पिल्ले - मनी माऊची

पिल्ले - मनी माऊची

Submitted by पुरंदरे शशांक on 17 May, 2012 - 01:43

पिल्ले - मनी माऊची....

आली अचानक कुठुन कोण
मनी माऊची पिल्लेच दोन

दूध मिळताच आनंदली इतकी
मजेत त्यांनी घेतली गिरकी

खाऊ खावून खेळतात मस्त
कौतुक होते - मनुडी मस्त

पांढरे केशरी पट्टे छान छान
सतत असतात टवकारुन कान

खेळत असतात एकमेकांशी
भांडतातही कधी जराशी

खेळून भांडून दमतात जेव्हा
झोपतात एकमेकांच्या कुशीत तेव्हा

चिंटू - पिंटू जमतात सारे
टाळ्या पिटीत म्हणतात वा रे

पिल्लांबरोबर खेळतात खूप
रोज त्यांना नवा हुरुप....

गुलमोहर: 
Subscribe to RSS - पिल्ले - मनी माऊची