सतीच्या चालीचा बोल बाला
विधवा विवाह मात्र बंद केला
तोंड्याळ मानस असतात जितकी
त्यांनाच समाज म्हणतात मुकी
पर जातीत विवाह केला
तर समाज बोट उचलतो
विधवा सती जाणार नसल्यास
तिला बळच जाळात ढकलतो
घरातले विचार चौपाटीवर
पोहोचतात तरी कसे
चूक आपली नसते
घरातलाच बाहेर भूकताना दिसेल
आवड गंज खेळाची मुलीला
समाजाची बंधनेही पाळावे लागतात तिला
मग ऑलम्पिकचे पदक जिंकल्यावर
बक्षिसे का इतकी देता तिला?
कवी- सुशिल गणोरे
सोनेरी तो सूर्य उगवला
पारतंत्र्याचा हिम पिघळला
मातीचा पण रंग उजळला
विजयाचा तो गुलाल उधळला
बघा विजय कसा मिळवला
देहाचा हा डोंगर सांगतो
रक्ताची तर चारी वाहिली
पारतंत्र्याची तेव्हा रेघ पुसली
विजय साजरा करावा कसा
आश्रुंनीच विहीर भरली
क्रांतीची ज्यांनी मशाल पेटविली
जीवनाची त्यांच्या ज्योत विजली
सुशिल गणोरे
स्त्रीयत्वाची लाज राखण्या
जगात झटल्या अनेक माउल्या
स्त्री म्हणजे काय असते
ती तर महान माय असते
कधी क्रोधीत झाली
तर ती महाकाय असते
जीवन आहे हिचे खडतर
पण तोंडही चालते हिचे फडफड
सजण्याचा आहे हिला फार छंद
लढन्याचाही तेवढाच आहे तिला गंध..............
सुशिल गणोरे
अजब आहे वसुंधरा
तिला संगे रवीचा तेज पार
जोडीला पृथ्वीचा सारा गोतावळा
तेव्हाच पृथ्वीचा साज पुरा
अस नाही का वाटत?
जाळ्याची उपमा द्यावी याला
राजकारनासारखा चाले
संसार यांचा सारा
वातावरणाचे सर्व बदल
जसे खेळातील चढ-उतार
घोळच घोळ सर्वत्र
नोंद येणाऱ्या घडीची अशक्य
याची मदार त्याच्यावर
अवलंबून सर्व मानवावर
एकाशी एक जोडी त्यांची
का म्हणू नये जाळे यास्नी.............................
सुशिल गणोरे