आर्थिक साक्षरता : गेमिफिकेशन
नमस्कार,
आर्थिक साक्षरता हा विषय शालेय अभ्यासक्रमात दुर्लक्षित विषय आहे. नविन शैक्षणिक धोरणात तो आता अभ्यासक्रमात घेण्यास सुरुवात होत आहे. मी आमच्या स्टार्ट अप च्या माध्यमातुन या विषयावर काम सुरु केले आहे. त्यासाठी गेमिफिकेशन या पद्धतीने मुलांना आवडेल असे खेळ आपण देउ शकतो का यावर शोध सुरु आहे.
आर्थिक साक्षरता या विषयावरील रॉबर्ट कियोसाकी यांचेसारख्या लेखकांची पुस्तके भारतात उपलब्ध आहेत. परंतु त्यांचे गेमिफिकेशन केलेले खेळ भारतात उपलब्ध नाहीत. ते अमेरिका अन युरोप मध्ये उपलब्ध आहेत. तेथुन ते भारतात आणता येतील का?