बिनकामाच्या नोंदी
Submitted by संप्रति१ on 25 January, 2025 - 13:00
१. ओठांवर कोवळी लव फुटू लागलेल्या कॉलेजवयीन मुलांची भाषा कानावर पडते. अशी बेमुरव्वत रग कधीकाळी आपल्या आतही होती आणि तिच्या फोर्समुळे आपणही याच भाषेतून जगाशी संवाद साधत होतो, हे आठवून कसंसंच वाटतं.
तोंडातून बाहेर पडणाऱ्या कोणत्याही वाक्याचा अंत अस्ति आरंभ करायचा झाल्यास लवड्या सोडून इतर कोणता शब्दच जवळ असू नये, ही परिस्थिती मोठी आश्चर्याची वाटते. अर्थात, सगळं करून भागल्यावर आज मला तसं वाटणं साहजिकच आहे. पण सवाल इथं माझा नाहीये. सवाल, माझं नक्की काय काय करून भागलं आहे, हा ही नाहीये.
विषय:
शब्दखुणा: