दुधिया हलवा --
Submitted by निवा on 24 April, 2012 - 12:12
साहित्य -- एक छोटा कोवळा दुधी भोपळा, एक लिटर दुध, दोन चमचे साजूक तूप,
पाच टे.स्पून साखर किंवा आवडीप्रमाणे, काजू - बदाम काप, थोडे बेदाणे, थोडीशी वेलदोडा पुड.
कॄती -- प्रथम भोपळ्याच्या साली काढून घ्या. खिसून घ्या. आता कढईमध्ये तूप घाला व त्यावर
भोपळा खिस घालून चांगला परतून घ्या व आता त्यामध्ये दूध घाला, गॅस बारीक
करा, आता तुमचे काम फक्त येताजाता ते ढवळत रहाणे. तुमचे काम तुम्ही करु
शकता,
आता हे दुध आटत जाउन त्याचा छान खवा बनू लागतो. वेगळा खवा घालायची जरुरीच नाही.
दुध पुर्ण आटले की त्यात साखर, काजू - बदाम काप, थोडे बेदाणे, थोडीशी वेलदोडा पुड घालून पुन्हा
थोडावेळ परतुन घ्या.
विषय:
शब्दखुणा: