कोडे......

कोडे......

Submitted by पुरंदरे शशांक on 19 October, 2011 - 06:34

कोडे......

"शी बाई आई, कसली ही अळी
अंगभर केस नि किती वळवळी"

"हा तर सुरवंट दिसतो जरी कुरुप..
होईल एक गंमत, बदलेल हा रुप.."

"रुप कसे बदलेल याचे गं आई ?
नकटे माझे नाक, कधी अस्से होईल का बाई..?"

"गंमत तर पुढे पाहशील खरी....
जेव्हा हा कोषात आपले घर करी...
अंगाभोवती विणेल हा कोष
करील आराम नि लांबलचक झोप...
झोपेतून हा बाहेर येईल जेव्हा
कित्ती गोड फुलपाखरु टाळ्या पिटशील तेव्हा.."

"काही ही सांगतेस लहान मी म्हणून..
असली घाण अळी येईल फुलपाखरु होऊन ...?"

"हो गं राणू माझी, अशीच होते गंमत
सुरवंटाचे रुप टाकून फुलपाखरु येई तरंगत...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - कोडे......