॥ असल्लाम वालेकुम ॥
श्री.रा.रा.
स.न.वि.वि.
आमचे येथे परवरदिगार अल्लाहच्या कृपेने
वर: चि. अब्दुल रशीद सलीम सलमान (सल्लू)
(बागी, सनम बेवफ़ा, साजन, सूर्यवंशी, दुष्मन दुनियाका, वीर, बॊडीगार्ड )
(श्री. सलीम, सौ सलमा खान, रा. मुंबई, यांचे ज्येष्ठ चिरंजीव)
ह्याचा निकाह इस जुम्मेके दिन संध्याकाळी संपन्न होत आहे. तरी ह्या शुभमंगल प्रसंगी आपण सहकुटुंब सहपरिवार (बेगमा - किमान ०, कमाल ४; बच्चे - किमान ०, कमाल मर्यादा नाही) उपस्थित राहून वधू-वरांस शुभाशिर्वाद द्यावेत ही नम्र विनंती. कुर्यात सदा दबंगम!
आलात शुध्दीवर? बरं वाटतंय ना आता? खरं तर सुरुवातीलाच ’ही आमंत्रणपत्रिका खुर्चीवर बसून वाचावी. उपाशीपोटी वाचू नये. ह्रदयविकार किंवा उच्चरक्तदाबाचा विकार असलेल्यांनी वाचू नये.’ अश्या सूचना द्याव्यात असं मी सुचवलं होतं. पण कधी नव्हे ते माझ्या दोन बेगमांचं त्याविरुध्द एकमत झालं. मी ’मायनॊरिटी’ मधे गेलो. आणि आमच्या घरात ’मायनॊरिटी’ म्हणजे ’मायनॊरिटी’च. तिथे ’मायनॊरिटी’च्या ’मता’ला ’जास्ती’ची किंमत मिळत नाही.
हं, तर काय सांगत होतो, सलमानचा निकाह. तुमच्या चेहेयावरचं प्रश्नचिन्ह दिसतंय मला - दुल्हन कोण? ह्याचं उत्तर अजून बुरख्यातच आहे. झालं काय की सलमानने त्याचं लग्न स्वत:च ठरवलं. मग त्याच्या आयांनी हट्टच धरला की आम्हाला बहूचा फ़ोटो तरी दाखव. सलमानने फ़ोटो दाखवला तर तो पूर्ण बुरख्यात, म्हणजे फ़ोटो हो. त्यामुळे मिसेस सलमान कोण आहे हे आम्हालाच माहित नाही. तसंही हा अर्धा वेळ शर्ट न घालता फ़िरतो. त्याची भरपाई तिने पूर्णवेळ बुरख्यात राहून केली तर बरंच आहे.
तुम्हाला खरं सांगू का? ’मांका प्यार’, ’मांका दिल’ वगैरे टिपिकल जजबाती संवाद मी हिंदी पिक्चरात खूप ऐकलेत, लिहिलेतही. पण आखीर ’बापका दिल’ तो ’बापका दिल’ होता है ना. सलमान जेव्हा बनियन घालून फ़िरायचा, म्हणजे ’लहानपणी’ बनियन घालून फ़िरायचा तेव्हापासून मी त्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्नं रंगवली आहेत. पुढे त्याच्या आयुष्यात अनेकजणी आल्या तरीसुध्दा एकही आमच्या घराचा उंबरा ओलांडून सून म्हणून आली नाही. पाठीमागचे अरबाझ, सोहेल बोहोल्यावर चढले. सकाळी फ़िरायला जाताना लोक रोज मला विचारायचे ’सलीमभाई, सलमानके निकाहके लड्डू कब दे रहे हो". या अल्ला! रो रो के मेरे आंसू सूख गये थे. फ़िर उस दिन सलमान आकर बोला "अब्बू, मै शादी कर रहा हू". सच कहता हू, मेरे तो आंसू निकल आये.
अच्छा वो सब छोडिये, लेकिन ध्यानमे रहे. बायकांनी बुरखा घातलाच पाहिजे असं नाही. पुरुषांनी मात्र सूटाच्या वर बाहेरून (सुपरमॆन स्टाईल) बनियान घालायला हवा असा आमच्या सल्लूचा प्रेमळ ह्ट्ट आहे. तुम्हाला माहितच आहे की सल्लूके गुस्सेसे डर नही लगता, प्यारसे लगता है. आणि हो, निकाहला सोमी, कॆटरिना, ऐश्वर्या कोणीही येणार नाहिये. तुमचा अपेक्षाभंग होऊ नये म्हणून आधीच सांगतोय.
चलिये, फ़िर निकाहके दिन मिलते है.
खुदा हाफ़िझ!
आपलाच सलीम खान
अरहान, निर्वान, योहान - चाचूके निकाहमे जरूर आना
.............................
....................................... शेवटी तुम्ही त्याच्या बांधले गुडघ्याला बाशिंग
धागा सार्वजनिक
धागा सार्वजनिक करा..................
(No subject)
(No subject)
(No subject)
धन्स मंडळी. udayone, धागा
धन्स मंडळी.
udayone, धागा सार्वजनिक केलाय आता. धन्यवाद!
मस्तच
मस्तच
(No subject)