सजल नयन नितधार बरसती..

सजल नयन नितधार बरसती.. (भाग -१ )

Submitted by SharmilaR on 16 March, 2022 - 02:15

सजल नयन नितधार बरसती.. (भाग -१ )

सजल नयन नित धार बरसती
भावगंध त्या जळी मिसळती ||

डोळे बंद करून, मंत्रमुग्ध होऊन वीणाताई गाणं ऐकत होत्या. त्या हळुवार गाण्याचा शब्द न् शब्द मनाला भिडत होता. वीणाताईंच्या डोक्यातले इतर विचार तेवढ्या पुरते तरी थांबले होते. गाडी थांबली, ह्याचंही त्यांना भान नव्हतं.

“उतरायचं नं आई?” अर्चनाने हळूच विचारलं. वीणाताई भानावर आल्या. गाडी लाइफ केअर हॉस्पिटल समोर उभी होती.

“अ.. हो..”

“मी येऊ का बरोबर?” अर्चनाने विचारलं.

Subscribe to RSS - सजल नयन नितधार बरसती..