'जन गण मन' - २६ जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये आणि इंटरनेटवरही!!!
Submitted by माध्यम_प्रायोजक on 4 January, 2012 - 06:09
काही वर्षांपूर्वी भारत सरकारनं सर्व शिक्षा अभियानाला सुरुवात केली, आणि सगळीकडे ’स्कूल चलें हम’ ऐकू येऊ लागलं. शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार, आणि या अधिकारापासून कोणीही वंचित राहू नये, म्हणून स्वातंत्र्याची पन्नाशी उलटल्यानंतर मोठ्या धडाक्यात हे अभियान हाती घेतलं गेलं. या अभियानाची बर्यापैकी भिस्त होती ती शिक्षणसेवकांवर. बी.एड.ची पदवी नसलेल्या, पण शिक्षकांचं काम करणार्या या पदवीधारक शिक्षणसेवकांमुळेच अनेक लहान गावांमध्ये मुलं गमभन गिरवू शकली.
शब्दखुणा: