परवा श्रावणातला शेवटचा सोमवार होता. बायकोने शिवमंदीरात जाण्याचा आणि मला ही नेण्याचा बेत माझ्याही नकळत दुपारीच बनवला. फोनवर मला तसे कळवण्यात आले. ऑफिसमध्येही नेमके त्याच दिवशी जरा जादा काम असल्याने संध्याकाळी एक्स्ट्रा थांबावे लागणार होते. त्यानंतर पुन्हा मंदीर. वैताग नुसता डोक्याला. पण नकार देण्याचा पर्याय नव्हताच. मी आत नाही येणार बाहेरच थांबेन एवढ्यावर काय ती मांडवली केली.
वेळ - रात्रीचे दहा-साडेदहा
स्थळ - लाल मैदान - खचाखच भरलेले. (कारण मैदान असे नाव असले तरी दहा बाय बाराच्या चार खोल्या जोडल्या तर जेवढी जागा तयार होईल तेवढाच याचा आकार. लाल रंगाच्या गेरूने थापलेली जमीन म्हणून लाल मैदान.) मैदानभर अंथरवलेल्या सतरंज्या. त्यावर जो तो आपली आवडीची जागा बघून पसरलेला. मंडळाचे सेक्रेटरी आणि दोन-चार पदाधिकारी यांच्यासाठी तेवढ्या मांडलेल्या खुर्च्या. सारे जण एकेक करून रात्रीची जेवणे आटपतील तसे जमत होते.
"तू अजून शोले नाही पाहिलास...???" मी जवळजवळ किंचाळलोच.
बायको माहेरी जाऊन आज पाचवा दिवस उजाडला होता. गेले चार दिवस तिचे आयुष्यात नसणे फारसे जाणवले नाही, कारण कामाच्या व्यापात गुंतलो होतो, किंवा स्वताला गुंतवून ठेवले होते म्हणालात तरी चालेल. सकाळी उठल्याऊठल्या टॉवेल शोधण्यापासून चहा गरम करून देण्यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींवरून तिची आठवण यायची पण फारशी कमी जाणवायची नाही. आपले आपणच काहीतरी करू शकतो हे माहीत असायचे. दुपारी जेवताना आज डबा नाही तर बाहेर खावे लागणार म्हणून पुन्हा ती आठवायची, पण रोज रोज घरचा डबा खाण्यापेक्षा चार दिवस बाहेरचे खाऊन जीभेचे चोचले पुरवुया हा विचार करून बरेही वाटायचे.
व्यक्ती आणि वल्ली - १ ..... "खुफियापंक्ती"
स्थळ - आमची मुंबई लोकल ट्रेन
वेळ - थोड्याफार गर्दीची.
प्रमुख कलाकार - दोन निरागस(?) मुले. एक किडकिडीत शरीरयष्टीचा, तर दुसरा अगदी त्याच्या उलट.. आणि त्यांच्या सोबतीला एक सुंदरशी मुलगी.
आणि मी??
नाही हो, मी आपला फक्त निवेदक..
चला, तर मग घटनास्थळीच घेऊन जातो तुम्हाला.
....................................................................................................
....................................................................................................
या आधीचे भाग १-२-३ खालील लिंक वर वाचू शकता.
http://www.maayboli.com/node/34649
आणि जर का ते वाचले नसतील तर ते वाचूनच मग हा भाग वाचायला घ्या.. 
........................................................................................................................
.
.
------------------------------------------ भाग -४ (अंतिम भाग) -------------------------------------------
.
.
.......................................................................................................................
.
.
या आधी मी " एक रात्र सरपटलेली ~‘~‘~‘ ...!! " या नावाची कथा प्रसिद्ध केली होती. नसेल वाचली तर खालील लिंकवर जाऊन जरूर वाचा.
http://www.maayboli.com/node/34540
तर याच कथेवरून तसेच काहीसे आणखी सुचले, दोन्ही कथा वाचल्या तर आपल्याला काहीसे साधर्म्य जाणवेलही.
पण ती कथा मी जराशी भयप्रद आणि थरारक बनवली होती. तर ही मात्र हलकीफुलकी केली आहे.
तरी तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करतो.
तर या कथेचे नाव आहे .. " एक रात्र भूss..र क ट ले ली..!! "
.......................................................................................................
-------------------------------------------------- भाग १ --------------------------------------------------
आई.. आई.. आयई ग्ग..!! शमीन’ने एक कचकचून आळस दिला. ट्रींग ट्रींग.. ट्रींग ट्रींग.. ट्रींग ट्रींग.. ठप्प.. वाजणारा अलार्म बंद केला आणि ताडकन उठून दोन्ही हात गर्र्कन फिरवत आळस झटकून दिला.
"अरे आजकाल काय चालू आहे तुझे? रोज वेळेवर उठतोस", आई कौतुकानेच म्हणाली.
"अग, सांगितले ना, हल्ली नियम खूप कडक झालेत, त्यात नवीन बॉस आलाय, जावे लागते ग मग अश्यावेळी काही दिवस वेळेवर." सहजपणेच शमीन’ने उत्तर दिले.
एक रात्र सरपटलेली ~‘~‘~‘ ...!!
.
.
.
तो आवाज आजही मला साद घालतो..!