किती वाद आहे
Submitted by किरण कुमार on 10 January, 2023 - 03:40
किती वाद आहे ....
मना लागलेली जुनी ब्याद आहे
विठू सावळ्याचा मला नाद आहे
कटीवर कराला नको आज ठेवू
गळाभेट व्हावी अशी साद आहे
तुला पत्थराचा म्हणू मी कसा रे
अभंगास माझ्या तुझी दाद आहे
इथे वाळवंटी युगे काढली तू
जुनी पंढरी का तुला याद आहे
खरा भक्त रांगेत नेते पुजेला
तुझ्या दर्शनाचा किती वाद आहे
- किरण कुमार
विषय:
शब्दखुणा: