माझी अमेरिका डायरी - ६- वाचन संस्कृती!
Submitted by छन्दिफन्दि on 17 March, 2023 - 21:26
शनिवारी सकाळी अकराच्या दरम्याने मुलांना घेऊन लायब्ररीत गेले. तर ही जत्रा भरलेली. छोटी छोटी मुलं, त्यांचे आई -बाबा , प्रत्येकाकडे पुस्तकांनी, VCDs ने भरलेली मोठी पिशवी असं सर्वसाधारण चित्र. मुलं लायब्ररी बघून खूपच खुश झाली आणि त्या वातावरणात मिसळून गेली. मग आम्हीही खूप सारी चित्रमय पुस्तके, गोष्टीची पुस्तके, VCDs, ऑडिओ पुस्तके, झालंच तर आमची मोठ्यांची पुस्तके पिशव्या भरून घेऊन आलो.
शब्दखुणा: