वर्षाविहार २०१०

क्षण आठवांचे - ववि २०१०

Submitted by निंबुडा on 22 July, 2010 - 00:29

कधी एकदाचा १८ जुलै चा रविवार उजाडतोय असं मला, मोदकला आणि नन्या१० ला झालं होतं. आम्हा तिघांकरताही हा पहिला वहिला ववि असल्याने खूपच उत्सुकता होता.

विषय: 

वर्षाविहार २०१० (यू.के.'ज रिसॉर्ट) : वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 19 July, 2010 - 05:23

DSC01541-compressed.JPG

वर्षाविहार-२०१० यशस्वी केल्याबद्दल सर्व उपस्थितांचे तसेच संयोजन समिती आणि सांस्कृतिक समितीच्या सदस्यांचे आभार.
वर्षाविहार-२०१० चे फोटो, वृत्तांत आणि प्रतिक्रिया इ. साठी हा धागा सुरू करत आहोत. जास्तीत जास्त लोकांनी (विशेषतः वर्षाविहारास प्रथमच हजेरी लावलेल्या मंडळींनी) वृत्तांत लिहावेत अशी आग्रहाची विनंती.

विषय: 

जिसा'चा'राडा चहा स्मारक

Submitted by मीन्वा on 19 July, 2010 - 02:59

जिसा'चा'राडा (पिनाकोलाडा च्या चालीवर) हे चहाचे स्मारक सुप्रसिद्ध चहा प्रेमी श्री श्री रा. (डा. च्च च्च ) रा. चहातज्ञ डॉ. साजिरा यांनी बांधले. हे स्मारक महाराष्ट्र राज्यात पश्चिमेस, रायगड जिल्यात, तालूका खालापूर येथील सुप्रसिद्ध 'यु के'झ रिसॉर्ट (युके! ये वहां है...) येथील भल्यामोठ्या सभागृहात आहे. हे स्मारक १८ जुलै २०१० रोजी मायबोलीच्या वविमधे बांधण्यात आले.

विषय: 

मायबोली वर्षाविहार २०१० - वृत्तांत

Submitted by आशूडी on 19 July, 2010 - 02:18

१८ जुलै २०१०. मायबोलीकर ज्याची गेला एक दीड महिना आतुरतेने वाट पाहत होते तो वर्षाविहाराचा दिवस. दिवसाची सुरुवातच पहाटे पाच वाजता संयोजकांच्या 'गुड मॉर्निंग मायबोलीकर्स' अशा प्रसन्न एसेमेसने झाली. भाषा नाही भावनाओं को समझो! पुन्हा थोड्या वेळाने 'Bus is on the way as per given schedule... Please reach your given bus stop on time' असाही एसेमेस आला. ज्यांचे अलार्म वाजले नसतील त्यांना उठवण्याची ही नामी युक्ती पाहून मला भरुन आलं. पटापट आवरुन मी अगदी वेळेवर पोहोचणार इतक्यात मला वविला येऊ न शकणार्‍या माबोकरांची तीव्र आठवण झाली.

विषय: 

जरा विसावू या वळणावर - मायबोली वर्षाविहार २०१०

Submitted by जिप्सी on 19 July, 2010 - 00:09

कसे कोठुनी येतो आपण
कसे नकळता जातो गुंतून
उगाच हसतो, उगाच रुसतो
क्षणात आतुर, क्षणात कातर
जरा विसावू या वळणावर
या वळणावर . . . . . . . . . .

मायबोलीचा यंदाचा वर्षाविहार दणक्यात पार पाडला. सर्व मायबोलीकर आणि संयोजकांचे मनापासुन आभार. सविस्तर सचित्र वृतांत येतीलच, तोपर्यंत हि एक छोटी "चित्रझलक".

विषय: 

टीशर्ट आले! टीशर्ट आले!!

Submitted by टीशर्ट_समिती on 10 June, 2010 - 06:59

गडद निळे गडद निळे यंदाचे टीशर्ट आले
चपलचरण हे हरीण जणू,सुखवस्तू अन् तुंदिलतनू
लेऊनी रंग हर्षाचे,मायबोलीकर हे वविला निघाले
ह्रदयी आले भरते गं, मनात सावरी फुलते गं
बरसती अंबर, सृष्टी सुंदर, लेवूनी स्वरसाज गाती गं
उत्साहाचे लेणे गं, अविरत आनंद झिरपे गं
सरींवर सरी येती गं, सचैल मायबोलीकर न्हाती गं......

(कवी बा. भ. बोरकर ह्यांची क्षमा मागून...)

जून महिना आला, पाऊस आला, वविची दवंडी आली आणि पाठोपाठ मायबोलीचे टीशर्टही आले की... Happy

tshirt final 2010.jpg

Subscribe to RSS - वर्षाविहार २०१०