भुरा - शरद बाविस्कर - मयूरेश चव्हाण कृत परिचय
Submitted by भरत. on 19 March, 2024 - 08:41
.‘व्यवस्था सगळ्यांना समान संधी देत नाही, ती कधीच शंभर टक्के न्याय्य वा पारदर्शक नसते.’ किंवा ‘व्यवस्था मानवी जीवनाची अपरिहार्यता आहे मात्र तिचे निरंकुश होणे म्हणजे स्वातंत्र्यावर टाच’ या केवळ लेखकाची उक्ती अथवा कथन नसून अनुभव आहे. ग्रामीण भागातील शिक्षण आणि शिक्षणाबाबतची उदासीनता भुरा या पुस्तकातील काळाशी तुलना करता सध्याला अधिक गंभीर आहे. आजही यातून कोणी अग्निदिव्य देऊन बाहेर पडला तर तो इतरत्र अडकावा म्हणून अनेक गंड त्याची पाठ सोडू शकणार नाहीत अशा पुढच्या व्यवस्था आहेत. कितीही वाचायची आवड असली तरी तशी व्यवस्था आजही फार कमी नशीबवंतांना उपलब्ध आहे.
विषय:
शब्दखुणा: