मेणबत्त्याही तेवढ्याच जाळायच्या आहे
Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 14 July, 2011 - 01:26
( इतिहास, धर्म, जात यांचा आधार घेऊन होणार्या अपप्रचाराला / विचित्र आंदोलनांच्या आवाहनांना / जुन्या गोष्टींच्या आधारे नवीन जातीय शेगड्या पेटवणार्यांच्या भाषणांना बळी पडणार्या माझ्या बंधूंना ...)
आम्हाला फक्त भडकायचे आहे ...
कोणावर, कशावर हे नक्की नाही ..
नक्की असायची गरज नाही ..
पण कोणावर तरी भडकायचे आहे !
भडकवणारा कोणी असेल
तेव्हढाच आम्हाला प्रिय आहे
भडकण्यातच मौज आहे
भडकण्याची सर्व मजा आहे !
सूड भावना असलीच पाहिजे
जहरी जीभ सुटलीच पाहिजे
कोणालातरी मारण्या-जाळण्याची
फुर-फुरी तर उठलीच पाहिजे
सूड घेता आला तर
जीवनाला अर्थ आहे
चूड लावला नाही तर
जीवन सारे व्यर्थ आहे