ऊन वणवा

हिरवा शृंगार

Submitted by Laxman Walde on 18 March, 2024 - 01:56

ऊन सार पेटल आग ओकू लागल
उन्हाच्या वणव्यात रान पेटत चालल
जाळला हिरवा शृंगार
आता देह जाळू लागल

उन्हाच्या झळात रान सार सोलल
देह झांडाच जिंवतच पेटल
विझव आग उन्हाची
विनवणी आभाळाची करु लागल

उन्हाच्या वणव्यात
रान पेटत चालल
जाळला हिरवा शृंगार
आता देह जाळू लागल

घाव खालून तुकडे करुन टाक
जाळून राख करुन टाक
तळतळून सांगू लागल
उन्हाच्या वणव्यात रान पेटत चालल
जाळला हिरवा शृंगार आता देह जाळू लागल

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - ऊन वणवा