....जिद्द....
Submitted by gauravkhond on 12 September, 2012 - 14:23
हाड मासाचा पुतळा घेउनी चालतो मी
हृदयात दडलेल्या भावनांना जळतो मी,
अश्रूद्वारे आठवांना सोडतो वाहून मी
खेळत जीवनाच्या यातनांना भोगतो मी,
मृगजळा सम आठवांना पकडण्या धावतो मी
निर्जन वाटन वारी का एकटा मग राहतो मी,
मी कसा वेडा पिसा त्या भावनांना पाहतो मी
न कधी झाले न होईल का अश्यांना इच्छितो मी,
या उरावर घाव ताजे अजूनही ठेवतो मी
यातनेने त्या खुणांच्या जगण्याची जिद्द वाहतो मी,
या नभाला हात ऐसा लाउनी मग पाहतो मी
क्षितीज गाठण्याची जिद्द उराशी राखतो मी ...
- गौरव खोंड
विषय:
शब्दखुणा: