समुद्रकाठचा देखावा.
--आर्यक, वय १०
तसा आर्यक ला फार चित्रकलेचा षौक नाही . पण नुकतेच इम्प्रेशनिस्ट स्टाईल बद्दल समजलेय (की नुस्तं ऐकलंय?!), अन व्हॅन गॉफची चित्रं (फक्त)पाहिलीयत काही !! या आधारावर काढलेलं हे चित्र. त्याचं म्हणणं आहे की हा इम्प्रेशनिस्ट स्टाईल सनसेट आहे!! व्हॅन गॉफ ची चित्रं कळली कितपत ते नाही माहित पण नुकतीच पाहिल्याचा प्रभाव रंगाच्या वापरावर दिसतो आहे 

नावः तनिष्क मोरे
वयः १२ वर्ष पूर्ण
इयत्ता: ७ वी
चित्राचे माध्यमः फक्त पेन्सिल
पालकांची मदतः चित्र फक्त २ तासात पूर्ण करुन घेणे
लढाऊ विमाने, तोफा, हेलीकॉप्टर, एवढच काय बाईक्स यांचे डिझाईन तनिष्क ८ वर्षाचा असल्यापासुन काढतोय. विशेष नोंद म्हणजे त्याची कल्पनाशक्ती आणि डिटेलिंग! बाईक्स ( 'धुम' फेम) ची डिजाईन्स तर तो इतकी सफाईदारपणे काढतो की समोर बाइक उभी करुन काढलय की काय असे वाटेल...

नावः राहुल
वय: ६ वर्षं, ६ महिने
माध्यम: जलरंग
हिरवे डोंगर आपल्या जवळ आहेत. त्यांच्या मधून तळे दिसत आहे. त्यावर एक पूल आहे. बर्फाळ डोंगर खूप लांब आहेत. डाव्या बाजूच्या डोंगरावर स्की रिझॉर्ट आहे. तिथपासून दुसर्या डोंगरावर स्किईन्गसाठी जायला केबल कार दिसत आहेत. दुसर्या डोंगरावर काही लोक स्कीईन्ग करत आहेत. आकाशात एक पक्षी आणि सूर्य आहे. 
नावः केतकी दोडमिसे
वयः ७ वर्षे ११ महिने
