भावनिक बुध्दयांक
Submitted by बाटेल बामन on 10 February, 2011 - 13:06
भावनिक बुध्दयांक......
कुठे लिहावे ते समजेना म्हणुन या पानावर देत आहे. अयोग्य असेल तर सांगावे.
.
.
माबोकरांनो मला भावनिक बुध्दयांका(EQ) बद्दल जाणुन घ्यायचे आहे. पेपरमधे व इतर चर्चेत अॅकेड्मीक हुशारीपेक्षाही EQ ला जास्त महत्व आहे असे वाचण्यात ऐकण्यात आले होते. त्यासाठी मी एक इंग्रजीमधे पुस्तक आणले वाचले पण ते जास्तकाही कळले नाही.
अॅकेडमिक रेकॉर्ड एकदम एक्सलंट असतानाही मला करिअर मधे पाहीजे तसे यश मिळाले नाही असे मला दिड तपानंतरही वाटते. कुठे मुलाखतीला गेल्यावर मला खुप टेंशन येते.भीती वाटते.
आणि मग रिजेक्शन.....