उपक्रम २ - एकारंभ अनंत अर्थम् – युगानुयुगे – शर्मिला र.
Submitted by SharmilaR on 20 September, 2023 - 08:43
युगानुयुगे
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.....
शून्यात बघत बसलेली ती... सावळा वर्ण.. लांबसडक मोकळे केस.. साधीशी साडी..
तिच्यात त्याला काहीतरी ओळखीचे वाटले. तो तिच्यासमोर गेला.
“तू.. तुम्ही..”
“मी पांचाली.” तिच्या डोळ्यात अपरंपार वेदना होती.
“पांचाली..? म्हणजे.. ?” हेच ओळखीचं वाटतंय का?.. त्याने अविश्वासाने तिच्याकडे बघितले.
“तीच..ती.. अनंतकाळापासून असलेली.. मला मरण नाही .. ” डोळ्यातील वेदना तिच्या आवाजातही होती.
“कसं शक्य आहे..?”
विषय:
शब्दखुणा: