वाघाने फोडली डरकाळी...

वाघाने फोडली डरकाळी...

Submitted by ग्लोरी on 8 June, 2012 - 01:10

वाघाने फोडली
डरकाळी
पक्षी उडले
आभाळी

माकड भलते
घाबरले
झाडावर
वरवर चढले

टवकारले
हरणांनी कान
इकडून तिकडे
फिरवली मान

पाण्यामधल्या
मासोळ्या
पाण्यासोबत
थरथरल्या

खाकरला
वाघाने घसा
जंगल झाले
एक ससा

- ग्लोरी

गुलमोहर: 
Subscribe to RSS - वाघाने फोडली डरकाळी...