जेम्स
Submitted by आशयगुणे on 29 September, 2011 - 14:22
मुंबईतले सेंट झेविअर्स कॉलेज हे 'मल्हार फेस्ट', इंग्लिश बोलणारी मुलं, 'कपडे आहेत कि कापडं आहेत' असं वाटणारे कपडे घालणाऱ्या मुली, 'बड्या बापाचे' असणारे विद्यार्थी ह्या गोष्टींसाठी बरेच चर्चेत असते. पण फार कमी लोकांना माहिती आहे ते तिकडे असलेल्या एका 'लायब्ररी' बद्दल! ही लायब्ररी पुस्तकांची वगेरे नसून चक्क संगीताची आहे.ह्या लायब्ररीचा हेतू 'भारतीय शास्त्रीय संगीत प्रचार' हा आहे. १९७० च्या सुमारास इथल्या प्राचार्यांना ही कल्पना सुचली. त्यांनी 'इंडिअन म्युसिक ग्रुप' नावाची संस्था सुरु केली.
गुलमोहर:
शेअर करा