रेझिलियन्स
Submitted by निनाद on 7 September, 2011 - 00:46
दलजीतचं लग्न झालं आणि ती भारतातून ऑस्ट्रेलियात आली. नवर्याबरोबर समाधानाने संसार चालला होता. नवर्याला शेतीची आवड असल्याने अनेक वर्षे शहरात नोकरी केली आणि पैसे जमवले. ऑस्ट्रेलियात संत्री आणि द्राक्षांची शेती घेतली. काही काळ स्थिर होण्यात गेला. दलजीतचा सारा वेळ मुलांचे संगोपन आणि घरकाम यातच जात असे. तीन मुले पदरी असतांना चाळिसाव्या वर्षी अचानकपणे नवरा गेला!
विषय:
शब्दखुणा: