Submitted by Admin-team on 3 June, 2024 - 09:31
नमस्कार मायबोलीकर,
२०१७ नंतर मधल्या पाच वर्षांच्या विश्रांती नंतर आपण गेल्यावर्षी वर्षा विहार पुन्हा उत्साहात साजरा केला.
यंदाही दणक्यात होऊन जाऊद्यात मग वर्षाविहार. काय म्हणता?
ववि समस्त मायबोलीकरांचा आहे, नवीन काय जुने काय!
यंदाच्या ववित जुने नवे मिळून दंगा करुया. पण त्यासाठी उत्साहाने भरलेली टीम पण लागेल. पुण्यातली टीम तयार झालेय. मुंबई टीम संयोजकांची वाट बघतेय. जुजा लोक्स म्हणजे जुने जाणते संयोजक हो, आहेतच मार्गदर्शन करायला.
आता विचारमंथन नको की तळ्यात मळ्यातले घुटमळणे नको.
पॉवरबाज टीम बनायला तुमच्या एंट्रीची वाट बघतोय. येऊदेत नावे पटापट.
येवा ववि आपलोच आसा!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आला रे आला वावीचा धागा आला!!
आला रे आला वावीचा धागा आला!!
संयोजकांना मानधन देता आले तर
संयोजकांना मानधन देता आले तर बेरोजगार युवा मायबोलीकर सहभाग नोंदवू शकतील. - एक कल्पना.
मानधन + दरमहा पेन्शन
मानधन + दरमहा पेन्शन
संयोजकांची संख्या
संयोजकांची संख्या वविकरांपेक्षा अमाप होण्या आधीच पुढची पॅकेजेस आवरा.
खरं तर प्रतिक्रियांच्या
खरं तर प्रतिक्रिया मिळण्यासाठीच केवळ प्रतिसाद लिहिणाऱ्यांना/ला आवरलं तरी पुरेसं होईल.
प्रतिक्रिया मिळण्यासाठीच केवळ
प्रतिक्रिया मिळण्यासाठीच केवळ प्रतिसाद लिहिणाऱ्यांना/ला आवरलं तरी पुरेसं होईल.+१११
कधी आहे ववी
कधी आहे ववी
काही ठरतेय?
काही ठरतेय?
मुंबईत पाऊस सुरू झालाय...
पुणे तर तुंबायला सुरुवात झालीय..
इथे दोन चार शिंतोडे तरी उडवा...
हो, संयोजक जमले आहेत.
हो, संयोजक जमले आहेत. संयोजनच्या कामाला सुरुवात झाली आहे. लवकरच माहीती कळेल.