राहील. यालाच अनुसंधान म्हणतात. आणि भगवंताचं जोवर असं अनुसंधान नाही तोवर मी समर्थांच्या व्याख्येनुसार भक्त नसून "विभक्त" राहतो. वरकरणी खूप सोपं वाटतं हे पण करायला गेलं की परवडत नाही.

बाकीच्या मुद्यांवरही बोलूया..

"जे नाही ते" म्हणजे काय? थोडं स्पष्ट कर अजून. आणि मग "जे आहे ते" काय आहे?
माया म्हणजे जे देवाशी संबंधित नाही ते सर्व. पण मुळात मायाही एका अर्थानी देवाशी संबंधित असतेच्.भगवान कृष्ण भगवद्गितेत सांगतात की माया ही पण त्यांची एक शक्ती आहे पण ती एक कमी दर्जाची शक्ती आहे.त्यामुळे जो प्रथम श्रेणितला भक्त असतो त्याला सर्वच लोक देवाचेच भक्त दिसतात कारण आपण एकतर देवाचे directly सेवक असतो किंवा मायेचे directly सेवक असतो.जे देवाचे सेवक नाहीत ते सर्व मायेचे सेवक आहेत्.त्यामुळे प्रथम श्रेणीतल्या भक्ताला मायेचे गुलामही देवाचेच भक्त वाटतात कारण माया ही पण देवाचीच एक शक्ती आहे.पण आपल्या स्वतःसाठी आपण मायेला सोडुन देवाच्या आहारी जाणे आवश्यक आहे नाहीतर आपण या ऐहीक जगातच अडकुन राहु व नेहमी दु:खी राहु.भगवंताला सोडुन बाकीचे सर्व तत्वज्ञान म्हणजे मायाच आहे.म्हणजे ऐहिक जगातल्या चांगल्या आणि वाईट दोन्हीही गोष्टी एका दृष्टीने वाईट आहेत कारण त्या आपल्याला या जगातच अडकवुन ठेवतात. हि सर्व माया आहे.

मग ज्या ऐहि़क गोष्टी देवाकडे नेतात त्या माया नाहीत का? देवापासून दूर म्हणजे कुठे?
ज्या गोष्टी देवाकडे नेतात त्या ऐहिक असुच शकत नाहीत्.देवाकडुन दुर म्हणजे याच ऐहिक जगात ज्या गोष्टि आपल्याला अडकवुन ठेवतात तिकडे.ऐहिक गोष्टी देवाकडे नेत असतील तर त्या ऐहिक रहातच नाहीत्.आता समजा एखाद्या भक्ताकडे लॅपटॉप आहे जो फक्त भगवद्भक्ती पसरवण्यासाठी वापरला जातो तर तो लॅपटॉप ऐहिक रहात नाही तो आपोआपच आध्यात्मिक होउन जातो. मी वर लिहिल आहे ना की जिथे सच्ची भक्ती असते तिथे देव असतो आणि जिथे देव असतो तिथे माया राहुच शकत नाही.

मृण्मयी ,लेख छान आहे पण त्यात एका ठिकाणी लिहिल आहे की देवाला सखा बनवता येत ,प्रियकर बनवता येत पण मुलगा बनवता येत नाही. अस काही नाही आता यशोदा, देवकी यांच्यासाठी देव पुत्र म्हणुनच अवतरला. शिवाय आध्यात्मिकतेत पुत्रप्रेमही देवाला उद्देशुन केले जाते.क्ष यांनी म्हटल्याप्रमाणे मधुरा भक्तीबद्दल आपण बोलण तितक बरोबर नाही. भागवताच्या १०व्या भागात मधुरा भक्तीची वर्णने आहेत पण ती वाचण्याआधी पहीले ९ भाग वाचण आणि समजवुन घेण आवश्यक आहे.

