२ ऑगस्ट १२ :
* मायबोलीवर आल्यापासून रच्याकने, गटग, विपु, माबो, धन्स, फामा अशा संक्षिप्त आणि विक्षिप्त शब्दांचे खडे सतत दाताखाली यायचे. हळुहळु अंदाजाने बरेच खडे विरघळले. तरी रच्याकने हा मात्र परवा परवा एका सज्जनाने समजावून दिला तो असा : रच्याकने म्हणजे ' रस्त्याच्या कडेकडेने '
म्हणजे बाय द वे (याचाही 'बादवे' होतो), म्हणजे जाता जाता, म्हणजे अवांतर!
रापून घेतले मी भट्टीत वेदनांच्या
का चार शब्द लिहितो लाटेवरी क्षणांच्या?...१
वेदना=जाणीव (दु:खद आणि सुखद सुद्धा!)
(मूळ धातू-विद्)
मी राजहंस ठावे हे जन्मजात मजला
डबक्यात डुंबतो का संगे बदकजनांच्या?...२
सृजनात प्राण माझा जे सत्य तोच वाद !
का गुंतवू स्वत:ला वादात खंडनांच्या?...३
एकांत हाच छंद, गर्दीत सौख्यभंग !
का तोडतो तरीही पासून सज्जनांच्या?...४
कळते परी न वळते- जगणे मना, विकारी
मृत्यू, जराच अंती रसदार यौवनांच्या !...५
कसला असा उन्हाळा? दुनियाच तापलेली
हा स्नेहलेप ठरु दे हृदयावरी मनांच्या !...६