नारायण धारप

आपण सारी धरणीमातेची लेकरं ! [पूर्वार्ध]

Submitted by रानभुली on 30 November, 2021 - 06:26

.[ पूर्वार्ध ]

सानपांच्या भयकथा मेंदूत कोरल्या जातात.
त्यातलं भय विसरलं जात नाही. पुन्हा सानपांचे कोणतेही पुस्तक वाचायचे नाही असा निर्धार केला की मनाला बरं वाटतं. आता ही कथा डोक्यातून काढून टाकू या निश्चयाने बळ येतं.

पण कधीतरी रात्री एकटी घरात असताना दारावरच्या झडपेच्या काचेतून समोरच्या बंद फ्लॅटमधून येणारा प्रकाश त्यातले रंगतरंग वेगळे करत भिंतीवर पसरतो. मधल्या पॅसेज मधे उडणार्‍या चतुर, पाकळ्या आणि झडपेच्या काचेवरची पाल यांच्या सावल्या मोठ्या होत भिंतीवर हलू लागतात तेव्हां..

Subscribe to RSS - नारायण धारप