वैदेही परशुरामी

झोंबिवली - मराठी चित्रपट

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 May, 2022 - 14:55

झोंबी म्हणजे जिवंत प्रेत! एक शरीर ज्यात आत्मा तर आहे. पण मेंदू नेहमीसारखा काम करायचा बंद झाला आहे. जणू एक पुरलेली सडलेली डेडबॉडी उकरून काढली आणि तिला खेळण्यासारखे चावी देऊन सोडले लोकांचा चावा घ्यायला. पण गंमत ईथेच संपत नाही. हे झोंबी ज्यांचा चावा घेतात ते सुद्धा झोंबी होतात. आणि हे जास्त डेंजर असते. कारण अश्याने यांची संख्या वाढतच जाते. वाढतच जाते. वाढतच जाते. पण यावर ऊपाय काय? पहिला झोंबी नेमका कश्यामुळे बनतो? आणि हे झोंबी नेमके दिसतात कसे? करतात काय? या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील, तर झोंबिवली जरूर बघा.

विषय: 
Subscribe to RSS - वैदेही परशुरामी