इंजिनीयरींगचा सोहळा-३-चित्रांची कला आणि के.टी प्रकरण

Submitted by सुमेधा आदवडे on 17 August, 2010 - 02:49

याआधीचे भागः
इंजिनीयरींगचा सोहळा-१-बारावी उवाच पण प्रवेश हवाच!
इंजिनीयरींगचा सोहळा-२-पहिला मान रॅगींगचा..

पहिली सेमिस्टर झाली आणि दुसर्‍या सेमचे लेक्चर्स पण चालु झाले. कॉलेज मधले सगळे दिवस मजेचेच, पण सम अंकी सेमीस्टर्स नेहमी दुप्पट धमालीच्या असायच्या. सगळे फेस्टीवल्स, गॅदरींग्स, सीम्पोझियम्स*, तसेच सगळे स्पोर्ट इवेन्ट्स ह्याच सेम मधे व्हायचे. रोज काही ना काही नवीन. असाईनमेंट्स, जर्नल्स, सर्प्राईझ टेस्ट्स आणि परिक्षेच्या राक्षसांच्या जाचाने रंजले-गांजलेल्या आमच्या जीवांना, २ दिवस चालणारा "उत्सव"(कल्चरल फेस्टीव्हल) हा आमचा खर्‍या अर्थाने जीवाची मुंबई करण्याचा उत्सव असायचा. तसेच "स्फुर्ती" हा आमचा २ महिने चालणारा क्रीडा मोहत्सव प्रचंड जल्लोषात पार पडायचा. आमच्या कॉलेजचा वार्षिक अंकही ह्याच सेम मध्ये निघायचा. पहिल्याच वर्षी त्यात प्रकाशनासाठी पाठवलेल्या कवितांपैकी माझी एक कविता निवडली गेली होती. सगळं कसं मजेत चाललं होतं.

दुसऱ्या सेमचा सर्वात महत्वाचा विषय म्हणजे "इंजिनीयरिंग ड्राईंग". खरंतर लहानपणापासुन चित्रकलेचा विषय म्हणजे झाडं,डोंगर,त्यातुन डोकावणारा डोळे आणि स्माईल वाला सुर्य,मधुन वाहणारी नदी,चार-पाच घरं,झालंच तर दोन-तीन माणसं आणि गाय-बैल,पक्षी..एवढं काढण्याइतपतच मानाचा होता. पण नव्वी-दहावी पासुन बारावीपर्यंत विज्ञानाच्या अनेक किटकांनी,जीवांनी माझ्याकडुन आपल्या "बेस्ट असिमीलेटड’ (अर्थात माझ्याच मते!) फिगर्स काढुन घेतल्या. पण आताची ही चित्रकला म्हणजे खुप वेगळं प्रकरण होतं. ह्यात वेगवेगळ्या मशीन्स,हत्यारं आणि इतर नानाविध अभियांत्रीकी उपकरणं वरुन,उजव्या-डाव्या बाजुने आणि आणखी कितीतरी वेगळ्या कोनांनी,बाजुंनी कशी दिसतील तशा अनुकुल अकृत्या काढायचे उपक्रम राबवले जायचे. त्यांना टॉप व्ह्यु,फ्रंट व्ह्यु,साईड व्ह्यु अशी नावं दिली जायची. आता वाघ म्हटलं तरी खातो,वाघोबा म्हटलं तरी खातो. मग एकच मशीनच्या इतक्या वेगवेगळ्या बाजुंनी,कोनांनी अकृत्या काढुन काय तिला लग्नाला उभी(?) करायची आहे का? काही डॅंबीस कार्टी वरच्या मजल्यांवरुन किंवा आजुबाजुने कॉलेजातल्या ललनांना पाहुन त्यांचे काही व्ह्युज कसे असतील अशा चर्चाही करायचे..वात्रट मेले! पण इंजिनीयरींग असंच असतं..बहुतांशी गोष्टी आपण का करतोय ह्याची तीळमात्रही जाणीव नसताना त्या कराव्या लागतात,आणि सगळे करतात तशाच आणि त्याच पद्धतीने कराव्या लागतात. मग कोणाला नाही पटलं की "यहॉं का पुरा सिस्टमही खराब है यार!" असा जाड तारेने शंभर वेळा घासुन घासुन गुळगुळीत झालेला डायलॉग टाकुन ते ध्यान समाधान मिळवतं आणि पुन्हा आकृत्या काढण्यात गर्क होतं.