जागो मोहन प्यारे,आता तुम्ही जरा व्यवस्थित लिहायला लागला आहात्.तुम्ही दिलेली नारदाची गोष्ट अर्धवट आहे. त्याचा पुढचा भाग असा की नारदाने तो श्रेष्ठ कसा हे विचारल्यावर देव त्याला शेतकर्‍याकडे घेउन जातो.एका चमच्यात पाणि भरुन ते न सांडता चालायला सांगतो.मग नारदालाही सांगतो. तर नारद लक्ष पाण्यावरच ठेवतो,मग देव म्हणतो अरे तु तर मला विसरलास्.मग नारदाला कळत की शेतकरी जास्त चांगला का कारण तो सर्व परिस्थीतींमधे देवाला विसरत नाही. राम्,कृष्ण ही अर्वाचीन नावे नाहीत.शिवाय यांच्या अवताराआधी इतर मंत्र होते.कृष्णाच्या नंतर कलियुग सुरु झाले. त्याआधी इतर मार्ग म्हणजे योग मार्ग,कर्मकांड फळ देणारे होते.त्यामुळे त्या काळात त्या मार्गाने जाउन लोकांना भगवंताकडे जाता येत असे.प्राणी,पशुच काय तर कुठलाही जीव देवापासुन दुर नसतो.देव सर्वांमधेच असतो आणि प्रत्येक जीवाचे कर्म तो witness करत असतो.पण आपण मायेच्या आहारी गेल्यामुळे देवाशी आपला असलेला संबंध विसरतो.पण पशु,पक्षी यांच्या जिवनात त्यांना देवापर्यंत जाता येत नाही कारण त्यांना तितकी बुध्दी नसते.म्हणुन हा मनुष्य्जीव आपल्याला मिळतो ज्यामध्ये भगवद्भक्ती करुन देवाकडे जाणे हे आपले जीवनध्येय असले पाहीजे.पशु,पक्षी यांना मनुष्यरुपात येउनच मोक्ष मिळवता येत.१ तास जप करणारा मनुष्य २३ तास देवापासुन दुर नसतो तर २३ तास तो भगवंताशी असलेला संबंध विसरलेला असतो.भक्ती हा एक भाव असतो हे बरोबर आहे पण म्हणुन नामस्मरण कसे चुकीचे ठरते??मुळात सामान्य माणसास भक्त बनण्यास भरपुर प्रयत्न करावे लागतात्.तुम्ही ज्या हिशेबी लोकांबद्दल लिहिले आहे त्यांचे २ प्रकार असतात्.पहीला प्रकार म्हणजे नुसता दिखावा करणारे आणि दुसरा म्हणजे भक्त बनण्याचा प्रयत्न करणारे . पहीले लोक भक्त नसतात त्यांना भगवान कृष्ण pretenders म्हणतात तर दुसरे लोक पायर्‍या चढत आहेत्.अजुन पर्यंत ते वरच्या मजल्यावर पोहोचलेले नाहीत पण त्यांचे प्रयत्न चालु आहेत व भक्ती करण्याची त्यांची इच्छा sincere आहे.प्रत्येक गोष्ट करताना भगवंताला विसरले नाही की ती गोष्ट आपोआप God conscious होते.तुम्ही जे देवाला विसरुन एकाग्रतेने काम करायचे म्हणता ते पुर्णपणे ऐहिक आहे व क्षणिक आहे.सुप्रिया यांनी याबद्दल लिहिलेलेही बरोबर आहे. काहीकाहींचा स्वभावच दिखावेबाज असतो त्यामुळे ते प्रत्येकच गोष्टिचा दिखावा करतात.

http://www.maayboli.com/node/2654

क्रूपया ही लिन्क पहा... माझी शन्का थोड्या वेगळ्या शब्दात इथे आहे... कुणी या शन्केचे निरसन करु शकेल का? ........

===============

|| हरिण ओम ||

Happy हरिण ओम ही सिग्नेचर खास जगबुडीच्या बी बी साठी होती..... पण आता वाटते की तसे लिहिले म्हणुन फरक नाही पडणार.. हरि लिहा हरिण लिहा.... सगळे नमस्कार अखेर एकाच अकाउंट्ला जमा होतात.....

>>>माया म्हणजे जे देवाशी संबंधित नाही ते सर्व.

सर्वप्रथम माया ही शास्त्राने आपल्या सर्वांच्या सोयीसाठी तयार केलेली एक पद्धत आहे, प्रणाली आहे ही मुख्य गोष्ट लक्षात ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. ही माया सत्चिदानंद स्वरूपी श्रीकॄष्णावर आवरण घालते आणि त्याचे स्वरूप आपल्याला कळू देत नाही.

मायेचा अर्थ जे त्रिकालाबाधित सत्य नाही पण आपल्याला अज्ञानामुळे सत्य भासते ते सर्व. शास्त्रांमध्ये मायेचे गुण सांगितले आहेत त्यांतले काही असे,
अचेतन - ज्याला स्वभावत: ज्ञान होऊ शकत नाही. ज्याला उत्पत्ति, स्थिती आणि लय हे तीन दोष आहेत ते. उदाहरणार्थ: एखाद्या व्यक्तीचे शरीर. जे तयार होते, काही वर्ष टिकते आणि नंतर नाश पावते. किंवा हा कंप्यूटर, याला मी टाईप करतोय की आणखी कुणी याचे स्वभावत: ज्ञान नाही. (कोणी प्रोग्रॅम करून त्यांत ते घातले तर ते स्वभावतः झाले असे म्हणता येत नाही)

त्रिगुणात्मक - सत्व, रज आणि तम या गुणांपासून बनलेले सर्व मायिक असते. जसे पंचमहाभूतांमधला वायू हा रजोगुणापासून बनला आहे असे शास्त्र सांगते. त्यामुळेच तो चंचल असतो. आणि त्रैगुण्यविषयक असल्याने तो ही मायिक आहे.

इतरही आहेत पण ते आत्ता सांगत बसण्याचे प्रयोजन नाही.

मग तू जसे म्हणतोयस तसे असेल आणि देवाशी संबंधित असलेले माझे देवघर मायिक नसेल तर ते त्रिकालाबाधित सत्य आहे का? ते मोडून पडले, जळाले तरीही ते मायिक नाही?
देवाशी संबंधित असलेले मायिक नाही आणि बाकीचे सर्व मायिक ही वाटणी विसंगत वाटते आणि ती निराधार आहे.

फक्त श्रीकृष्ण एकच सत्य आहे, बाकी सर्व सर्व सर्व मायिक आहे.

>>म्हणजे ऐहिक जगातल्या चांगल्या आणि वाईट दोन्हीही गोष्टी एका दृष्टीने वाईट आहेत कारण त्या आपल्याला या जगातच अडकवुन ठेवतात. हि सर्व माया आहे.
नक्की काय? देवाशी संबंधित मायिक नाही असे वर म्हणतोयस आणि सर्व माया आहे असे खाली म्हणतोयस. नक्की काय समजायचं?

>>>त्यामुळे जो प्रथम श्रेणितला भक्त असतो त्याला सर्वच लोक देवाचेच भक्त....
प्रथम श्रेणीचा भक्त म्हणजे काय? भक्तीमध्ये श्रेणी कशी ठरवतात? मला इथे "विभक्त नाही तो भक्त" ही समर्थांची उक्ती अगदी योग्य वाटते. एकतर तुम्ही विभक्त आहात, तुम्हाला आत्मज्ञान झालेले नाही किंवा तुम्ही भक्त आहात, तुम्हाला ब्रह्मदर्शन झालेले आहे, आत्मानुभव आलेला आहे.

>>>ज्या गोष्टी देवाकडे नेतात त्या ऐहिक असुच शकत नाहीत्.... .. .. भगवद्भक्ती पसरवण्यासाठी वापरला जातो तर तो लॅपटॉप ऐहिक रहात नाही तो आपोआपच आध्यात्मिक होउन जातो

जर हा कंप्यूटर मायिक/ऐहीक नसेल तर त्याचा नाश होणार नाही, तो त्रिकालाबाधित सत्य राहील आणि ते अशक्य आहे.
आणि तो "आपोआपच" आध्यात्मिक होईल म्हणजे नक्की काय होईल बाबा?! मुळात आध्यात्मिक म्हणजे तुझ्यामते काय?
मुळात ऐहीक या शब्दाचा "जे इहलोकातले आहे ते" असा अर्थ होतो आणि तो आध्यात्मिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द म्हणून वापरता येणार नाही. आणि मग लॅपटॉप ऐहीक नाही म्हणजे "इहलोकातला नाही का" असा प्रश्न उद्भवतो? आणि त्याचे उत्तर सोपे आहे. परमार्थाची जी काही साधने आहेत ती सुद्धा ऐहिकच आहेत. इथलीच इहलोकांतलीच आहेत.
तुझी आध्यात्मिक या शब्दाची व्याख्या काही वेगळी असेल तर मला माहिती नाही म्हणून विचारली आहे.

>>सच्ची भक्ती असते तिथे देव असतो आणि जिथे देव असतो तिथे माया राहुच शकत नाही.
म्हणजे भक्ति नसेल तिथे देव नसतो का? भगवान श्रीकृष्ण गीतेत मी सर्वव्यापी वगैरे सांगतात ते काय चुकीचे आहे असे म्हणतोयस का?

जर हा कंप्यूटर मायिक/ऐहीक नसेल तर त्याचा नाश होणार नाही, तो त्रिकालाबाधित सत्य राहील आणि ते अशक्य आहे.
तो मायिक धातुंनी बनलेला आहे पण जोपर्यंत त्यावर कृष्णभक्तीचेच काम होत आहे तोपर्यंत तो Krishnaised झालेला असतो.आता आपण गणपतीत प्राणप्रतिष्ठापना करतोच ना???त्याचा अर्थ काय असतो की त्या मंत्रोक्तीनंतर गणपती त्यात वास करुन रहात आहे. तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे मंदिरातली मुर्तीही माया आहे का???त्या मुर्तीची पुजा म्हणजेही माया आहे का???

परमार्थाची जी काही साधने आहेत ती सुद्धा ऐहिकच आहेत.
पण ती माया नाही. ऐहिक जगत याचा अर्थ मी material world घेतलेला आहे.

भगवान श्रीकृष्ण गीतेत मी सर्वव्यापी वगैरे सांगतात ते काय चुकीचे आहे असे म्हणतोयस का?
ते बिल्कुल सर्वव्यापी आहेत्.कारण माया ही पण त्यांची एक शक्ती आहे.त्याचप्रमाणे सर्वव्यापी पण निर्विकार ब्रह्मच्या स्वरुपातील आहे.पण तरीही जिथे भक्त सच्च्या भक्तीने बोलावतो तिथे भगवंत त्या भक्ताच्या भक्तीत रममाण होतात्.आता हे चुक असेल तर संत म्हणतात की विठ्ठल किर्तनात नाचतो ते चुक आहे का???

भक्तीमध्ये श्रेणी कशी ठरवतात?
भक्तांमधे ३ stages असतात्.पहीली म्हणजे 'महा-भागवत' ,आणि तिसरी म्हणजे 'प्राकृत भक्त' आणि दुसरी या दोघांच्या मधली.

जागोमोहन्प्यारे तुमचे म्हणने हे आहे -
विषय खूप छान आहे. कधी कधी मलाही प्रश्न पडतो... आपण माणसे बर्याच वेळेला किती कॉन्ट्रावर्सी ठेऊन वागत असतो.... जगातले यच्चयावत धर्म षडरिपुना दूर ठेवायला सान्गतात... किम्बहुना तसे करण्याचे प्रयत्न यातूनच धर्म निर्माण झाले... मार्ग वेगळे... उद्देश एकच...
माझा प्रश्न याच्यापुढे आहे.... ८४ लक्ष योनींमधये मनुष्य योनी श्रेश्ठ मानली आहे... अर्थात हे देखील माणसानीच लिहिलेले मत आहे... उर्वरीत ( ८४ लक्ष -१) योनीनी अशा कोणत्या मताला लेखी दुजोरा दिलेला नाही... निर्माण करण्यार्यानेही गुणवत्ता यादी कुठे लावलेली नाही...... माणुस वगळता इतर प्राणी हे षड्रिपू पासून मुळातच मुक्त असतात.... गरजेनुसार काही वेळेला ते यान्चा वापर करत असतीलही... पण त्यान्च्यासाठी लिखीत धर्म नाही.... म्हणजे पाच पन्नास धर्म्ग्रन्थ वाचून जे माणसाला उमगते ( प्रत्यक्ष आचरण हा वेगळाच मुद्दा...) ते उर्वरीत ( ८४ लक्ष -१) योनीकडून आजन्म आमरण आचरले जातच असते... मग असे असेल तर माणूस देवाना जास्ती जवळचा आणि उर्वरीत ( ८४ लक्ष -१) मात्र 'खालच्या ' जातीचे हा सूर का आळवला जातो??? बहुतेक सर्वच धर्म असे मत मांडतात...
( ८४ लक्ष -१) हा एक गट आणि ( हिन्दु, मुस्लीम, ख्रिश्चन ..... आणि सर्व) हा एक गट.... मला हा माणसाने निर्माण केलेला दुटप्पीपणा वाटतो...

तुम्ही म्हणता की उर्वरीत योनींनी याला दुजोरा दिलेला नाही की मनुष्य श्रेष्ठ आहे.आता तुम्ही हे सिध्द करुन दाखवा की या इतर योनी मनुष्यापेक्षा कशा प्रकारे श्रेष्ठ ठरतात.मुळात तुमची ओळख मनुष्य ही permanent नाहीये.मागे तुम्हीही प्राणिच होता आणि पुढेही प्राणी होउ शकता. वास्तविक इतर प्राण्यांना इतकी बुध्दिमत्ता नाही की ते देव्,आध्यात्म्,निर्माता याबद्दल विचार करु शकतील.फक्त खाणे,झोपण्,वासना,संरक्षण या गोष्टितच प्राणी मग्न असतात्.पण मनुष्याची बुध्दिमत्ता नक्कीच श्रेष्ठ आहे हे मनुष्याने केलेल्या प्रगतीवरुन दिसुन येते.

>>तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे मंदिरातली मुर्तीही माया आहे का???त्या मुर्तीची पुजा म्हणजेही माया आहे का???
याचे स्पष्ट उत्तर होय असे आहे.
पण ही सुसंवादी माया आहे कारण ती आत्मदर्शनासाठी मदत करते. याचसाठी मायेचा महिमा गायला गेला आहे. जी माया आपल्याला श्रीकृष्णरुपापासून वंचित करते तीच माया भक्ति, मूर्ती, वैदिक तत्वज्ञान आणि उपासना यांसारख्या माध्यमातून, साधनातून आपल्याला भगवत्प्राप्तीसाठी पूर्ण मदत होते.
मंदिरातील मूर्ती ही एक माध्यम आहे आणि ती सुद्धा मायिक जगतातच आहे. तशा त्या नसत्या तर विध्वंसकांनी त्या मूर्ती फोडल्या कशा असत्या? त्यांची झीज झाली नसती.
मूर्ती, भक्त आणि भक्ती ही त्रिपुटी (तीन गोष्टींचा समुदाय) आहे. आणि भगवान म्हणतात ते सर्वव्यापी आहेत, सर्वत्र तेच आहेत. म्हणजे त्यांच्याशिवाय कोणीच नाही. जे काही आहेत ते सर्व तेच आहेत. जर असे असेल आणि आपण तरीही भक्त, भक्ती आणि विविध मंदिरातल्या विविध मूर्ती वेगवेगळ्या मानत असू तर त्यांच्या सांगण्यावर आपण विश्वास ठेवत नाही असे होते.

>>पण ती माया नाही. ऐहिक जगत याचा अर्थ मी material world घेतलेला आहे.
मग laptop पण material world मध्येच आहे ना? त्यालाच तर माया म्हणतात!

>>जिथे भक्त सच्च्या भक्तीने बोलावतो तिथे भगवंत त्या भक्ताच्या भक्तीत रममाण होतात्.आता हे चुक असेल तर संत म्हणतात की विठ्ठल किर्तनात नाचतो ते चुक आहे का???
अजिबात चूक नाही. हाच ईश्वर भक्ताच्या ओढीने आणि अपरिमित श्रद्धेने सगुण साकार होऊन किर्तनात येतो आणि नाचतोही. पण कोणाच्या? संतांच्या. इतक्या परमकोटीची भक्ती असेल तरच तो त्या सगुणसाकार रुपात येईल.
पण याचा अर्थ तिथे आधी देवाचे अस्तित्व नव्हते असे नाही. देव सर्वव्यापी सर्वसाक्षी आहे. तो कुठेही नाही असे नाही. प्रल्हादाने हेच हिरण्यकश्यपूला दाखवून दिले की तो अगदी निर्जीव खांबातही तितकाच आहे जितका माझ्यात आणि तुझ्यात आहे. नामदेवांच्या किर्तनी विठठल येऊन नाचायचा पण जोवर त्यांना विसोबा खेचरांनी देव सर्वत्र आणि सर्वव्यापी आहे हे शिकवले नाही तोवर त्या भक्तीला अपूर्णता होती. याचसाठी भगवान ऐश्वर्ययोगाच्या अध्यायात म्हणतात
तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ।
ददामि बुद्धीयोगं तं येन मामुपयन्ति ते ॥
असे जे भक्त असतात जे सतत माझ्या भक्तित रममाण होतात, त्यांनाच मी मोठ्या कृपाळूपणे बुद्धियोगाचे ज्ञान देतो.

