शेक्सपिअर टूर (U.K.) 2022 संदर्भात माहिती हवीय!

Submitted by यक्ष on 29 October, 2021 - 05:09

मी मराठी माध्यमातून शिकलेला - मायमराठीचा चाहता ; तर मोठे बंधू कॉन्व्हेन्ट / इंग्लीश मिडिअम शिक्षित असल्याने शेक्सपिअर व इंग्रजी साहित्याचे चाहते!

नोकरी - व्यवसायानिमित्त माझे भारताबाहेर फिरण्याचे योग आले. बंधू शिक्षण क्षेत्रात असल्याने त्यांचे योग आले नाही.

काही वर्षापूर्वी - माझे Stratford upon-Avon च्या जवळ अगदी काही दिवसाचे वास्तव्य होते; तेंव्हा शेक्सपिअर संदर्भात काही आवर्जून बघण्यासारखा (Stratford upon-Avon/ Globe Theatre वगैरे) एक टूर असल्यास त्यांना सप्रेम भेट म्हणून द्यायची इच्छा झाली होती..

U.K.आता भ्रमंती साठी खुले झाले असल्यास / संधी असल्यास; 2022 मधे ते प्रत्यक्षात आणावयाचे प्रयोजन आहे.

तरी शेक्सपिअर अनुभव हा फोकस ठेऊन तत्सम काही संधी असल्यास माहिती हवीय. बंधूंचा हा भारताबहेरचा पहिलाच प्रवास असल्याने जवळपास इंग्रजी साहित्याशी निगडीत (ठिकाणे / नाटक /कार्यक्रम असे) आणखीही अनुभव घेण्यासारखे असल्यास दुधात साखर!

धन्यवाद!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे माहिती पाहीली का? बरेच पर्याय आहेत.
स्वतः शेक्सपियर त्याच्या गावची टूर देणारः https://www.visitstratforduponavon.co.uk/attractions/shakespeares-walkin...
https://www.visitstratforduponavon.co.uk/attractions/royal-shakespeare-c...
https://www.visitstratforduponavon.co.uk/attractions/shakespeares-birthp...
https://www.visitstratforduponavon.co.uk/
( मी स्वतः यातली एकही टूर घेतली नाही)

अजयजी,

आपण दिलेल्या महितीच्या खजिन्याचा बराच फायदा झाला. एकंदरीत U.K. सध्या Covid मुळे सावध पाउले टाकते आहे असे जाणवते. शेक्सपियर टूर चे मे २०२२ नंतरचे कार्यक्रम अजून ठरायचे आहेत असे वाटते.
अजून शोधात आहे....