लगे रहो.... जो जो रॅबिट !
Submitted by शांत प्राणी on 16 February, 2022 - 02:31
हल्ली चित्रपटच पहावासा वाटत नाही. न जाणो कसा असेल ही भीती वाटते. एका जागी बसून पुस्तक वाचणे, चित्रपट पाहणे यासाठी संयम शिल्लक राहिलेला नाही असे वाटत होते. अशातच कुणीतरी जो जो रॅबिटबद्दल सांगितले. पूर्वी कुणीतरी नवीन आलेल्या चित्रपटाबद्दल पाच सहा वाक्यात सांगावे आणि आपल्याला उत्सुकता निर्माण व्हावी तसे झाले. हे मिसिंग आहे तर ! या कारणाने का होईना जो जो रॅबिट बघायचं ठरवलं. सांगणार्याने इतक्या छान सांगितले की जाताना गाडीतच पाहिला. बरोब्बर सव्वा तासात चित्रपट आणि प्रवास संपला आणि मग जो काही अनुभव घेतला तो कुणाला तरी सांगण्याची बेचैनी दाटू लागली.
विषय:
शब्दखुणा: