बालनाट्य आणि मी - श्रीमती सुलभा देशपांडे
Submitted by माध्यम_प्रायोजक on 28 August, 2013 - 12:06
लहान मुलांमध्ये असलेल्या प्रचंड ऊर्जेला योग्य वळण लागलं नाही, तर त्याचे गंभीर परिणाम होतात, असं हल्ली वर्तमानपत्रांमध्ये अल्पवयीनांकडून घडणार्या गुन्ह्यांच्या, आत्महत्यांच्या वाढत्या संख्येबद्दल, लहान मुलांना सामोरं जाव्या लागणार्या ताणाबद्दल बोलताना समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ सांगतात.