>>भक्तांमधे ३ stages असतात्.पहीली म्हणजे 'महा-भागवत' ,आणि तिसरी म्हणजे 'प्राकृत भक्त' आणि दुसरी या दोघांच्या मधली.
थोडं अजून सांग याबद्दल, मला माहिती नव्हतं हे.

|| हरि ओम ||

माया म्हणजे ... परमेश्वराचा ( त्याच्या शक्तीचा ) अभाव. देव आहेच , म्हणुन त्यावर विश्वास ठेवणारे आस्तिक ( अस्ति कः पुरुषः ) त्याचबरोबर जिथे देव नाहि असा विचार उद्भवतो तिथे त्याचा अभाव असतो म्हणुन नास्तिक ( नः अस्ति इति ) ह्या शब्दाची उपपत्ति झालिये.

मनुष्य अर्थातच सर्व योनि मधे वरचढ आहे कारण जरी तो वासना , मैथुन, झोप, भुक, तहान ईत्यदि बाबतित ईतर प्राण्या सारखा असला तरी त्याला " तारतम्य " समजण्यासाठीचे सद सद विवेक बुद्धी दिलीये देवाने. हि बुद्धी ईतर प्राण्यात नाहि. प्राणी दुसर्याना मारुन खातात ( माणासाना हि ) पण हा त्यांचा स्वभाव धर्म आहे. ह्याचे त्यांना पाप लागत नाहि. पण तेच जर माणासाने एखाद्याचा खुन केला तर तो गुन्हा पाप होतो. कारण त्याला कर्माचा सिद्धंत लागु होतो.

दुसरे म्हणजे माया म्हणजे काय ह्याची व्याख्या अशी होवु शकते कि " देव हा ह्या द्रुश्य पसार्याच्या पलिकडे आहे. ( जिथे अवकाश संपते त्याच्यापुढेहि. ) मग ह्या सर्व विश्व पसारा चा अडथळा पार करुनच त्याच्याकडे जाता येते. मग ह्या सर्व विश्व पसारा चा अडथळा पार करायचा म्हणजे काय करायचे?

तर ज्या प्रमाणे आपल्या संत मंडळीनी म्हटलाय तसा त्याला अनुभवायचा.. कारण त्यानी तसा त्याला पाहिलेला असतो. ( विष कसे असते आणि त्याचे काय परिणाम होतात हे आपल्याला विष पिवुन बघयची गरज नसते. आपल्या आधीच्या पिढीने ते प्र्यत्यक्श अनुभवाने सांगितलाय तर आपण विश्वास ठेवतोच)

तसेच ह्या संत मंडळीनी त्याला पाहिलाय अनुभवलाय... तसाच आपणाहि बघायचा. मग ह्या " माया " नावाच्या सीमा रेषेला ओलंडने खुप सोप्पे होते. हा " प्रचंड , विकट, उत्कट , घननीळ , भोळा, काळा ..." हे सर्व संतांचे अनुभवाचे बोल आहेत. आपल्या आधी त्यानी त्याला पाहिलाय म्हणुन ते आपल्याला मदत करत असतात त्यांच्या लेखनातुन, ओव्यातुन, अभंगातुन.

८४ लक्श योनि नंतर मनुश्य जन्म मिळातो असे म्हणतात. म्हणुनच तर मनुश्य जन्म / योनि सर्व श्रेष्ठ आहे.

यात देवाने प्राण्या ना कमी दर्जा दिलाय असे म्हणायचे असेल तर काहि लोक तसे म्हणु शकतात.. पण मी वर म्हटल्या प्रमाणे देवाने मनुश्याला बनवलंच कशाला? तर सर्व प्राणि / स्रुष्टि बनवल्या नंतर देवाला प्रश्न पडला कि हे कोणीच ह्या सुंदर विश्वा बद्दल माझ्या बद्दल बोलत नाहित. तेव्हा आपला हा सत्य, नित्य, आनंन्द ,प्रेम साजरा करण्यासाठी देवाने मनुष्य बनवला. त्याने त्याच्या ह्या विश्वाची सहवेदना जाणावी... देवाला समजुन घ्यावे...यासाठी...