युद्धावर जाणाऱ्या प्रत्येक शिपायाकडे जितकी वैविध्यपुर्ण आयुधं नसतील, तितकी आम्हा ड्राईंगच्या विद्यार्थ्यांकडे असायची. मोठमोठ्या कागदांच्या गुंडाळ्या घातलेले भात्यासारखे रोलर्स,एका ठिकाणी घट्ट बसवलं की अख्ख्या ड्राईंग पेपरवर चमत्कारिकपणे फिरुन फुटपट्टी आणि भुगोलातल्या अनेक साहित्याचं एकट्या जीवाने काम करणारं लोखंडी अवजड ड्राफ्टर,कमीत कमी चार ते पाच प्रकारच्या वेगवेगळ्या पेन्सिलच्या लेड्स, समांतर रेषांसाठी लांबट फिरणाऱ्या नळीला जोडलेली पट्टी ही त्यातली काही अनिवार्य साधनं होती. एवढं सगळं रोज कॉलेजला बसमधल्या गर्दीत घेऊन जायचं म्हणजे आपलं बिऱ्हाड रोज पाठीवर घेऊन फिरण्यासारखं असायचं. एकदा घरी जाताना अशाच एका खुप गर्दी असलेल्या बसमध्ये आम्ही चार-पाच जणं चढलो. सगळं सामान बसमधल्या वरच्या सामानाच्या कप्प्यात टाकुन मागे उभं रहायला गेलो. आमच्यातल्या एकाचं ड्राफ्टर बसच्या हलचालीने पिशवीतुन किंचीत बाहेर डोकावत होतं ह्याकडे आमचं बोलण्याच्या ओघात लक्ष गेलं नाही. आणि जे घडायचं तेच घडलं! बसला जोरात ब्रेक लागल्यावर ड्राफ्टर पिशवीसकट खालच्या सीटवर बसलेल्या एका गाववाल्या बाईच्या डोक्यात दाणकन पडलं! तिने जी शिव्यांची लाखोळी वहायला सुरूवात केली...त्याक्षणी आमच्या मित्राच्या सगळ्या जन्मलेल्या-न जन्मलेल्या पिढ्यांचा मोठा आदरसत्कार झाला! ती पिशवी कोणीतरी उचलुन पुन्हा वर ठेवली...पण आमच्यापैकी कुणीच बसच्या समोरच्या भागात जाण्याचं धाडस केलं नाही!

"छापणे" हा महत्वपुर्ण विधी असाईनमेंट्स,टेस्ट्स आणि जर्नल्स पर्यंत मर्यादित न राहता ड्रॉईंगच्या किचकट आकृत्यांपर्यंतही पोहोचला होता. काचेच्या टेबलाखाली विजेचा दिवा लावुन टेबलाच्या खालच्या बाजुने चिकटवलेल्या तयार अकृत्यांच्या कागदावरुन वरच्या मोकळ्या कागदावर जिथल्या तिथे सगळ्या अकृत्या गिरवता यायच्या.त्याला ग्लास ट्रेसींग म्हटलं जायचं. बाकी कुठे डोकं वापरायची तसदी घेतली नाही तरी इंजिनीयर्स अशा उपक्रमांत हमखास अनेक शकली लढवतात.

तर अशी अभियांत्रीकी चित्रकला चित्कारत...आपलं चितारत असताना हळूहळू लक्षात येऊ लागलं की पहिल्या सेमीस्टरच्या रीझल्टची वेळ जवळ येत आहे. लेक्चर्स संपल्यावर घरी जाताना रोज मुद्दाम वळसा घालुन मोठ्या नोटीसबॉर्ड जवळुन चालत जाऊन एक कटाक्ष टाकुन पुढे जायचे प्रकार होऊ लागले. प्रत्येक दिवशी किमान एकदा तरी कानांवर यायचं "आज व्ही..जे.टी.आयमें रीझल्ट लगनेवाला है!" आणि तिकडे लागला म्हणजे संध्याकाळपर्यंत, फार फार तर उद्या पर्यंत आपल्या कॉलेजला पण लागणार! विचारानेच पोटात मोठ्ठा गोळा यायचा. एक तर मला पाच मधुन ३ पेपर खुप वाईट गेले होते..आणि त्यातल्या त्यात एक तर एकदमच बेकार! माहित असलेल्या आणि नसलेल्या, एरव्ही डोक्यातही न येणार्‍यासुद्धा सगळ्या देवी-देवतांना साखडं घालुन झालं होतं. दिवे आपण लावायचे आणि आग लागल्यावर विझवायला देव आहेच ह्या समजुतीला "आशावाद" हा खुप गोड शब्द सापडला होता.
स्फुर्तीचा सीजन चालुच होता. एक दिवस आमच्या वर्गाची क्रीकेट मॅच होती. आमच्यातली मुलं खुप मस्त खेळली आणि दणक्यात जिंकलो. सगळे जल्लोषात घरी निघालो. घरी पोहोचताच रिझल्ट लागल्याचा कोणी तरी मला फोन केला. त्याला माझा सीट नंबर सांगुन घरात येरझार्‍या घालत बसले. "अगं होशील पास...तू एवढी हुशार आहेस!" आईच्या वाक्याकडे लक्ष द्यायची आणि इंजिनीयरींगचा आणि हुशारीचा तसा "वेगळाच" संबंध आहे हे तिला समजावण्याची माझी मन:स्थिती नव्हती. थोड्या वेळाने पुन्हा फोन आला. शेवटी ज्याची भिती होती तेच झालं. दोन विषय गेले होते....म्हणजे २ के.ट्या (के.टी चं अनेकवचन, अनेक वचनं मोडल्यामुळं) होत्या. मी आयुष्यात पहिल्यांदा एखाद्या विषयात नापास होणं काय असतं हे अनुभवलं होतं. पण तरी अपेक्षीत नसलेला विषय सुटला होता. आणि जरा बरा गेलेला पेपर अडकला होता.....अहो,कसं काय म्हणुन काय विचारता? आफ्टर ऑल इट्स इंजिनीयरींग! इथे जितक्या मार्कांचा पेपर सोडवला त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळुन तरीही नापास होण्याचे प्रकार होतात. त्यात माझी काय गत?

