शेक्सपिअर टूर (U.K.) 2022 संदर्भात माहिती हवीय!
मी मराठी माध्यमातून शिकलेला - मायमराठीचा चाहता ; तर मोठे बंधू कॉन्व्हेन्ट / इंग्लीश मिडिअम शिक्षित असल्याने शेक्सपिअर व इंग्रजी साहित्याचे चाहते!
नोकरी - व्यवसायानिमित्त माझे भारताबाहेर फिरण्याचे योग आले. बंधू शिक्षण क्षेत्रात असल्याने त्यांचे योग आले नाही.
काही वर्षापूर्वी - माझे Stratford upon-Avon च्या जवळ अगदी काही दिवसाचे वास्तव्य होते; तेंव्हा शेक्सपिअर संदर्भात काही आवर्जून बघण्यासारखा (Stratford upon-Avon/ Globe Theatre वगैरे) एक टूर असल्यास त्यांना सप्रेम भेट म्हणून द्यायची इच्छा झाली होती..