द्वैत अद्वैत इथेच उगम पावले... आधि देव एकच होता (अद्वैत - जसे १ बीज ) मग ह्या मनुष्य निर्मिती नंतर तो झाला ( द्वैत - जसे १ बीज पासुन एक व्रुक्ष बनतो, मग त्या व्रुक्षाच्या फळापासुन अनेक बीजे बनतात.. इथेच सिद्ध होते कि एक असा तो अनेक होतो म्हणजे काय होते ते)

-----------------------------------
भक्तांमधे ३ stages असतात्

भक्तांचे ३ भाग आहेत. उत्तम भक्त , मध्यम बह्क्त, अधम भक्त.
उत्तम भक्त ,
ज्याला देवाच्या मनातले काहिच सान्गावे लागत नाहि. न सांगताच काय योग्य काय अयोग्य, काय केले तर माझ्या देवाला अवडेल ह्याची समिक्शा असे भक्त स्वतःच करतात आणि तसे वागतात. जसे अर्जुन , प्रल्हाद ईत्यादी

मध्यम भक्त,
काहितरी ईछा / टार्गेट मनात ठेवुन हे येतात. ते पुर्ण झाले कि ह्यांचि भक्ति पण आटते. निदान त्या त्या वेळे ला तरि ते देवा ला मानतात्..मान ठेवतात.

अधम भक्त .
देवाला , त्याच्या शिकवणुकिला न मानता कसलेहि विधिनिषेध न बाळगता वर्तन करणारे हे असतात. " नर्मदेचे गोटे " " पालथ्या घड्यावर पाणी " ही म्हण ह्याना अचुक बसते.

हा विस्त्रुत विषय आहे. तुर्त इतकेच.

|| हरि ओम ||

ब्रह्म सत्य जगत मिथ्या: असे म्हटलेले चुक होईल. ब्रह्म सत्य आहेच... ह्या सत्यचीच अनुभुति घ्यायला देवाने निर्माण केलेले हे विश्व हे दुसरे सत्य आहे.

आपण प्रकाश कशाला म्हणतो? जिथे सुर्यप्रकाश असतो तो प्रकाश... पन मग अन्धार म्हणाजे काय तर जिथे सुर्यप्रकाश नसतो. मह्णजेच प्रकाशाचा अभाव. म्हणजेच ह्या अंधाराला अस्तित्वच नाहि. अस्तित्व आहे ते ह्या सुर्य प्रकाशाला. त्याच्या नसण्यावरच अंधारचे अस्तित्व अवलंबुन असते.

तसेच परमेश्वर आहेच... जिथे त्याचा अभाव तिथे अंधार / काळी विद्या / काळे साम्राज्य... / ( माया देखील ... )

म्हणजेच काय तर राम आहेच ... भक्त आहेच... पण जिथे ह्या रामाचा अभाव तिथे रावण जन्मतो... अभक्त जन्मतो...

ह्या अभक्ताला जेव्हा अनुभुति होते तेव्हाच हा रामाचा अभाव जाऊन त्या रामाच्या अस्तित्वाने पुनित झालेला आस्तिक / भक्त निर्माण होतो.

>>>माया म्हणजे ... परमेश्वराचा ( त्याच्या शक्तीचा ) अभाव.
भूमिका, हीच चर्चा वर चालली आहे. परमेश्वराचा अभाव कुठेही असू शकत नाही कारण तो सर्वव्यापी आहे. त्याची शक्तीही कुठे कमी कुठे जास्त अशी असत नाही. अभाव तर शक्यच नाही.
>>>म्हणुन त्यावर विश्वास ठेवणारे आस्तिक ...त्याचबरोबर जिथे देव नाहि असा विचार उद्भवतो तिथे त्याचा अभाव असतो म्हणुन नास्तिक ( नः अस्ति इति )
आस्तिक आणि नास्तिक याचे अर्थ बरेच बदलत राहीलेले आहेत. आस्तिक याचा मूळ अर्थ "वेदांच्या प्रामाण्यावर विश्वास ठेवणारे" असा आहे. अशी सहा मते भारतात आहेत, १.पूर्वमिमांसा २.उत्तरमिमांसा ३.सांख्य ४. वैशेषिक ५. न्याय ६. योग
नास्तिक म्हणजे साहजिकच वेदांचे प्रामाण्य नाकारणारे. अशीही सहा मते होती, त्यातली तीन जी अजूनही मोठ्या प्रमाणावर आहेत ती म्हणजे १. बौद्ध २. जैन ३. चार्वाक
चार्वाकांचे म्हणणे काहीसे आत्ताच्या नास्तिकांसारखेच होते, शरीर म्हणजेच आत्मा बाकी काही खरे नाही.
>>>तिथे त्याचा अभाव असतो म्हणुन नास्तिक ...
परत तेच सांगावसं वाटतंय की देवाचा "अभाव" असणं शक्य नाही. तो नाही असं वाटू शकेल, त्याच्यावर विश्वास नसेल, त्याचे अस्तित्व पूर्ण नाकारणं सुद्धा शक्य आहे. त्याची याच्याबद्दल काही तक्रार नाही. Happy पण तो तरीही सर्वव्यापी आहे, ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत "जो सर्वत्र सदा सम" आहे.
>>>तर ज्या प्रमाणे आपल्या संत मंडळीनी म्हटलाय तसा त्याला अनुभवायचा..
अगदी खरंय. पण तो अनुभव कसा असतो तर "आनंदाचे डोही आनंद तरंग.. तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा, अनुभव सरिता मुखा आला" अशा पद्धतीचा असतो. रुपाची वर्णने ही जेव्हा ईश्वर सगुण साकार रुपात येऊन काही क्षण दर्शन देतो त्याची आहेत. पण तो अंतर्धान पावल्यानंतर तो अनुभव संपतो. कायमचा राहणारा संस्कार जो तुकोबांच्या अभंगात "ओतलासे ठसा" म्हणून येतो, तो या सत्चिदानंदातल्या निरपेक्ष, निर्विषय आणि निर्हेतुक आनंदाचा ठसा असतो.
>>>द्वैत अद्वैत इथेच उगम पावले... आधि देव एकच होता (अद्वैत - जसे १ बीज ) मग ह्या मनुष्य निर्मिती नंतर तो झाला
देव पूर्वीही एकच आहे, आजही एकच आहे आणि उद्याही एकच आहे. यांतली शब्दयोजना लक्षात घेतली तर देवाच्या बाबतीत "काल होता, आज आहे आणि उद्या असेल" अशी कालमर्यादीत भाषा संभवत नाही कारण देव हे एकमेव अद्वितीय आणि कालातीत तत्व आहे.
>>>ब्रह्म सत्य जगत मिथ्या: असे म्हटलेले चुक होईल. ब्रह्म सत्य आहेच... ह्या सत्यचीच अनुभुति घ्यायला देवाने निर्माण केलेले हे विश्व हे दुसरे सत्य आहे.
सत्य - जे तिन्ही काळांच्या बंधनात नसते (कालनिरपेक्ष, त्रिकालातीत), समर्थ रामदासांच्या भाषेत "असतचि असे" असे जे काही ते सत्य. जे उत्पत्ति, स्थिती आणि लय या तीन अवस्थांच्या पलिकडे असते ते सत्य. जे सत्य असते, ते नेहमी तसेच, काहिही बदल न होता, त्याच्यांत कुठलाही बिघाड न होता, कुठेही उणीव न निर्माण होता राहते.
विश्व तसे आहे का? नाही. विश्वाचा जन्म झाला हे आपल्याला माहिती आहे, त्याला स्थिती आहे, आणि त्याचा लय होणार हे ही निश्चित आहे! मग ते सत्य कसे होईल?
>>>तसेच परमेश्वर आहेच... जिथे त्याचा अभाव तिथे अंधार / काळी विद्या / काळे साम्राज्य... / ( माया देखील ... )
त्याचा अभाव कुठेही होणे शक्य नाही. कारण फक्त तोच आहे, दुसरे काहीही कुठेही नाही. "या उपाधीमाजी गुप्त, चैतन्य असे सर्वगत। ते तत्वज्ञ संत स्विकारीती॥"
या ब्रह्मांडांच्या उपाधीमध्ये गुप्त असलेले आणि "सर्वगत" म्हणजे सगळीकडे असलेले हे चैतन्य, देव, विठ्ठल, राम, कृष्ण अशा अनेक नामांनी प्रसिद्ध असलेले, तेच चैतन्य फक्त लक्षात घ्यावे.
मायेला काळे साम्राज्य, काळी विद्या वगैरे कसे म्हणता? ही जगदंबा माया, जिची कृपा झाल्याशिवाय तुमच्या आमच्यासारख्यांच्या मनात देवाबद्दल, भक्तिबद्दल ही उत्सुकता निर्माण होणे अशक्य आहे. ती या अखिल जगताची माता आहे. ती प्रकृती आहे, ती इतकी सामर्थ्यवान आहे की आचार्य म्हणतात ती मूळमाया प्रत्यक्ष ब्रम्हा, विष्णू आणि महेश या देवतात्रयीची उत्पत्ति, स्थिती आणि लय पाहते. म्हणजे ब्रह्मांडाचे जन्म स्थिती आणि मृत्यु तिच्या साक्षीने होतात. इतकी सामर्थ्यवान माया काळी विद्या नाही हो!
>>>म्हणजेच काय तर राम आहेच ... भक्त आहेच... पण जिथे ह्या रामाचा अभाव तिथे रावण जन्मतो... अभक्त जन्मतो...
रामाचा अभाव शक्य नाही. जितका तो तुमच्या आमच्यात आहे, तितकाच तो अभक्तांत आहे, रावणांत होता. अहो ज्याला साक्षात रामाकडून मरण आलं, ज्याच्यासाठी देवाने अवतार घेतला, त्याच्यात देवाचा अभाव होता असे कसे म्हणाल?
>>>ह्या अभक्ताला जेव्हा अनुभुति होते तेव्हाच हा रामाचा अभाव जाऊन त्या रामाच्या अस्तित्वाने पुनित झालेला आस्तिक / भक्त निर्माण होतो.
यांतले "अनुभूती जेव्हा येते तेव्हा तुम्ही भक्त होता" हे अगदी योग्य विधान आहे. पण परत, रामाचे अस्तित्व अभक्तांतही तितकेच, दगडधोंड्यामध्येही तितकेच आणि तुमच्या माझ्यामध्येही तितकेच.

बाकी मराठी टायपिंगची छान सवय झालेली दिसतेय आता तुम्हाला Happy

नमस्कार,

इथे छान चर्चा सुरू आहे.

एक सुंदर वाक्य मी वाचले आहे ते देतो.