दुसर्‍या दिवशी कॉलेजात अखंड जनप्रवाह. फक्त आमावस्या-पौर्णीमेला लेक्चर्सला बसणारे चेहरेही दिसत होते. काही विशिष्ट भाग सोडला तर जवळजवळ सगळेच मोठमोठ्याने हसत होते,जल्लोष करत होते. "अख्ख्या कॉलेजात आपल्यालाच के.टी आहेत की काय?" असा प्रश्न ही येऊन गेला मनात. हळूहळू सगळ्यांचे मार्क्स कळले आणि आश्चर्य द्विगुणीत झालं. पाचही विषयात के.टी लागलेले काही महाभाग मैदानात क्रीकेट खेळत होते. काही जण प्रचंड चर्चा केल्यावर मार्क्स बदलतील अशा भाबड्या विश्वासाने चर्चासत्र घेत होते. आमच्या ६४ संख्येच्या वर्गात १७ मुलं "ऑल क्लीयर" म्हणजे पाचही विषयात पास झालेली होती. हे प्रमाण बघता आणि आपल्यासारखेच अनेक समदु:खी भेटल्यावर माझं मन बऱ्यापैकी हलकं झालं. त्याच दरम्यान कुणीतरी "वो बाप ही क्या जिसकी बेटी नही, वो इंजिनीयरही क्या जिसको के.टी नही" असं पाणचट तरी प्रसंगाला आणखी हलकं करणारं वाक्य फेकलं. ए.टी.के.टी चं "लाऊड टू कीर्म" ह्या साहेबाच्या भाषतेल्या भसाड्या नावाचं वस्त्रहरण करुन "थोडा थोडा" असं आशावादी नाव पडलं होतं. म्हटलं ना....आशावाद महत्वाचा!

आता पुढे दुसर्‍या सेमचे पाच आणि के.टी चे दोन अशा सात विषयांना तोंड द्यायचं होतं. त्यावेळेस वर्षभरात चार पेक्षा अधिक के.टी असतील तर "ड्रॉप" (पाण्याचा नव्हे)..एका अभियांत्रीकी वर्षास ड्रॉप लागण्याचा म्हणजे घरी बसण्याचा नियम होता. ज्यांना ४ पेक्षा जास्त के.ट्या होत्या त्यांना जास्त धोका होता आणि त्याच्या दुप्पट प्रमाणात मेहनत पण घ्यावी लागणार होती. माझी परिस्थिती जSSराशी बरी होती.

तितक्यातच कोणीतरी "रीचेकींग" नावाचं पिल्लु सगळ्यांच्या डोक्यात सोडलं. ते असं वळवळायला लागलं की युनीव्हर्सीटीत जाऊन दोन्ही विषयांचे पेपर काही पैसे भरुन पुनर्तपासणीसाठी दिले. आमच्या सारखी अनेक निरागस लोकं ह्या सत्कार्यासाठी तिथे आली होती...आशावाद हो...दुसरं काय? रांगेत उभं असताना पास झालेल्यांच्या सीट नंबर्सची यादी पाहिली...काऊंटर उघडेपर्यंत नुसतं उभं राहुन करणार काय, म्हणुन मी आणि माझ्या मैत्रीणीने त्या यादीतली संख्याही मोजली. २००० च्या आसपास होती. काही महिन्यांपुर्वी व्ही.जे.टी.आयला पाहिलेला "टोटल अ‍ॅडमिशन्स डन" चा १५००० चा आकडा नजरेसमोर आला आणि हे प्रमाण लक्षात आल्यावर फक्त भोवळ यायची बाकी होती. असो. आता "रीचेकींग" च्या निकालाची वाट पहायची आणि दोन्ही परिक्षेंचा आभ्यास करायचा.के.टीच्या परिक्षेच्या आधी हा निकाल आला आणि एखादा विषय सुटलेला असला, तर तेवढंच कमी दडपण,असा साधा हिशोब होता. पण तसं काही झालं नाही.

के.टीची परिक्षा झाली. दुसर्‍या सेमीस्टरच्या पहिल्या पेपरचा दिवस उजाडला. खुप पाऊस पडुन गेला होता. म्हणुन बसची वाहतुक बर्‍यापैकी मंदावली होती. माझं केंद्र सायनला...घरापासुन तासा-दीड तासाच्या अंतरावर...११ चा पेपर आणि १०.०५ झाले तरी मी स्टॉपवरच उभी...पुन्हा के.टी ह्या अक्षरांना नजरेसमोर आणुन आसवं गाळत! एक बस थांबायला तयार नाही! अखेर एका दयावान मुलीला माझा कळवळा आला आणि माझ्याजवळ येऊन तिने विचारपुस केली. तितक्यात ठाण्याची एक बस थांबली. तिने पटकन निर्णय घेऊन मला त्यात चढवलं आणि म्हटली आपण बेलापुर वरुन टॅक्सी करुन जाऊ...पण माझी पैशांची मारामार! बस चा पास असल्यामुळे फार पैसे जवळ नसायचे त्यावेळी. त्यातही तिने पुढाकार घेतला, बेलापुरहुन टॅक्सी केली, आणि वाटेत "मी माझ्या पेन आणि पेन्सील्सचं पाऊच घरीच विसरले!" ह्या माझ्या मोठ्ठाल्या वेंधळेपणाबद्दल ऐकुन कपाळावर हात मारुन घेतला. ११.०५ ला केंद्रात पोहोचलो. बरीच जणं माझ्या सोबत धावत होती वर्गात जायला...म्हणजे मी एकटीच उशीरा आले नव्हते. बिचार्‍या त्या ताईने कुठूनसं मला पेन आणुन दिलं. सगळ्यांनाच अर्धा तास वाढवुन देण्याचं जाहीर झालं आणि मी जोशात पेपर सोडवला.

के.टी.च्या परिक्षेचा निकाल लागला. माझे दोन्ही विषय सुटले होते. ह्या रीझल्टच्या दुसर्‍याच दिवशी रीचेकींगचा रीझल्ट आला, "नो चेंज इन मार्क्स" ठिके..आता काय फरक पडत होता तसंही? पण आमच्यातल्या एकाचे मार्क्स खरंच वाढुन त्याचा एक विषय "रीचेकींग"ने सुटला होता...जो त्याने के.टी.च्या परिक्षेत पास होऊन पण सोडवला होता! शब्दश: "बेस स्ट्रॉंग" करणं यालाच म्हणतात का?
दुसर्‍या सेमीस्टरचा पण निकाल लागला. मला सगळे विषय सुटून चक्क फर्स्ट क्लास मिळाला होता. हवेत उडण्याइतपत जल्लोष तरी नक्कीच केला होता त्यावेळेस.
एव्हाना इंजिनीयरींगमध्ये आम्ही चांगलेच मुरायला लागलो होतो.त्यामुळे काही बेसिक व्याख्या अगदी तोंडपाठ झाल्या होत्या.त्यातल्या काही म्हणजे...

इंजिनीयरींग कॉलेज: बारावीत चांगले मार्क्स मिळवल्याबद्दल तुम्हाला लाभलेलं कारागृह
सिनीयर: आदल्या वर्षी रॅगींगमध्ये स्वत:च्या झालेल्या आपमानाचा वचपा काढायला टपलेलं ध्यान
फ़्रेशर(तवाने): कॅंटीन कहा है? हा प्रश्न निरागसपणे विचारणारं ध्यान
बिनडोक फ़्रेशर: वरील प्रश्न सिनीयरला विचारणारं ध्यान
अगदीच बिनडोक फ़्रेशर: कॅटीनसाठी सिनीयरच्या मागे जाणारं ध्यान
रॅगींग:आदल्या वर्षीच्या मुर्खांच्या फुटक्या नशीबाचं तुमच्यावर फुटणारं खापर
लेक्चर:वेळेचा अपव्यय. टाईमपाससाठी, असाईनमेन्ट्स छापण्यासाठी, आणि ताणुन देण्यासाठी केवळ शारिरीक उपस्थिती आवश्यक
ट्युशन्स:तुमच्या वेळेचा पुरेपुर अपव्यय होत नसेल तेव्हा आवश्यक
प्रोफेसर: विद्यार्थ्यांना झोपवण्यासाठी पैसे घेणारे विद्वान
प्रॅक्टीकल: ती ६०-९० मिन. जेव्हा तुम्ही तुमच्या ग्रुपमधल्या मुलींना प्रयोग करताना बघता बघता बऱ्यापैकी साधनांची वाट लावता.
बिनकामाचं प्रॅक्टीकल: ज्यात तुमच्या ग्रुपमध्ये एकही मुलगी नसते,तुम्ही नुसतंच सगळ्या साधनांशी खेळत बसता आणि नंतर सगळ्या रीडींग्स कॉपी करता (अर्थात मुलींकडुनच!)
झेरॉक्स मशीन: इंजिनीयर्सच्या आयुष्यातली सर्वात महत्वाची मशीन ज्याशिवाय असाईनमेंट्स अजीबात होऊ शकत नाही
लेडिज कॉमन रूम (LR/LCR): मुलींचं असाईनमेंट्स,जर्नल्स वगैरे पुर्ण करता करता चकाट्या पिटायचं आणि खिदळायचं आणि मुलांचं बाहेरुन मुलींवर जळण्याचं हक्काचं ठिकाण.

परिक्षेबद्दलची काही सत्यं:
उलट प्रवाह: तुमच्या कडुन आख्खा पेपर कॉपी करणारा मुलगा पास होतो आणि तुम्ही फेल होता.
अत्यंत महत्वाचा हिशोब:किती मार्कांचा पेपर आपण पास होण्याइतपत सोडवलाय.
रीचेकींग: एक असुरी विनोद..ज्याचा निकाल के.टीच्या परिक्षेच्या निकालानंतरच येतो.

इंजिनीयरींगमधल्या सुप्रसिद्ध अफवा:
१.पता चला क्या? आज शाम ५.३० बजे तक अपना रीझल्ट लगनेवाला है!
२.सुना क्या? अपना एक्झाम्स दो वीक पोसपोन हो गया..व्ही.जे.टी.आय में नोटीस लगी है!

इंजिनीयरींगमधली सुप्रसिद्ध दोन वाक्यं:
१.क्या यार!! ७०% पेपर आऊट ऑफ सिलॅबस था!
२.ये आज तक के इंजिनीयरींग हिस्टरी का वर्स्ट पेपर था!

वि.सु.: ह्यात बर्‍याचशा "ओन्ली गाय्ज" किंवा" सेंसर्ड" व्याख्या अर्थातच गाळुन टाकल्या आहेत. माझ्या इंजिनीयर वाचकांनी त्याची चर्चा इथे पब्लिक फोरमवर न केली तर उत्तम Happy

सीम्पोझियम्स* आमच्या कॉलेजात फक्त सांस्कृतिक आणि तांत्रिक कार्यक्रम करणारी आणि अनेक उपक्रम राबवणारी सात मंडळं होती. सम अंकी सेमीस्टरमध्ये त्यांची वार्षिक स्नेहसंमेलनं भरायची. तिथे वाटल्या जाणाऱ्या फाईल-फोल्डर्स आणि कधी कधी छान कादंबऱ्या,अंक मिळवायला आणि अप्रतीम पक्वान्नांचा अस्वाद घ्यायला आम्ही बरोबर वेळेत हजर व्हायचो.

हा लेखा इथेही वाचता येईल. नक्की भेट द्या, वाट बघतीये Happy

गुलमोहर: 

लय भारी... आणि सर्वात महत्त्वाचं मशिन लिहिल्याबद्दल आभार.. त्याच्या शिवाय इंजिनीयरींग पूर्ण होणे अवघड आहे...
माझं आणि केटीच जाम सख्य होतं आयुष्यात कधीही मागे लागली नाही.. Happy

मस्त Lol
<इंजिनीयर्सच्या आयुष्यातली सर्वात महत्वाची मशीन ज्याशिवाय असाईनमेंट्स अजीबात होऊ शकत नाही> आणि परिक्षापण.
<त्या झेरॉक्स केलेल्या पैशात कितीतरी पुस्तकं आली असती असं वाटतं आता..>नक्कीच. पण परिक्षेत कामी आली नसती ना Wink
आम्हि पिएल (पप्रिपरेशन लिव्ह) सुरु झाली कि फोनाफोनी करुन सिलॅबसची कॉपी मिळवायचो. त्यानंतर मग कोणत्या झेरॉक्स पाहिजेत ते शोधुन त्या मिळवायचो. काहि काही वेळा त्या सिलॅबस मधेच कुणितरि कुठले झेरॉक्स , कोणाकडे मिळतील हेही लिहिलेल असायच!!!
पिएल हि हक्काची झेरॉक्स करण्यासाठी दिलेली सुटि असा अर्थ होता Wink

झक्कास सुमेधा! एका सेमिस्टरला मॅथ्सचं पुस्तक आऊट ऑफ प्रिन्ट होतं तेव्हा आम्ही मैत्रीणींनी २ तास फोटोकॉपीवाल्याच्या दुकानासमोर बसून लायब्ररीतल्या कॉपीची फोटोकॉपी करून घेतली होती. त्यालाही मेल्याला त्या दिवसात सॉलिड भाव चढायचा. आजही कॉलेजच्या परिसरात ते दुकान पाहिलं की पोटात गोळाच येतो Happy

ह्या फोटोकॉपीज मग ज्युनियर्सनना नोटस आणि पुस्तकांसोबत विकायच्या. देवा रे!

मस्त Happy

आमचा तर अजुन गोंधळ होता कारण अ‍ॅन्युअल पॅटर्न होतं. त्यामुळे पीएल खुप महत्वाची .. त्यातच तर सगळे विषय आणि सिलॅबस माहिती पडायचा Lol बाकी वर्षभर नुसता धिंगाणा !! मी तर अटेंडन्स मुळे ४ही वर्ष एचओडी समोर उभा होतो की मला परीक्षेला बसु द्या म्हणुन .. बाकी केटीचा अनुभव थोडाफार तुमच्यासारखाच! पहिल्या वर्षी २ विषय राहिले आणि मग पुढच्या वर्षीपासुन फर्स्ट क्लास ते टॉप ३ मध्ये Lol

"बेस स्ट्रॉंग" करणं यालाच म्हणतात का? >>>>>>>>>>>>
Rofl
माझा मेकॅनिक्स चा बेस ४ वेळा स्ट्राँग झाला आहे Happy
नशिबानी शेवटच्या अटेम्प्टला पास झालो आणी एक वर्षाचा ड्रॉप वाचला Happy

इंजिनीयरींगमधल्या सुप्रसिद्ध अफवा: >>>>>> :फिदीफिदी:

आम्च्या कॉलेजला पण रिसल्ट ची अफवा असायची स्वरुप थोडे वेगळे..

१ रिसल्ट नेट पे आजायेगा दोपहर को ..
२ इस्स बार रिसल्ट बहोत बेकार लगा सिर्फ ५०% पासिंग है ऐसा सुना
३ रिसल्ट आ गया युनि. मै.

हे लिखान वाचुन ईंजीनियरिंग च्या त्या महान दिवसांच्या आठवणींना आणून दिल्या बद्दल आभार Happy

मस्तच गं सुमेधा..........इंजिनिअरिंगच्या खूपच नव्या आणि गमतीच्या गोष्टी कळल्या.

छान लिहलयं. ड्रॉईंग बद्दल बोलायचे झाले तर आमचे शिक्षक कॉलेजमधे शिकवण्यापेक्षा ट्युशनला शिकवण्यात जास्त धन्य मानायचे. माझा हा विषय चांगला असल्या कारणाने मी कधी ट्युशन लावली नाही त्यामुळे माझ्यावर शिक्षकांचे खास प्रेम होते. ड्रॉईंग-शिट चेक करताना मला पाच- सहा वेळा परत परत बोलवल्याशिवाय त्यानां करमायचे नाही. एकदातर माझा शीट कन्टेनरच बसमधे हारवला, नशिब त्यात तिनच ड्रॉईगं होत्या, घरी जाऊन पुन्हा त्या रेखाटल्या, टिचरच्या सहि आणि रिमार्क सकट...
Donald35.gif

अजून काही फंडे-
डी. सी. होणे- कंपलसरी अज्ञातवास
ए. टी. के. टी.- आता तरी काढून टाक
टोपो मारणे-मासेस शॉर्टकट टू इंजिनीअरींग ड्रॉईंग.
महिनाअखेरची असाईनमेंट- सगळ्या कपड्यांमधले चिल्लर पैसे शोधून पोट भरणे.
गॅदरींग- ओअ‍ॅसीस.
सगळ्यात मोठा (जुना)जोक- 'बाबा, लॉग'टेबल' घ्यायचा आहे. हजार रूपये पाठवा.'

येस पहिल्या वर्शी mechanics ची KT बसली. ती पण २९ मार्क्स मिळाले ३० असते तर grace ने पास झाले असते. मला वाट्ते की एक्दा KT लागली की त्या वर्षी pass class ch मिळतो मग KT घालवुन ६० % पेक्षा जास्त मिळले तरिही.
मला त्यामुळे
1st year pass class
2nd year second class (59%)
3rd year First class (65%)
4th year Distinction (72% ) असे मिळाले मार्क्स.

2nd year मध्ये ETI मध्ये ५६ मार्क्स चा paper सोडविला (इंजिनीयरींग हिस्टरी का वर्स्ट पेपर था! :-))
मला वाट्ले बहुतेक काठावर पास होइन पण ६० मार्क्स मिळुन चक्क विषयात Topper
याउलट 4th year AMD चा पेपर १०४ मार्क्स चा सोडविला. ऊत्तरे चक्क textbook मधुन छापली.
घरी आल्यावर म्हणाले की १०० मध्ये १०४ मिळणार कारण 4 वर्शातला सर्वात सुरेख पेपर.
पण मार्क्स चक्क ४० काठावर पास can't believe पण लागोपाठ १५ मुलांन्ना चक्क ४० मिळाले होते.
job already होता मग recheck केलेच नाही. कोण पेपर तपासतात आणि कसे तपासतात देव जाणे
पण घरच्यांना पटवणार कसे.

Engineering Drawing ला आम्हाला MB Shah (ज्यांचे स्वतःचेच पुस्तक होते त्यांचे काही सत्य Jokes.

1) एक विद्यार्थी Top view / Front View एका पेपर आणि side view दुसर्या पेपर वर काढुन चेक करायला आला.
MB Shah "I asked you to bring 18 year old girl for marriage you broughtl 2, 9 year olds"

2) एक विद्यार्थी GT मारताना गाढवपणा केला २ Front view आणि एक Top view काढुन मग त्यापासुन
isometric view काढला.
MB Shah "Excellent now you not only married two gentlemen but also produced offspring."

माझ्या 1st year च्या final submission day ला एकाच दिवशी ४ विषयांचा final submission होते त्यात माझे Physics चे journal चोरले. Eng Drawing ची २ submissions राहिली होती. saturday ला ३ वाज्ता submission time संपल्यावर स्वतः MB Shah नी माझ्या समोर बसुन claass मध्ये ७:०० वाजता २ drawings complete केली (He was gr8 teacher).
आणि मग ५९ बस पकडुन Bombay Central ला जाउन मी मित्रमैत्रिणींबरोबर movie बघितला.

पुन्हा एकदा आभार !!

निलीमा..खरंच खुप मस्त आठवणी...असेही काही प्रोफ. असतात. माझ्या आठवणीत नाहीत..पण ऐकुन तरी आहे Happy

पुणे युनव्हर्सिटी जयकर रुल म्हणून एक फंडा आहे.. बहुतेक मुंबईत पण असेल तो.. नाव वेगळे असेल...

एकच विषय राहिला असेल आणि त्यात जर ३० पेक्षा जास्त मार्क्स मिळाले तर तो विषय सुटायचा.. ह्यालाच सगळे जण जॅक लागला असंच म्हणायचे...

तसेच जर क्लास मिळण्यासाठी काहीच मार्क्स कमी असतील तर ते वाढीव मार्क्स मिळून क्लास पण बदलायचा..

>>.असेही काही प्रोफ. असतात. माझ्या आठवणीत नाहीत..पण ऐकुन तरी आहे

फर्स्ट इयरचे मेकॅनिक्सचे सर - त्यांच्या सुरेख शिकवण्यामुळे पास झाले. नाहीतर काही धडगत नव्हती. आजही pulley वगैरे गोष्टी पाहिल्या की भीतीने छातीत धडधडतं Proud

खरे सांगायचे झाले ना सुमा, तर माझा सगळ्यात आवडता विषय होता. मागे मी तुझ्या एका लेखावर लिहीले होते जी.टी. वगैरे. पण ED हा खरोखर अतिशय आवडता विषय होता. I was an expert. पहिल्या अर्ध्यातासात माझे Sheet पुर्ण करून मग इतरांची पुर्ण करायला मदत करणे आणि मग त्या बदल्यात कँटीनला त्यांच्या खर्चाने हादडणे हा आवडता उद्योग होता माझा. ऑर्थो, आयसो जाम मजा यायची यार...!
आम्हाला आधी कुर्ले म्हणुन लेक्चरर होते या विषयाला, त्यानंतर सहा महिन्यांनी दुसरे आले त्यांचे नाव होते "हालकुडे" आम्ही जाम खेचायचो त्यांची. Wink

सुमे, निलिमा सगळ्या व्याख्या नि अनुभव एकदम मस्त!
झेरोक्स मशिन नसते तर खरच काय झाले असते त्याची कल्पना करवत नाही!

आमच्याकडची काही मुले मस्त कॅल्क्युलेशन करुन लायब्ररीमधली जाडी पुस्तके परिक्षेच्या आधी १५ दिवस वगैरे घ्यायची आणि पेपर झाला की लेट फी भरुन लायब्ररियनच्या शिव्या खाऊन परत करायची. हो क्षेरोक्सचे पैसे वाचायचे ना!

गम्मत म्हणजे झेरॉक्स हे फक्त काढण्यासाठी असते, वाचण्यासाठी नसते, असा माझ्यासकट बर्‍याच मुलामुलींचा समज होता. जणू काही झेरॉक्स काढले म्हणजे त्या विषयाचा अभ्यास झाला!! त्यामुळे आम्ही ४-५ कॉपीज काढतोय अशी बातमी पसरल्यावर २०-२५ ऑर्डरी यायच्या आणि तेव्हा चेंबूर स्टेशन ला २० पैशात झेरॉक्स मिळत असल्याने, सगळे काम माझ्याच गळ्यात पडायचे!! मग थप्प्या न्यायला मात्र मी दुसर्‍या हमालांना बोलवायचो.

कॉलेजमधले सर्व पॅसेज हे त्या साफ करणार्‍या बायका केवळ विद्यार्थ्यांसाठी त्यांनी तिथे व्हीटी स्टेशन वर बाहेरगावचे प्रवासी कसे स्टेशनवरच पसरलेले असतात तसे पसरुन आपले जर्नल कंप्लिट करावे ह्याच उद्देशाने करत असतात. पॅसेजचा चालण्यासाठीचा उपयोग दुय्यम.

सर्वांच्या आठवणी वाचुन खुप धम्माल येतीये...पुढचा भाग लिहुन लवकरच पोष्टेन..येऊद्या अजुन Happy

अरे हो....पुन्हा एकदा धन्स Happy

This mail Reminds us of those engineering days.....4 years of non-stop of what we have followed... day after day... :))

Engineering Dialogues

1. On being Late

? (standing at the door... gesturing to a friend) "Andar aaon kya? Kab chalu hua?"

? "Attendance ho gaya kya??"

? "I was searching for the Classroom"

? "Train was late"

2. During the lecture

? " mera assignment tere paas hai??"

? "Kya bore ho raha hai. Bola tha bunk karenge."

? "Heads, we go home, Tails, we go home now!!!"

? "Journal sheet hai??"

3. Lab

? "Expt. 2 likha??"

? "Idhar Karna kya hai??"

? "tera reading kya aaya?"

4. Unit Test

? "Oh Shit!!!!!! Itna syllabus cover ho gaya?"

? "Aaj kounsa test hai?"

? "ye topic to maine option ko daala tha"

5. For attendance (less attendance isliye attendance badane ke liye bahane)

? "I forgot the I-card , so watchman didn't let me in"

6. Late submission of assignments

? " Maine us ko bola thaa ki copy karke mera assgnment bhi saath mein submit kar dena"

? " Last date extend hua thaa"

? "I didn't know the last date"

7. Late submission of Journal (for printouts)

? "Format pataa nahi thaa"

? "Printer is not working today"

? "Friday ko light nahi thee"

8. VIVA (after exam)

? "Yeh bhi syllabus mein thaa kya?"

? "Achha !!! ye aise hota hai kya?"

? "Ye subject ka reference book kounsa hai"

9. VIVA (b4 exam)

? "Submission ab tak hua nahi hai , VIVA kya Khaak doonga"

? "Dekh Boss!! external bhi aadmi hai. Usko pata hai students ka ab tak preparation nahi hua hai"

10. VIVA (General)

? "Dekh , tu jo bhi padhega , woh (external) tereko woh nahi poochhnewaala, then watz the point"

? "Roll no. 1 aur 2 ko wapas bulaaya hai"

? "External is asking Bermuda Triangle ka Magnetic force kitna hai"

? "Ye kounse subject mein aata hai"

? "Aaj kounsa Viva hai?"

11. Submission

? "Ye bhi chhapna hai kya?"

? "Iska bhi print-out lena hai kya?"

? "Tujhe Sir ka sign aata hai kya?"

? "beech beech me ek do pages gaapachi maarne ka re!"

12. A convo:

"Ye tune kya likha hai????"
"Jo word samajh mein aa raha hai woh likh, jo nahi samajh mein aa raha hai uska drawing nikal"
"Phir bhi, kuch to idea hoga??"
"Maine uska likha hai, mera assignment check ho gaya , tu bhi wohi kar. Jo word samajh mein aa raha hai woh likh , jo nahi samajh mein aa raha hai woh chhod de."

13. Exam

? "Jo (mujhe)aata hai, woh (paper mein)aata nahi hai; jo nahi aata hai woh aata hai"

? "ye question 2 saal se nahi poochha hai"

? "ye last time hi poochha thaa"

? "tere paas is ke notes hai??"

? "woh chapter... mark weightage 6 marks... (facial ex-pressions speaks the story)"

? "nahi samjha to ratta maar"

? (when someone is intensively doing his last revision) "Yeh nahi aayega bhaii...."

सुमेधा, निंबुडा
सगळे माझ्यासाठी नवीन, असले उद्योग आम्हाला कधी करावेच लागले नाहीत !!

निंबुडा Rofl सगळं सगळं आठवलं गं बयो Proud

.पुढच्या भागाचं लिखाण चालु आहे..लवकरच पोष्टेन Happy
तोपर्यंत येऊदे आणखी आठवणी पब्लिक.
आणि पुन्हा एकदा आभार सगळ्यांचे Happy