आपसूक
Submitted by mi manasi on 9 May, 2022 - 22:25
तू फूल हो..
मग मार्गही सुगंधी होईल आपसूक
तू चूल हो..
मग भूकही माऊली होईल आपसूक
तू सूर हो..
मग दु:खही बासरी होईल आपसूक
तू वृक्ष हो..
मग साथही सावली होईल आपसूक
तू चंद्र हो..
मग रात्रही चांदणी होईल आपसूक
तू प्रेम हो..
मग स्पर्शही मल्मली होईल आपसूक
तू यार हो..
मग यादही चंदनी होईल आपसूक
तू पार्थ हो..
मग दैवही सारथी होईल आपसूक
तू देव हो..
मग भक्तीही साजरी होईल आपसूक
तू ज्योत हो..
मग जन्मही आरती होईल आपसूक
माणूस हो..
मग पूर्तता जीवनी येईल आपसूक
मी मानसी...
विषय: