
नावः आदिती प्रधान
वयः २ वर्षे आणि ४ महिने
माध्यमः नॉन टॉक्सिक वॉटर कलर्स आणि हाताच्या मुठी.
आईने केलेली मदतः रंग ट्रे मधे काढुन देणे, एकाजागी बसावी म्हणुन शिकस्तीचे प्रयत्न करणे, रंग इकडे तिकडे उडाले तरी संयम राखणे, नंतर ही रंगपंचमी साफ करणे, मस्तीत चुरगळलेला कागद सरळ करणे आणि फोटो काढुन इथे डकवणे.

नाव : कनिका आठल्ये
वय : २ वर्ष ९ महिने
माध्यम : स्केच पेन्स
पालकांची मदत : माऊ काढण्यासाठी ठिपके काढून देणे.

नाव : श्रेयान माळवदे
वय : ४ वर्षे ४ महिने
माध्यम : पेन्सील कलर्स
म्हणे बप्पा माझ्या सारखा आहे बारिक, म्हणून मोठ्ठ पोट नाहीये.

ह्यात रामचे आई-बाबा, तो आणि त्याचे बेबी आहे. मी त्याला आई-बाबा आणि राम काढ म्हणुन सांगितलं तर सर्वात पहिले त्याने बेबी काढला (त्याच्या कल्पनेतला) मग ते झाल्यावर म्हणे कार काढु. एक कार काढुन झाल्यावर दुसरी काढु म्हणे. मग मी त्याला घर पण काढायला सांगितलं आणि शेवटी रस्ता पाहिजे म्हणुन मनाने रस्ता काढला. शाळेत लिहीतात त्याप्रमाणे नाव लिहीले.

नाव : वेद नाटेकर
वय : १ वर्ष ८ महिने
माध्यम : वॉटर कलर
पालकांची मदत : अर्थातच, त्याच्या हाताला रंग लावणे (फासणे), त्याचा हात कागदावर उमटवणे, चोच्,डोळा आणि तुरा काढणे. आणि महत्वाचे म्हणजे नंतर हात धुणे. (आणि चित्र ईथे अपलोड करणे)
एकाजागी आईजवळ बसणे (जे त्याच्यासाठी अत्यंत अवघड आहे) एवढाच काय तो वेदचा सहभाग.:)
~साक्षी

नाव: इशान
वय: २ वर्षे ३ महिने
माध्यम: वॅक्स क्रेयॉन्स
पालकांनी केलेली मदत: विषय देणे, कागद बोर्डवर लावुन देणे. सर्कल काढ असे सांगावे लागते (मग तो जे काही काढेल त्याला सर्कल म्हणावे लागते). तसेच मधे ISHAN लिहिले आहे ते डॅडीने इशानचा हात धरुन गिरवले आहे.

नाव : मृण्मयी शैलेंद्र साठे
वय : १२ वर्षे २ महीने
माध्यम : वॉटर कलर्स