वर्षाविहार २०२४: संयोजक हवेत आणि नवीन कल्पना कळवा
Submitted by Admin-team on 3 June, 2024 - 09:31
नमस्कार मायबोलीकर,
२०१७ नंतर मधल्या पाच वर्षांच्या विश्रांती नंतर आपण गेल्यावर्षी वर्षा विहार पुन्हा उत्साहात साजरा केला.
यंदाही दणक्यात होऊन जाऊद्यात मग वर्षाविहार. काय म्हणता?
ववि समस्त मायबोलीकरांचा आहे, नवीन काय जुने काय!
यंदाच्या ववित जुने नवे मिळून दंगा करुया. पण त्यासाठी उत्साहाने भरलेली टीम पण लागेल. पुण्यातली टीम तयार झालेय. मुंबई टीम संयोजकांची वाट बघतेय. जुजा लोक्स म्हणजे जुने जाणते संयोजक हो, आहेतच मार्गदर्शन करायला.
आता विचारमंथन नको की तळ्यात मळ्यातले घुटमळणे नको.
विषय:
शब्दखुणा: