प्रेम Submitted by Dattaj on 8 February, 2024 - 04:30 तुझं अंधुक अस्तित्व मला खेटून गेलं तुझं स्पष्ट देखणेपण मला भेटून गेलं तुझं अल्लड उणेपण मला भासवून गेलं तुझं पोक्तेपण मनातलं मला आसवुन गेलं तुझं अभंग हासणं मला जगवुन गेलं तुझं भंग होणं माझ्यातलं मला उसवुन गेलं .... विषय: काव्यलेखनशब्दखुणा: ते तुझ