"चार-चौघांसारखे जगणार नाही"
बोलणे सोपे! कृती जमणार नाही
जोडली आहे नभाशी नाळ माझी
मी कधीही पूर्ण कोसळणार नाही
वृक्ष आहे का असा बागेमधे - जो
पश्चिमी वार्यांपुढे झुकणार नाही?
माणसे निष्क्रीय ही झालीत इतकी
तुझे खुले केस भारणारा सुगंध या मारव्यास नाही
तुझ्या बटांचा मुजोर झोका, टपोर गोर्या फुलास नाही
तुझीच चाहूल जाणवावी, उधाण या भावनांस यावे
पुन्हा पुन्हा झेप घेत आहे, लगाम माझ्या मनास नाही
मी कुणा पटलोच नाही
की खरा कळलोच नाही?
मी कसा हे दाखवाया
अंतरी शिरलोच नाही
ते तिचे नसणार डोळे
मी जिथे दिसलोच नाही
जिंकण्याचा अर्थ कळला
मग कधी हरलोच नाही
संपली माझी गरज अन्
मी कुणा स्मरलोच नाही
मरणही ध्यानी रहावे
नजर भिडवायची नाही , हसू दडवायचे नाही
कसे समजू तुला काहीतरी सुचवायचे नाही?
तुझ्या शाळेत आयुष्या , चला इतके तरी शिकलो
इथे कोणी कुणा काही कधी शिकवायचे नाही
मघाशी बोलणारे ते तुझे नव्हतेच का डोळे?
मी न वेडा मानसी मज धार नाही
आजवर केला कुणावर वार नाही
शोधला संसार हा संवेदनांचा
हाय! दिसले एकही पण दार नाही
पाहिले जन्मातले उपचार सारे
वेदनेने पाळला व्यवहार नाही
देत गेलो जे हवे ज्या ज्यास ते पण
मिठीत येते रंग उधळते म्हणते 'नाही'
हात लावता डोळे मिटते,म्हणते 'नाही'
'विरह कधी जर नशिबी आला..' म्हणाय जाता
अधरावरती बोट ठेवते म्हणते 'नाही'!
कैक ऋतूंची तहान घेउन कुशीत शिरतो
मायेने ती घागर भरते, म्हणते 'नाही'!
मोकळा आहे बरा मी, कोणत्या गर्तेत नाही
रात्र माझी, स्वप्न माझे, झोप उसनी घेत नाही
प्रेम मी केले तुझ्यावर, यात माझी चूक नाही
प्रेम कोणावर नसावे?- हा कुठे संकेत नाही
आखल्या रेघेत हल्ली बरसते आभाळ माझे
का कुणा कळलोच ना, पर्वा तशी मी करत नाही
हे खरे, माझा मला कळतो तसा मी वळत नाही
माझिया अस्वस्थ आत्म्याचेच का हे बिंब सारे?
हा असावा प्रश्न की उत्तर असावे, कळत नाही
'सागराला भेटणे उद्दिष्ट धारांचे असावे'
तुमच्या स्पर्धेमध्ये माझा टिकाव नाही
लांगुलचालन करणे माझा स्वभाव नाही
स्वतःच घाला हार, तुरे घ्या, अन पैसेही
या सगळ्याचा मला जराही सराव नाही...
हवे तसे ठोकून द्या पुन्हा भाषण फक्कड
फसेन मीही असा आपला ठराव नाही !
वरदहस्त का त्याचा आम्हां सर्वांवरती समान नाही?
नशीब देऊ केले त्याने, मजला मंजूर दान नाही
निघून गेली तरूण वर्षे आयुष्याशी झुंजण्यामधे
नीरस वाटे दिवस आजचा, वणवा नाही, तुफान नाही
"उदास का तू राजमहाली?" यावर मी ही काय म्हणावे?