नमस्कार मायबोलीकर्स..
ध्वनी प्रदुषणामुळे होणार्या त्रासाबद्दल सल्ला हवा आहे.
माझा एक शेजारी आहे, तो वारकरी आहे. इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण तो डोक्याने बर्यापैकी सरकलेला आहे.
तो आणि त्याचे कुटुंबीय सकाळी ४ ते ७ आणि रात्री २-३ तास (वेळ ठरलेली नसते पण ६ ते १० ह्या वेळेत कधीही) जोरजोरात टाळ वाजवुन 'इठ्ठला'ची भक्ती करत असतात. शिवाय दिवसाही जर वेळ मिळाला तरी कधीही टाळ वाजु शकतात.
वर्तमानपत्रात छोट्या जाहिरातींमध्ये एक ठळक अक्षरातील जाहिरात लक्ष वेधून घेते : वधू पाहिजे, वर सुशिक्षित/ उच्चशिक्षित, परदेशात कायमचे वास्तव्य / ग्रीन कार्ड, स्वतःचे घर, गाडी इत्यादी इत्यादी, कोणतीही जबाबदारी नाही.... वधूबद्दल अपेक्षा....
आणि मग एवढ्या माहितीच्या आधारे अनेक वधुपिते त्या स्थळाच्या मागे लागतात. भराभर सोयीच्या तारखांना भेटीगाठी ठरविल्या जातात, चट मंगनी पट ब्याह होतो, नवरा-नवरी परदेशी त्यांच्या घरी रवाना होतात, किंवा नवरा अगोदर जातो - नवरी काही कालाने व्हिसा वगैरे औपचारिकता पूर्ण करून मग जाते. सारे काही आलबेल होते. पण ते तसे खरेच होते का?