Submitted by पुरंदरे शशांक on 19 October, 2011 - 06:34
कोडे......
"शी बाई आई, कसली ही अळी
अंगभर केस नि किती वळवळी"
"हा तर सुरवंट दिसतो जरी कुरुप..
होईल एक गंमत, बदलेल हा रुप.."
"रुप कसे बदलेल याचे गं आई ?
नकटे माझे नाक, कधी अस्से होईल का बाई..?"
"गंमत तर पुढे पाहशील खरी....
जेव्हा हा कोषात आपले घर करी...
अंगाभोवती विणेल हा कोष
करील आराम नि लांबलचक झोप...
झोपेतून हा बाहेर येईल जेव्हा
कित्ती गोड फुलपाखरु टाळ्या पिटशील तेव्हा.."
"काही ही सांगतेस लहान मी म्हणून..
असली घाण अळी येईल फुलपाखरु होऊन ...?"
"हो गं राणू माझी, अशीच होते गंमत
सुरवंटाचे रुप टाकून फुलपाखरु येई तरंगत...
धीर धर जरा, लक्ष ठेव कोषाकडे
तुझे तुला कळेल फुलपाखराचे कोडे.."
"कशाला आई थांबूया एव्हढे ?
गुगल सोडवेल ना लगेच हे कोडे..."
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
हि पण छाने
हि पण छाने
विषय छान आहे, वेगळा
विषय छान आहे, वेगळा आहे.
---------------------------------------------------------------
पण बालकविता असल्याने
ठेक्यात, तालात म्हणण्याच्या दृष्टीने
अधिक विचार करायला हवा होता असं वाटतं.
छाने भिडेकाकांना अनुमोदन
भिडेकाकांना अनुमोदन
आवडली काका +१
आवडली
काका +१
छान.
छान.
सर्वांचे आभार.... भिडेकाका -
सर्वांचे आभार....
भिडेकाका - <<पण बालकविता असल्याने
ठेक्यात, तालात म्हणण्याच्या दृष्टीने
अधिक विचार करायला हवा होता असं वाटतं.>> नक्कीच प्रयत्न करेन...
छान.
छान.