घरच्या संगणकाचा मॉनिटर अचानक बंद पडतोय
लोक्स PC संदर्भात मार्गदर्शन हवं आहे.
माझ्या घरच्या कॉम्पुटरचा मॉनिटर अचानक मधेच बंद होतो. म्हणजे ठराविक वेळ झाल्यावर नाही - कधीही आणि फक्त मॉनिटरच बंद होतो. CPU व्यवस्थित सुरु असतो. काही वेळाने अचानक सुरु होतो. मग परत काही वेळाने बंद. हा "काही वेळ" ५ मिनिटं पण असू शकतो आणि अर्धा-पाऊण तास पण.
मॉनिटर तपासून झालाय आमच्या कॉम्प्वाल्याकडून आणि तो त्यांच्याकडे ओक्के चालतोय - असं त्याचं म्हणणं आहे. त्याने फार वेळ चालवून पाहिला नसावा.
आता तो बहुतेक CPU घेऊन जाईल. मी सगळे सेटिंग बघितले. मॉनिटर अचानक बंद पडेल असं काहीही नाहीये.
सगळे स्विचेस, वायरी लूज कनेक्शनसाठी तपासून झाल्या आहेत.