ऑरिगाता- कागदी फुले-ज्वेलरी बॉक्स आणि फोटो फ्रेम.
मी सध्या ऑरिगाता ही जपानी कला शिकतेय. ऑरिगाता हे ओरिगामी पेक्षा पूर्ण वेगळं आहे!
यात क्रेप पेपर्स चुण्या करून धुवून, ३-४ तास वाळवून, फेविकॉलने चिकटवतात. असे चिकटवल्यावर कागदाची जाडी आणि पर्यायाने स्ट्रेंथ वाढते. मग या कागदाची फुलं, पानं कापून त्या कापलेल्या आकारांना पीळ द्यायचा आणि २४ तास ती तशीच ठेवायची. दुसर्या दिवशी सगळे पीळ सोडवून थोडा आकार द्यायचा आणि मग फुलं, पानं वगैरे चिकटवायची.
मी ही सगळी प्रक्रिया खूपच थोडक्यात सांगितली आहे. या प्रकारच्या फुलांनी मी एक ज्वेलरी बॉक्स सजवला, त्याचं हे प्रचि.