Submitted by ग्लोरी on 8 June, 2012 - 01:10
वाघाने फोडली
डरकाळी
पक्षी उडले
आभाळी
माकड भलते
घाबरले
झाडावर
वरवर चढले
टवकारले
हरणांनी कान
इकडून तिकडे
फिरवली मान
पाण्यामधल्या
मासोळ्या
पाण्यासोबत
थरथरल्या
खाकरला
वाघाने घसा
जंगल झाले
एक ससा
- ग्लोरी
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
अतिशय सुरेख बाल कविता - खूप
अतिशय सुरेख बाल कविता - खूप आवडली......
छान
छान
पुरंदरे शशांकजी, अनुसयाजी खूप
पुरंदरे शशांकजी, अनुसयाजी
खूप खूप धन्यवाद.
खुप छान
खुप छान