‘सच कहूँ तो’ - नीना गुप्ता
Submitted by स्वेन on 13 August, 2021 - 07:19
१९९३मध्ये ‘बझार सीताराम’ या पहिल्याच चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी नीना गुप्ताने सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला. त्या चित्रपटाचे निर्माते श्याम बेनेगल यांनी तिला त्या वेळी सांगितले होते - “प्रत्येक कथेची स्पष्ट सुरुवात, मध्य आणि शेवट असं सगळं लक्षात ठेवलं, तर कधीही अपयश येत नाही.” हा सल्ला तिने केवळ चित्रपटालाच लागू केला असे नव्हे, तर तिच्या आत्मचरित्रालाही लागू केल्याचे दिसते. ती ‘सच कहूँ तो’ या आत्मचरित्रात हेच समीकरण वापरून आपली कहाणी सांगते.
विषय:
शब्दखुणा: