वर्षाविहार २०१० (यू.के.'ज रिसॉर्ट) : वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 19 July, 2010 - 05:23

DSC01541-compressed.JPG

वर्षाविहार-२०१० यशस्वी केल्याबद्दल सर्व उपस्थितांचे तसेच संयोजन समिती आणि सांस्कृतिक समितीच्या सदस्यांचे आभार.
वर्षाविहार-२०१० चे फोटो, वृत्तांत आणि प्रतिक्रिया इ. साठी हा धागा सुरू करत आहोत. जास्तीत जास्त लोकांनी (विशेषतः वर्षाविहारास प्रथमच हजेरी लावलेल्या मंडळींनी) वृत्तांत लिहावेत अशी आग्रहाची विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यो, छान लिहिले आहेस, जुन्या वविबद्दल. आणि मया, तू पण. Happy

वरच्या सहापैकी ३ वर्षाविहारांना मी होतो. २००८ च्या वविला मी सदस्य होऊन २-३ महिनेच झाले होते. आणि मायबोलीचा भरपूर आलेला असला, तरी मायबोलीकरांबद्दल थोडासाच अंदाज आलेला होता. त्यावेळेला पडद्यामागच्या चेहेर्‍यांना बघून जितकं अप्रुप वाटलं होतं, तितकंच स्वतःला कुठेतरी अ‍ॅक्नॉलेज झाल्याचं पाहूनही. हे सारे लोक स्वतःच्या प्रतिमा, वय, हुद्दा, भेद आणि भांडणे विसरून एकत्र येऊन धमाल करतात त्या उत्साहाचा पोत वारीला ज्या तन्मयतेने लाखो वारकरी एकत्र येतात आणि सारे विसरून एखाद्या अनाम ओढीने पंढरीची वाट चालू लागतात - त्या ओढीशी कुठेतरी सारखा वाटला. जे आयडी 'लार्जर-दॅन-लाईफ' वाटत होते, तेदेखील आपल्यासारखेच हाडामांसाचे आहेत, आणि आपल्यासारख्या नवख्यांतही काही आडकाठी न ठेवता मिसळत आहेत हे बघून समाधान वाटले. नवल वाटले, आणि आनंदही झाला - आपण बरोबर ठिकाणी उशिरा का होईना येऊन पडलोय त्याचा. काही दुसर्‍याच कामानिमित्ताने खोपोलीलाही जायचे असल्याने या पहिल्या वविला मायबोलीकरांबरोबर बसने येता-जाता आले नाही, याचे वाईटही वाटले.

दुसर्‍या वविला, म्हणजे मावळसृष्टीला मात्र संयोजकाच्या रुपातच सहभागी झालो. यावेळच्या ओळखी वाढल्याने मागल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट धमाल आली, हे निराळे सांगायला नकोच. मावळसृष्टीचा प्रवास आणि तिथला निसर्ग- हे मनात कायमची जागा करून गेले.

यावेळचा ववि हा मागल्या दोन्हींच्या तुलनेत कळस ठरला. नेमके आणि सुंदर नियोजन, बहुसंख्येने सामील झालेले ठिकठिकाणचे मायबोलीकर, सर्वांना सामावून घेणारे सांस्कृतिक कार्यक्रम, युकेची मोठी आणि प्रसन्न करणारी जागा, मस्त जेवण, शेवटी का होईना आलेला मस्त पाऊस आणि बसमधल्या तुफान धमाली.. आणखी काय हवे? न आलेल्यांना रुखरुख लावणारा आणि त्यांच्यासकट सार्‍यांनाच पुढच्या वविची स्वप्ने बघायला लावणारा हा ववि.

वर्षाविहाराच्या या स्वरुपामुळे तो मायबोलीकरांचे आनंदनिधान झाला आहे. तो अजून हजारो वर्षे तसाच राहो, ही सदिछा.

संयोजकांचे आणि सामील होऊन हा आनंद द्विगुणित करणार्‍या सर्व मायबोलीकरांचे पुन्हा हार्दिक आभार आणि अभिनंदन. Happy

>>>> वरती आगाऊ या आयडी विषयी लिहिलंय. तो नक्की शाळेत शिकतोय की शिकवतोय ? Lol
>>>मला आश्चर्य वै. नाही वाटले त्याला बघून. <<<<
मला आश्चर्य नाही वाटल, पण गाठ एखाद्या डुढ्ढाचार्याबरोबर नसून जवानाबरोबर आहे याचे वाईट जरुर वाटल! Wink
नन्तर मी त्याला म्हणले देखिल की अरे याच वयात माणसे सगळ्यात जास्त "आगाऊ" अस्तात! Proud

मयुरेश, प्रयत्न सुरू करायला हवा, माझ्याकडून मी सुरू करतो जमेल त्या वेळेत!

विशल्या तूच नोट आता "पल्ली पाण्यात उतरली होती आमच्या रिंगा रिंगा रोझेस मधे पण ती होती">>>>

अच्छा? म्हणजे म्हणुनच पुलाच्या बाजुला सगळं पाणी पाणी झालं होतं काय? माते मोठ्ठा Light 1 घे गं Wink

वरती आगाऊ या आयडी विषयी लिहिलंय. तो नक्की शाळेत शिकतोय की शिकवतोय ?
मला आश्चर्य वै. नाही वाटले त्याला बघून >>> Lol निंबे, कारण त्याच्या इथल्या कामगिर्‍या तू पाहिलेल्या/वाचलेल्या नाहीस.
आगावा, आता प्रत्यक्ष भेटून धक्के-बिक्के खाऊन झाले, आता नाही देत दिवे... चालेल ना? Wink

माझा ववी वृतांत फक्त मुद्देस्वरुपात:-

बर्‍याच धावपळीनंतर ववीचा दिवस उजाडला.
मल्लीचा सकाली समस
सकाळीच धक्कादायक बातमी, किरु वेळेत पोहोचला.
बस व्यवस्थित होती.५४ सिटर कबूल केल्याप्रमाणे.
आण्णांचा मुलुंडला सकाळी चहा.
ठरल्याप्रमाणे नील निरोप द्यायला आला होता.
सगळे पिकअप व्यवस्थितं निंबुडा आणि मोदकला थोडा उशीर,
पण तेव्हढा बफर वेळ माझ्या प्लान मधे होता.
त्यांना थोड बसच्या मागे धावायला लावल.
बसमधे गानी च गाणी ,आणि आनंद केळकरचा पोल डान्स. Rofl
बॅनर निघाला ,आण्णा बस थांबवून जोषात.आणि बाकी मंडळी नाष्त्यात मग्न.
९.१० ला रिसॉर्ट ला आगमन.
भरपेट नाष्ता.
लॉनवर क्रिकेट चा आखाडा, कारण सगळ्याम्नाच बॉलिंग आणि बॅटींग करायची होती.
पाण्यात धमाल, मला पाण्यात धक्का मारुन कोणी पाडल ते अजुन माहित नाही.
यो रॉक्स चा डान्स , सगळे मंत्रमुग्ध. Rofl
चाव्यांचा गोंधळ चालूच होता, अश्वी कडे सापडली ती चावी...
जेवण.
बास बाकी नंतर...
क्रमश :

काय धमाल केली सगळ्यांनी! अगदी शाळेतल्या सहलीची आठवण झाली! एकदा तरी वविला यायल हवच! सगळे व्रुत्तांत पण छान आहेत, मजा आली वाचायला.

आमचा पण हा लागोपाठ पाचवा व वी होता, आणि विशेष म्हणजे सह परिवार सहभागी आहे. खुप मजा आली सगळ्या ववी मध्ये. एका ववी साठी ची जागा शोधायला पण अगोदर गेलो होतो (हेगडे व वी). या वेळेस लोक संख्या पण खुप होती. जागा पण छान आणि प्रश्स्त होती तसेच दोघांसाठी(पुणेकर / मुंबइकर) जवळ होती त्यामुळे सगळे जण वेळेत पोहचले आणि त्यामुळे सर्व कार्येक्रम पण वेळेत चालु झाले आणि वेळेत संपले. नेहमी प्रमाणे नेहमीची लोक आली आहेत का हे सुरवातीला पाहिले गेले आणि मग गप्पा चालु झाल्या. संयोजकांचे आभार.

लोक्स आय अ‍ॅम जस्ट लकी टू हॅव गुड लाईफ अँड गुड वाईफ! Happy
निंबुडा, मी आयबी या इंटरनॅशनल करिक्युलममधे बायॉलॉजी आणि थिअरी ऑफ नॉलेज हे दोन विषय ११-१२वी ला शिकवतो.

अश्वी कडे सापडली ती चावी...
>>>>> ए ए ए ए, ती एकदाच माझ्याकडे होती. ते सुद्धा आशुतोषने मी खेळांची तयारी करण्यात मग्न असताना/तंद्रीत असताना माझ्याकडे कधी आणून दिली व मी कधी माझ्या बॅगमधे सुरक्षित(?) ठेवली ते मलाच कळलं नाही.

बाकीच्या वेळी हरवलेल्या चाव्या कुणाकुणाकडे मिळाल्या? रेल्वेस्टेशनला / गणपती विसर्जनाला मुलं हरवली आहेत अशी अनाऊंसमेंट होते तश्शीच अनाऊंसमेंट चावी हरवली आहेची होत होती Proud

88781.jpg

मित्रांनो हे आठवते आहे का तुम्हाला

पहा जरा आठवून..........

ही संकल्प ने साकारलेले मायबोली ववि २००५ ची बखरीचे मुखपृष्ठ.

हा माझा मायबोलीवरील तिसरा ववी. मावळसृष्टी हा पहिला, त्या नंतर मोदी रिसॉर्ट आणि काकांचे स्वयंपाकघर.
मावळसॄष्टीला सहसंयोजक म्हणुन ह्या संयोजक मंडळींमधे लुडबुड करायची संधी घेतली होती.

संकल्पची बखर आणि मावळसृष्टीचा ववि दोन्ही अविस्मरणीय... प्रसाद, राफा, किरू, GS, मिल्या, आरती, सन्मी, शिप्रा यांनी रंगविलेली मैफल अजूनही लक्षात आहे... Happy

हा माझा संक्षिप्त वृतांत Happy

"मी येऊ का यंदाच्या वविला? मी जास्त कोणाला ओळखत नाही, मी पटकन कोणात मिक्स होत नाही त्यामुळेच कितपत एन्जॉय करू शकेन यात शंका आहे? काय करू जाऊ कि नको?" असा प्रश्न यो रॉक्स, दक्षिणा आणि सुर्यकिरणला मायबोली ववि ला जाण्यापूर्वी विचारणारा मी.

"अरे यार काय सॉल्लीड धम्माल आली रे मायबोली वविला. एकमेकांशी जास्त ओळख नसुनदेखील फुल्ल टु धम्माल केली. अगदी कायमचा आठवणीत राहणार आहे हा दिवस." असे मायबोली वविला जाऊन आल्यानंतर ऑफिसमध्ये कौतुकाने सांगणारा मी.

या दोन वाक्यातल्या "फरक"च सांगतोय मी किती एन्जॉय केला ते. Happy

माझा हा मायबोलीकरांसमवेत पहिलाच वर्षा विहार, पण कायमचा लक्षात राहण्यासारखा.
गाडीतील धम्माल हा वृतांताचा एक वेगळाच विषय होऊ शकतो :). सगळ्या उस्तादांची गाणी ऐकताना मात्र माझी "गाणी मनातली" माझ्या भिडस्त स्वभावामुळे मनातच राहिली :).
युकेज रिसॉर्ट मध्ये सगळेच जेंव्हा स्विमिंगपुल, रेनडान्समध्ये धम्माल करत होते तेंव्हा मी मात्र माझा कॅमेरा घेऊन सगळे क्षण त्यात साठवत होतो. तब्बल ३५६ फोटो काढले (~२९ डझन फोटो :), पण अस्मादिकाचा त्यात एकही फोटो नाही :(). त्यामुळेच मला मात्र स्विमिंगपुलमध्ये धम्माल करता आली नाहि. पण वर्षाविहाराला जायचे आणि न भिजता यायचे? छे, असे शक्यच नाहि, म्हणुन सगळे जेंव्हा लंचसाठी गेल्यावर युकेज च्या माणसाला सांगुन रेनडान्स चालु केला आणि माझा कॅमेरा यो रॉक्सकडे सोपवुन, मी, वैभव आयरे, प्रणव कवळे, सुर्यकिरण, प्र-साद अशा पाचजणांनी अर्धा-पाऊण तास फुल्ल २ धम्माल केली.

No one in this world is rich enough to buy his own Childhood & Youth back.
However FRIENDS help recreate those moments from time to time at no cost.

त्या तुफान पावसात (?) भिजताना आम्ही पाचहीजण अक्षरशः लहान झालो होतो आणि चक्क "अटक मटक चवळी चटक" खेळत होतो Happy प्र-साद तर डिजेच्या तालावर नागीण डान्स करत होता Happy (ज्यांनी पाहिले नाहि त्यांचा अजुन एक नृत्यविष्कार मिसला :)). त्या अर्ध्या-पाऊण तासात मी तो संपूर्ण वर्षा विहार एन्जॉय केला. (प्र-साद,वैभ्या, प्रणव, सुकी धन्स रे :))

बाकिची धम्माल इतर माबोकरांच्या वृतांतातुन वाचलीच असेल, त्यामुळे मी जास्त काहि लिहित नाही, पण एक मात्र नमुद करू इच्छितो कि खुप ठिकाणी भटकलो, भरपुर पिकनिक्स केल्या, सह्याद्रित हिंडलो, परदेशवारी झाली, पण मायबोलीचा ववि हा खासच ठरला आहे माझ्यासाठी. समस्त माबोकर, विशेषतः यो रॉक्स, वैभव आयरे आणि सुनिल परचुरे यांच्यामुळेच मला कुठेहि एकटेपणा जाणवला नाही. Happy

उत्कृष्ट संयोजन (सांस, ववि, टिशर्ट समिती), enthusiastic माबोकर यांचे मनःपूर्वक आभार.
शेवटी एकच सांगु इच्छितो "गर्व आहे मी मायबोलीकर असल्याचा".

ज्जे ब्बात है योग्या, थोडक्यात पण महत्वाचे सान्गितलेस Happy
(मी बघितल, कोणतरी अटक मटक चवळी चटक खेळत होत, त्या पाण्याच्या धुकेसदृश फवार्‍यामधे मला नीटस दिसल नाही, अन एक शन्का अशीही आली की माबोकरान्व्यतिरिक्त दुसरेच कुणी आहेत की काय, पण एकाने हात हलवुन दाखविल्यावर, म्हणले आपलेच आहेत, बसुदेत खेळत! मज्जा करताहेत नि काय)

त्या तुफान पावसात (?) भिजताना आम्ही पाचहीजण अक्षरशः लहान झालो होतो आणि चक्क "अटक मटक चवळी चटक" खेळत होतो >>> ए ए, आम्ही लेडीज बायकांनी पण खेळला की "अटक मटक चवळी चटक" चा खेळ Happy

प्र-साद तर डिजेच्या तालावर नागीण डान्स करत होता (ज्यांनी पाहिले नाहि त्यांचा अजुन एक नृत्यविष्कार मिसला ). >> बाप रे, माझ्या अ‍ॅवॉर्ड्स च्या लीस्ट मध्ये अजून एक नॉमिनेशन आहे म्हणाय्चं तर!!!

योगेश मस्त लिहला आहेस वृत्तांत.. Happy

तु काढलेल्या फोटोंची लिंक दे ना... प्लिज.

प्रसादचा डान्स... आम्ही पाहिलाच नाही Sad

हाय योग्या, सचीन, मल्ल्या, आगाऊ, सुर्या आणी निंबुडा.... खुप धम्माल केली ना आपन सर्वांनी... खुप आठवण येते आहे आता सर्वांची. असे वाटते की तो दिवस संपुच नये. आता एकदा भेट झाल्यावर ना सगळे खुपच आपले आणी जवळचे वाटायला लागले आहे. निंबे तुमचा मोदक काय बोलतो आहे, त्याला मी विचारले आणी हाय केले सांग. Happy

अरे या "वर्षाविहार" सारखे एखादे "हिवाळी अधिवेशन" ही भरवा ना........
म्हणजे आता चुकलेल्या आणि म्हणुन चुकचुकणार्‍या सर्वाना पुन्हा एकदा भेटायची संधी मिळेल...... Happy

पहाटे ५.३०चा गजर लावुन झोपलो. पण सकाळी गजरच्या आधिच पोरीगी ऊठुन खेळायला लाग्ली. मुकाट्याने उठुन सकाळचे कार्यक्रम उरकुन चहाचे घोट घेत पेपर चाळता चाळता घड्याळाकडे बघत होतो. एकदाचे ६.१५ झाले व मी आपल्या सवय़ीप्रमाणे ठरलेल्या वेळेच्या १० मिनटं आधी पोहचलो. राजारम पुलावर कुणीच माबोकर दिसत नव्हता. बहुतेक तिथे येणारा मी पहिलाच होतो. सगळिकडे टकामका बघत होतो. ईकडे तिकडे बघत येणा-या प्रत्येक व्यक्तीकडे हा माबोकर असावा या आशेनी बघायचो पण तो सरळ निघुन गेल्यावर निराशा व्ह्यायची. तेवढयात एक जोडपं आलं. ती मुलगी माझ्याकडे बघुन “हाय” म्हणत हाथ दाखविल्यावर ( कारण मी माबोचा टि शर्ट घातला होता) जरा धिर आला, ती मात्र नव-या बरोबर गप्पा मारत दुरच उभी होती. मी ईकडे दर ५ मिनटानी सचिनला फोन करुन बस नक्की ईकडे येणारे ना, मला सोडुन तर जाणार नाही ना ?, मी नक्की ईथे ऊभा राहु ना? तुम्ही आजुन निघालात कि नाही त्या बालगंधर्व मधुन वगैरे नाना शंकाचे निरसन करत होतो. हे सगळ चालु असताना एकदाची बस आलीच त्या राजाराम पुलाजवळ. बस मधे बसल्यावर त्या हाय करणा-या मुलीची ओळख करुन घेतली ती स्वाती होती.

बस मधे मात्र बरेच ओळखिचे माबोकर होते सगळ्यांशी हाय बाय करुन आपली जागा धरली व पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली. मी अगदी बसच्या मधोमध असलेल्या सिटवर बसुन होतो १५ मिनटानी एक गोरा गोमटा मुलगा माझ्या शेजारी येऊन बसला. नाव विचारल्याव सत्यजित असं ऊत्तर मिळालं पण मला असलं नाव कुठे वाचल्याचं आठवेना, मग त्यानी आपला आयडी सांगीतल्यावर मी चाट पडलो. तो आयडी होता “आगाऊ”. दक्षीणाने माझी ओळख पल्लीशी करुन दिली “हाच तो मधुकर”. मला “तो” चा अर्थ आजुन लागलेला नाहिये. पुढे वर्षु निल बसीत चढल्या या वेळी मात्र मी स्वत:हुन त्याना माझी ओळख दिली.

वाकड फाट्यापर्यंत पोहचेस्तोवर पोटात उंदरं उड्या मारु लागली, आगाऊच्या कानात भुकेशी संबंधीत चर्चा केल्यावर त्यानी सुद्धा सेम टु सेम होत असल्याचं सांगीतलं. पण बस मधे एक मातेला मात्र भुकेनी ईतकं पछाडलं होतं कि तिने वाकडनंतर एका ठिकानी दोन मिनटासाठी गाडी थांबल्याचं औचित्य साधुन थेट खाऊच्या गाडीवर धडकली. तिच्या या बहाद्दुरिच्या आळोशाने मी पण भुकेची सोय करायला त्याच दिशेनी निघालो असताना परेश लिमयेनी माझी तटबंदी करुन मला परत पाठविलं. मी बंड करु नये म्हणुन त्यानी पुढे ५ मिनटाच्या अंतरावर गाडी नाश्त्यासाठी थांबणार असल्याचं खोट आश्वासन देऊन माझ्या सारख्या भुकेल्या माणसाचा तर छळ केलाच पण भर रस्त्यावर धावत्या बसीत बसुन असताना दोन तीन वेळा माझ्या जवळ येऊन “तुला बिस्कीट देऊ का खायला?” असं विचारुन विचारुन माझ्या संयमाची परिक्षा घेत होता.

आता मात्र थोड्याच वेळात बसमधे मागचे विरुद्ध पुढचे असे दोन गट पडले व अंताक्षरी चालु झाली. मी, आगाऊ व स्वाती मात्र एकाच रो मधे बसलो असल्याने आम्हाला कळेच ना कि आम्ही नेमक मागच्या गटात मोडतो कि पुढच्या. मी या बद्द्ल हळूच आगाऊच्या कानात प्रश्न टाकल्यावर आपण नो मॅन्स लॅंड मधे मोडतो असं उत्तर आलं. मग मात्र मी नोमॅलॅ ची भुमीका मुकाट्यानी निभावली. स्वातीला मात्र ती मॅन्स लॅंड मधे आहे कळलचं नाही. मग तीन सुरुवातीला पुढच्यां गटाकडुन सुरुवात केल्या सारखी केली पण बघता बघता केंव्हा मागच्या गटाकडुन गाऊ लागली ते कळलेच नाही. पण मागच्यानी मात्र तीला त्यांच्यात सामावल्याच अजीबात भासवु दिलं नाही.

तेवढ्यात कुणाच्या तरी कोकराला जोरात शी/सु लागली व बस दोन मिनटाचं अघोषीत थांबा घेऊन पुढे चालु लागली. आणि बघता बघता आमची बस युकेज मधे येऊन धडकली.

खोली नं १११ वर लेडीज बायकांचा ( हा शब्द कोणी शोधला माहित नाही) ताबा होता. आम्ही आमच्या ब्यागा तिथे टाकुन आधी नाश्ता केला. नंतर स्विमींग पुलात मनसोक्त उड्या मारल्या. पल्लीची ऐतिहासिख उडी मात्र मिसली. पहिल्या पुलात एक मुख्य घसरगुंडी व दोन उप घसरगुंड्या होत्या. सुरुवातीला कोणीच त्या मुख्य घसरगुंडीवरुन घसरायची हिम्मत करत नव्हते पण तिथे कोणाचं तरी १०-१२ वर्षाचं एक जिगरबाज पोट्टा होता. तो मात्रा आम्हा मोठ्याना चिडवल्याच्या अविर्भावात उडयावर उड्या मारुन दाखविल्यावर मला काहि राहावलं नाही. मग मात्र एक एक करुन सगळ्यानीच मुख्य घसरगुंडीचा किमान एकदा तरी उपयोग केलाच.

योगेशची लावणी इतकी अप्रतीम होती कि तिकडे बायका पेटल्या व हम भी कुछ कम नही म्हणत त्यानीही एक लावणी पेश केलीच. मात्र योगेश तो योगेशच. थोड्याच वेळात चार कंपु तयार करुन चिट्ट्या वाटण्यात आले. मी कॅप्टन वहिनीच्या गटात पडलो व आमच्या गटानी जबरदस्त मार्चे बांधणी करत सगळ्याच आघाड्यांवर कौशल्यपुर्ण खेळी करत १५० गुणांची मिळकत करुन शेवटी मात्र १०० गुणांच्या एका रांऊडधे मात खाल्ली व आमच्यापेक्षा किमान ६० गुणानी मागे चालणा-याना अनपेक्षीत यश आलं. मी मात्र जो एकमेव उखाना घेतला, तोही कॅप्टन कडुन उधार घेतला होता.

विटावरुन चालण्याच्या गेम मधे एक वेगळिच मजा आली. आमच्या साजी-याला ज्यानी साथ दिली त्यानी साजि-याच्या मागे राहुन विटा पुढे सरकविल्यामुळे त्याला गती मिळाली. पण मल्लीनी मात्र खुप मोठा लाईव्ह वेंधळेपणा केला. तो ज्या मुलीच्या पायाखालच्या विटा सरकवत असे तीच्या पुढे असायचा. हा तिच्या पुढे वाकुन एक विट आपल्या दिशेनी ओढली कि ती त्याला पायानी ढकलल्यासारखं करत त्या विटेवर पाय ठेवत असे. आता तीचा एक पाय अगदी मल्लीचा आंगाला भिडलेला असताना मल्लीला तीच्या दुस-या पायाची विट ओढायची असे. मग हा लिटरली तीच्या पायात शिरुन (पुढुनच) ती दुसरी विट ओढायचा. हि ओढलेली विट तो त्याच्यापेक्षा थोड मागे ठेवायचा. आता मात्र त्या मुलीला मल्लीच्या आंगावर पाय दिल्याशिवाय विटेवर पाय ठेवणे जमायचेच नाही. मग ती धडपडत मल्लीला पायानी तुडवायची पण हा पठ्ठा मात्र पुढुनच परत तिच्या पायात शिरायचा. एकंदरीत मल्लीनी धमाल केली व आम्हीपण.

लिंबुशी मी स्वत: जाऊन ओळख करुन घेतली, बोलुन बरं वाटलं. विशाल कुलर्णी व आगाऊ शी गप्पा मारुन बरं वाटलं. सगळे कंपुबाजी सोडुन वविचा आनंद घेत होते हे विशेष. अश्विनी केशी बोलुन बरं वाटलं. त्या एकडम हटके व्यक्तिमत्व जाणवल्या. बाकी इतरांशी ओळख पाळख झाली. एकंदरित मजा आली.

परतीच्या प्रवासाला मात्र बाहेर पडता पडता बसची डावी बाजु गेटला घासल्यावर काही सांकेतीक कमेंटनी लोकानी कुठल्यातरी भुताची आठवण काढली. साजि-यानी सांडवलेला चहा बसमधे पुणे येईस्तोवर पसरतच होता. मी मात्र निवांत झोप घेत होतो. मयुरेशची पोरिनी माझे केस उपटुन काढले तेंव्हा पोरीच तिव्र आठवण झाली. पण मागचा गट मात्र आजुनही त्या सांडलेल्या चहात तरंगत होता. विडंबनाचे बरेच प्रकार चालु होते. पुढच्या वेढेस याना जरा खायला कमी दयावं म्हणजे तरंगता तरंगता जरा थकतील तरी नाहीच जमलं तर भरपुर खायला दया म्हणजे सुस्तावुन झोपी तरी जातील.

मग मात्र साजि-यानी या छळापासुन आपली सुटका करुन घेण्यासाठी एक नविन शक्कल लढविली व गुलाम अलीची “चुपके चुपके रात दिन “ गलचे सुर छेडले व एकदम सगळे जुन्या गाण्यांवर येऊन आपटले. मग एकशे एक जुनी गाणी व गजल गायनाचा रंगारंग कार्यक्रम रंगला.

आणि आता जसजशी गाडी पुण्यात शिरू लागली तसे एक एक जण उतरु लागले.
एकंदरित जाम मजा आली, पुढच्या वर्षी सहकुटूंब येण्याचं ठरवुन टाकल.

खोली नं १११ वर लेडीज बायकांचा ( हा शब्द कोणी शोधला माहित नाही) ताबा होता. >>>
माझ्या साबांचा शब्द आहे हा Rofl
एकदा चुकून असे म्हणाल्या होत्या त्या! ट्रेनच्या प्रवासाच्या वेळी एकदा "आम्ही लेडीज बायकांच्या डब्यात चढू.." असे काहीतरी म्हणाल्या होत्या. मोदक आणि त्याचा धाकटा भाऊ साबांना अजूनही त्यावरून चिडवतात. Biggrin

हे हे भारी वृत्तांत मधुकर. Happy
ते सकाळी तुम्हाला पाहुन माझा पण जीव भांड्यात पडला. खात्री पटली की हो आपण योग्य जागेवर उभे आहोत. ते काय आहे ना मला एक आता सवय झाली आहे की आपण स्वःताच हाय म्हणुन ओळख करुन घ्यायची पण इकडे जरा लोकांना विचीत्र वाटत किंवा ते विचित्र नजरेने बघतात अस जाणवल. ही काय अशी ओळ्ख पाळख नसताना हसते. म्हणुन मी तुम्हाला फक्त हाय म्हणुनच थांबले. मला सारख येउन तुमच नाव विचारावस वाटत होत पण मग शांत राहीले. (आता वाटतय उगीचच गप्प राहीले तुमचे भामरगडचे लेख वाचले आहेत त्यावर बोलायच होत)

<<स्वातीला मात्र ती मॅन्स लॅंड मधे आहे कळलचं नाही. मग तीन सुरुवातीला पुढच्यां गटाकडुन सुरुवात केल्या सारखी केली पण बघता बघता केंव्हा मागच्या गटाकडुन गाऊ लागली ते कळलेच नाही. पण मागच्यानी मात्र तीला त्यांच्यात सामावल्याच अजीबात भासवु दिलं नाही.>> मला सांगायच नाही का आपण नो मॅन्स लॅंड मध्ये आहोत. मी आपली दोन्ही बाजुंनी जी गाणी माहिती आहेत ती म्हणायचा प्रयत्न करत होते. Happy

मधुकर,योगेशची लावणी इतकी अप्रतीम होती कि तिकडे बायका पेटल्या व शेवटी तुटकी फुटकी का होईना पण हम भी कुछ कम नही च्या म्हणत त्यानीही एक लावणी पेश केलीच. मात्र योगेश तो योगेशच. सविता आणि पल्ली काही कमी नव्हत्या त्यांचा जास्त वेळ नाचण्याचा स्टॅमिना नव्हता इतकच अस त्यांनी लवकर आवरत घेतल्या मुळे वाटल . याला तुटकी फुटकी म्हणुन हिणवण्याइतकी वाईट नक्कीच नव्हती.

Pages