~ विठ्ठला ~
Submitted by Ramesh Thombre on 29 May, 2012 - 11:57
पांगले का विश्व सारे, सांग बा रे विठ्ठला
सावरावे या मनाने, आज का रे विठ्ठला
जिंकलेले खेळ सारे, आज आहे हारलो
मागतो का सांग मी रे, चांद तारे विठ्ठला
पाहिले मी आज काही, जे न होते पाहिले
हे बरे की अंध होतो, तेधवा रे विठ्ठला
काय केले काम त्यांनी, भाषणेची ठोकली
नाम नाही श्रीहरीचे, फक्त नारे विठ्ठला
राम नाही देखिला मी, भांडतो त्याला जरी
देव तोची आज हृदयी, थाटला रे विठ्ठला
- रमेश ठोंबरे
(विठूच्या गझला)
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा