कलावंतीण दुर्ग भेट
Submitted by अजित केतकर on 4 December, 2021 - 13:52
"आम्ही चाललोय कलावंतीण दुर्गला. येतोस का?" भावाचा पुण्याहून फोन. पुढच्याच वाक्यात त्याचे "आम्ही" हे एकवचनी आदरार्थी असल्याचे समजले. आधी दोनवेळा जाऊन आलो असल्याने तशी फारशी उत्सुकता नव्हती. फक्त या निमित्ताने lockdown चे ग्रहण सुटणार होते. त्यामुळे लगेच होकार दिला आणि बाकी कोणी नाही आले तरी आम्ही दोघांनी जायचे ठरवले. पण लवकरच दोघांची मित्रमंडळी तयार होत आम्ही बारा जण झालो. पुण्याहून ७ जण शुक्रवारी संध्याकाळी माचीवर पोहोचले आणि आम्हाला location पाठवले. ठाण्याहून शनिवारी पहाटे ४ वाजता दोन बाईकांवर स्वार होऊन आम्ही चौघे कलावंतीण पहायला निघालो!! दहिसरहून एक मित्र पाठोपाठ येतच होता.
विषय:
शब्दखुणा: