जोश
Submitted by आर्त on 21 March, 2021 - 16:02
पुन्हा जोश आला, पुन्हा मान्य केले,
बदल घडवण्याचे, अरे दिवस गेले.
किती भार झाला, कितींच्या मनावर,
कुणी हसत वेडे, कुणी मौन मेले.
खरे गोड होते, तुझे हासणे गं,
जणू देव अंगी, प्रिये उतरलेले.
तमेचे उपासक, मनाच्या किनारी,
जशी रात राणी, तिचे सर्व चेले.
दुरूनी दिसे ती, तरी दर्द होतो,
नयन तीक्ष्ण इतके, तिचे बोचलेले.
कसे तूच केले हुशारीत सौदे,
हवे ते न देता, रुचे तेच न्हेले.
- आर्त २१.०३.२०२१
-----
नेहेमीप्रमाणे मुक्त टीका, दाद आणि चर्चेस आमंत्रण. धन्यवाद.
विषय:
शब्दखुणा: