वर्षाविहार २०१० (यू.के.'ज रिसॉर्ट) : वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 19 July, 2010 - 05:23

DSC01541-compressed.JPG

वर्षाविहार-२०१० यशस्वी केल्याबद्दल सर्व उपस्थितांचे तसेच संयोजन समिती आणि सांस्कृतिक समितीच्या सदस्यांचे आभार.
वर्षाविहार-२०१० चे फोटो, वृत्तांत आणि प्रतिक्रिया इ. साठी हा धागा सुरू करत आहोत. जास्तीत जास्त लोकांनी (विशेषतः वर्षाविहारास प्रथमच हजेरी लावलेल्या मंडळींनी) वृत्तांत लिहावेत अशी आग्रहाची विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन दिवस झाले. हॅग ओव्हरसंपत नाही. उतारा म्हणुन वर्षाविहार २०१० (यू.के.'ज रिसॉर्ट) : वृत्तांत आणि प्रतिक्रिया
वाचतो आणि पुन्हा झिंग येते. हे रसायन फारच मादक.

व्वा..एकेक फोटो आणि वृत्तांत वाचुन त्या दिवशीच्या प्रत्येक क्षणाची आवर्जुन आठवण येतीये..मस्त!!! येऊदे अजुन Happy

नितीनजी.. झिंग कायम राहणार आहे बरं का.. अर्थात घारूअण्णांनी सांगितल्या प्रमाणे सुवर्णमोहत्सवी ववी आहे ना Happy

लिम्ब्या मुंबै - पुणे असा सलग सहावा

२००५ मावळसृष्टी
२००६ मोदी
२००७ सगुणाबाग
२००८ हेगडे
२००९ मावळसृष्टी
२०१० युके
पुढ्याच्या वर्षी ७वा रे

लई भारी फोटु ! खुपच हेवा वाटतो तुम्हा सगळ्यांचा ,
योगेश( २ डझन) लई भारी लावणी , सोनली कुलकर्णीला तुझ्याकडे पाठवायला पाहीजे शिकवणीसाठी.
अरे कोणाकडे योगेश( २ डझन) च्या डान्सच रेकॉर्डींग असेल तर युट्युबवर अपलोड करा ना.

>> हे म्हंजे अक्षी "योगेशराव मुंबईकर" विरुध्द "पल्ली पुणेकर" अशी फड-बारीच्या लावण्यांची (उभ्याउभ्याच) जुगलबंदी चालु होती.एक मात्र खरं दोह्नीबी फड लैं तयारीचं होते.(संयोजकांस्नी इनंती पुढील वक्ताला अशा कलावंतांसाठी काई पट्का-फेटा, साडीचोळीच्या मानाची यवस्था केली तर लै बरं हुईल बगा >>> Proud

फोटोत दिसणारा पोरगा आगाऊ आहे? हा शाळेत शिकवतो ना?

:प्रचंड धक्का बसलेली बाहुली:
>>>>>>>>>>> नंदिनी अनुमोदन !! आगाऊ "हा" आहे ह्यावर अजुनही विश्वास नाही बसत आहे.. Happy

आगाऊ "हा" आहे ह्यावर अजुनही विश्वास नाही बसत आहे..
काय बोलताय काय.....
ए बघे आगावु... तुला हे सगळे "हा" म्हणताय्त... Proud खरं आहे का ते ? Uhoh

कात्रीच चित्रं समजावायच होत आणि अति तांत्रिक क्लु मुळे त्याचा कंदील झाला. >>> बाय एनी चान्स कोणी आकाशकंदिला सारख्या दिसणार्‍या कात्रीचं प्रचि काढलयं का? Proud Light 1

>>>> गेम्समधून नेहेमीच मायबोली स्पिरिट उफाळून वर येते. अशा खेळांमधून टोटली अनोळखी लोकांशी आपण गप्पा मारतो, थोडी मस्ती होते, खेचाखेची होते.. खेळ नसतील तर जेवणानंतर लोक आपापले कंपू करून फक्त गप्पा हाणतील <<<<<<
पूनमच्या या ठळक केलेल्या वाक्याला, "स्वानुभुतीपूर्वक" सणसणीत अनुमोदन! मला "मायबोलिकर स्पिरीट" फारच महत्वाचे वाटते! Happy

अशा खेळांमधून टोटली अनोळखी लोकांशी आपण गप्पा मारतो>> आपण दोघं तर खेळायच्या अधिच गप्पा हाणल्या ना लिंबु! माबोमे कुछ भी होता है.

माबोमे कुछ भी होता है. >> मी तर भावनेच्या भरात माबो वविला न आलेल्या एका
माणसाला थांबवून खास एकेरीत नाव विचारलं, वर असं ही म्हणलं की अरे आयडी
सांग नुसत्या नावावरून कळत नाही.. जेव्हा कळलं की तो माबोकर नाही तेव्हा
कुठे लपू असं झालेलं मला.. Proud Uhoh

अरे कोणाकडे योगेश( २ डझन) च्या डान्सच रेकॉर्डींग असेल तर युट्युबवर अपलोड करा ना.>>>

श्री..त्या बाफ वर लिंक दिलीच आहे, ही स्पेशल तुझ्यासाठी

http://www.youtube.com/watch?v=MW3fhxPsygY

यालाच म्हणतात दिसते तसं नसते>>>>

मधुकर तुमच्याबाबतीतही मी असेच म्हणेन. आता बघा ना इथे माबोवर आपण इतके भांडलो, सॉरी वाद घातला, पण तिथे इतकी छान मैत्री होइल असे वाटले होते का? पण झाली. खरय दिसते तसे नसते Happy

>> हे म्हंजे अक्षी "योगेशराव मुंबईकर" विरुध्द "पल्ली पुणेकर" अशी फड-बारीच्या लावण्यांची (उभ्याउभ्याच) जुगलबंदी चालु होती.एक मात्र खरं दोह्नीबी फड लैं तयारीचं होते.(संयोजकांस्नी इनंती पुढील वक्ताला अशा कलावंतांसाठी काई पट्का-फेटा, साडीचोळीच्या मानाची यवस्था केली तर लै बरं हुईल बगा >>> Proud >>>>

पल्ले, इथे तुला Blush हि स्मायली टाकायची होती का?

अरे कोणाकडे योगेश( २ डझन) च्या डान्सच रेकॉर्डींग असेल तर युट्युबवर अपलोड करा ना.>>>>>>>अरे मित्रांनो "तो मी नव्हेच" रे, मला साधी भाताची लावणी करता येत नाही तर ही तमाशातली लावणी कशी करू :(. तो आपला "यो रॉक्स".
मी बापुडा फोटुग्राफीतच सुखी Happy

फोटोत कळलेले माबोकर बघून धक्का बसला असे माझ्यासाठी ३ जण आहेत आगाऊ तर आहेच, हा शाळकरी मुलगा इतके मॅच्युअर लिहीतो????? तसच मल्ली आणि असुदेच पण वाटले. मल्लीचे वेंधळेपणाचे किस्से वाचून जी प्रतिमा डोक्यात झाली होती, तो फारच वेगळाय आणि असुदे पण, त्याच्या लिहीण्याचा पद्धतीवरून तो मला तो एकदम पोरगेलासा शाळकरी मुलगा असेल असे वाटले होत. Proud

मल्लीचे वेंधळेपणाचे किस्से वाचून जी प्रतिमा डोक्यात झाली होती, तो फारच वेगळाय
वेगळा म्हंजे चैकट राजा वगैरे म्हणुन प्रतिमा झालेली का ? Proud

अहो, त्या त्या आयड्यांपाठीमागे मुळात कुणीतरी लोक आहेत, हेच महत्वाचे नाही का! Proud मग ते शाळकरी असू देत, नाही तर शाळा करणारे.

विशाल अरे त्या युट्युबमधल साऊंड रेकॉर्डिंग जरा बरोबर नाही. दोन वेळा हा डान्स वेगवेगळ्या लोकेशनला झाला. दुसर्‍या कुणाकडे दुसर्‍या लोकेशनच रेकॉर्डींग आहे का ? एक कलाकार जन्म घेतोय. त्याचा पोर्टफोलीओ नीट व्हायला हवा.

अरे पण हा ववि सलग कितवा होता? पुढच्या वर्षीचा कितवा असणार आहे?...>>>लिम्ब्या मुंबै - पुणे असा सलग सहावा >>> घारूच्या वाक्यात मी थोडी सुधारणा करतो.. कालचा ववि हा मायबोलीचा आठवा ववि होता.. २००३ पासुन या वविला सुरूवात झाली... आणि तीही आपल्या लाडक्या राजांच्या सिंहगडावर... Happy

२००३ सिंहगड
२००४ मुळशी
२००५ मावळसृष्टी
२००६ मोदी
२००७ सगुणाबाग
२००८ हेगडे
२००९ मावळसृष्टी
२०१० युकेज रिसॉर्ट

पहिले ३ ववि हे पुण्याजवळ झाले.. आणि ते मुख्यत्वे पुणेकरांनी अयोजित केलेले होते.. २००६ साली पुणे आणि मुंबई दोन्ही संयोजकांनी मिळुन असे ठरविले की यापुढील ववि हे पुणेकर आणि मुंबईकर या दोघांनाही मध्यवर्ती पडतील अश्या ठिकाणी आयोजित करण्यात येतील. कर्जतच्या मोदी रिसॉर्टपासुन याची सुरूवात झाली..

पुढील वर्षी मायबोलीचा नववा ववि असेल.. आणि माझा आठवा.... सात वविंच्या अनेक धमाल घटनांचा साक्षीदार असलेला मी वविच्या बाबतीत मी मायबोलीवरील सर्वात श्रीमंत माणुस आहे Happy

Pages