सच्चित्सुखघन गुरुबोधदीप हा घेउनी पाहु गेलो कृष्ण
पाहता पाहता पाहणे खुंटले स्वयं झालो कृष्ण!

धन्यवाद.

तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे मंदिरातली मुर्तीही माया आहे का???त्या मुर्तीची पुजा म्हणजेही माया आहे का???
याचे स्पष्ट उत्तर होय असे आहे.

नाही हे चुकीचे आहे. मुर्ती material elements नी बनलेली आहे पण ती माया नाही.ती spiritual आहे. आपल्या भक्तासाठी भगवान स्वतः तिथे येतात.

तशा त्या नसत्या तर विध्वंसकांनी त्या मूर्ती फोडल्या कशा असत्या? त्यांची झीज झाली नसती.
मुर्तीमध्ये देव येतो असे मी म्हटले आहे ,मुर्ती म्हणजेच देव आहे असे नाही.

आणि भगवान म्हणतात ते सर्वव्यापी आहेत, सर्वत्र तेच आहेत.
हो पण ते 'असणे' वेगवेगळ्या प्रकारचे आहे. एक म्हणजे भगवान स्वतःच्या सच्चिदानंद शरीरासकट आहेत. याला 'भगवान' स्वरुप म्हणतात. दुसर म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात ते आत्म्याबरोबर आहेत्.याला परमात्मा स्वरुप म्हणतात्(आत्मा आणि परमात्मा वेगळे). आणि तिसरे म्हणजे या ऐहिक जगातील कणाकणात ,प्रत्येक अणुमध्ये ते आहेत.याला निर्गुण्,निराकार ब्रह्म म्हणतात. हा यातील फरक आहे.भगवान कृष्ण सर्वव्यापी आहेत का???हो ते आहेत.पण ते निर्गुण्,निराकार ब्रह्मच्या अवस्थेत आहेत्.पण मंदिरातील मुर्तीमध्येही ते त्याच स्वरुपात आहेत का???तर नाही.ते स्वरुप वेगळे आहे.आपल्याकडची मुर्ती ही deity आहे idol नाही.मंदिरातील मुर्ती व रस्त्यावरचा पुतळा अशा प्रकारचा यातील फरक आहे.त्यामुळे मंदिरातील मुर्ती ही माया नाही.

मग laptop पण material world मध्येच आहे ना? त्यालाच तर माया म्हणतात!
तो material elements नी बनवलेला आहे पण तिथुन फक्त भगवद्भक्तीचे काम होत असेल तर तो spiritual होतो.

तो अगदी निर्जीव खांबातही तितकाच आहे जितका माझ्यात आणि तुझ्यात आहे.
देव absolute आहे त्यामुळे त्याच्यासाठी spiritual आणि material असा भेद महत्वाचा नाही.देव कधीही material ला spiritual करु शकतो.त्या न्यायाने तो खांबातुन अवतरीत होतो.देव absolute आहे त्यामुळे त्याचे नाव्,त्याचे शरीर यात फरक नाही. त्यामुळे जेंव्हा तुम्ही भक्तीने त्याचे नाव घेता तेंव्हा तुम्ही त्याच्याबरोबर असता.दुसर म्हणजे देवाने जेंव्हा जेंव्हा या ऐहिक जगात अवतार घेतला तेंव्हा तेंव्हा त्याचे शरीर इतरांसारखे नव्हते.त्याचे शरीर आध्यात्मिकच होते.त्यामुळे आपण कृष्णाचे चित्र कधी म्हातारे बघत नाही.त्यामुळे जरी आज त्याचे शरीर नसले तरिही त्याचे शरीर म्हणजेही माया होती हे म्हणने चुक आहे.

बाकी stages बद्दल चुकुन मी उलट दिल आहे मागच्या पोस्टमधे.पहीली stage आहे कनिष्ठ अधिकारी किंवा प्राकृत भक्त. हे म्हणजे साधारण लोक जे प्रयत्न करत आहेत भक्त बनण्याचा पण जे अजुनपर्यंत खर्‍या अर्थानी भक्त बनलेले नाहीत्.यांना देवाला आठवण्याचा,लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा लागतो. सर्व rituals यांच्यासाठी असतात. दुसरी stage आहे मध्यम अधिकारी आणि तिसरी stage आहे उत्तम अधिकारी किंवा महा भागवत. याच उत्तम अधिकार्‍यांना परमहंस ही म्हणतात्.यांना सर्व लोक भगवंताचेच भक्त दिसत असतात्.पुर्णपणे मायेमध्ये लीन असलेले भक्तही त्यांना भगवद्भक्तच वाट्तात कारण ते मायेचे सेवक असतात व माया ही पण भगवंताचीच शक्ती आहे.यांना भगवंताला विसर पडतच नाही. ते सगळीकडे भगवंताला बघतात व भगवद्भक्ती त्यांच्यासाठी spontaneous असते.त्यांच्या भगवंताबरोबर लीलाही चालु असतात्. दुसरी stage ही या दोघांच्या मधली असते. यांना भक्त कोण ,विभक्त कोण हे दिसत असते पण यांच्यासाठी भगवद्भक्ती कष्टाची नसते.श्रीमद भागवतम ११.२ मधे हे दिलेले आहे.

Pages