आमंत्रण लेखनस्पर्धा - "आवताण ... लै वरताण" - बेफ़िकीर
सर्वधर्मीय देवता, विभुती, गाय, शंख, उंदीर, गरूड, खार, इतर वाहने, जटायू व अमिताभ बच्चन प्रसन्न
आगतम स्वागतम सुस्वागतम
आमच्या येथे आमच्या येथील मात्र सहसा आमच्या येथे नसणार्या आमच्या द्वादशद्वितीय
सुपुत्र मारत्या उर्फ़ नाना उर्फ़ शाहरूख उर्फ़ नवा डॉन याचे लग्न ठरलेले आहे.
अकलूज येथील बेरके गायकवाड पाटील इनामदार वाघमारे यांची सुलक्षणी कन्या हौसा
उर्फ़ यमुना उर्फ़ सौभाग्यकांक्षिणी वैजयंतीमाला बेरके गायकवाड पाटील इनामदार वाघमारे
हिच्याशी शके १९५२ दिनांक ८ ऑक्टोबर रोजी अकलूज येथेच घरच्या मांडवात मध्यरात्री दिड वाजता